पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली 

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली…….!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी …!!

म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली …!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली …!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली …!!

                                      गंगाधर मुटे
…………………………………………………………………. 

(विडंबन)        (कविश्रेष्ठ सुरेश भटांचा क्षमाप्रार्थी) 
………………………………………………………………….

10 comments on “पहाटे पहाटे तुला जाग आली

  1. खूपच छान. कविता वाचल्यावर मनातील मच्छर, उंदीर सर्वच पळून गेले

  2. सर,
    खूपच छान लिखाण …..
    आपल्या या लिखाणास आमच्याकडून शुभेच्छा

    अशीच नवीन नवीन कविता, गोष्टी, विनोदी कविता वाचयला मिळाव्या हि अपेक्षा व्यक्त करतो …

    आपला कृपाभिलाषी

    दादा गिरी

यावर आपले मत नोंदवा