स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo





स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-रेकॉर्डिंग Vdo

स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अ‍ॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.

———————————————————————–
रानमोगरा

———————————————————————–
भाग-१


………………………………………………………………………………….
भाग-२

…………………………………………………………………………………

भाग-३


………………………………………………………………………………….
भाग-४

…………………………………………………………………………………

भाग-५

…………………………………………………………………………………

22 comments on “स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo

  1. उर्वरीत भाग लवकर लवकर येऊद्यात…
    अभिनंदन पुन्हा एकदा मुटेकाका आपले आणि सर्वांचेच…

  2. अभिनंदन! रेकॉर्डिंग चांगले झाले आहे. रविवारी मी मुंबईबाहेर होतो आणि ई-मेल पाहिलीच नव्हती त्यामुळे कार्यक्रम होणार हे कळलेच नव्हते! त्यामुळे अर्थात पाहिलाच नव्हता. आता तुमच्या कामगिरीमुळे पुरा पाहतां येणार आहे. मी पहिला भाग download केला आहे आणि पुढील भागाची वाट पाहतो आहे. (माझे चित्रण पुढील भागात आहे ना!)

  3. मुटे साहेब!
    खूप धन्यवाद
    तुम्ही घेतलेली मेहनत दिसते आहे तुमच्यामुळे आम्ही न पाहता आलेला कार्यक्रम पाहू शकलो आणि आभार!

  4. सर्व प्रतिसादकांचे सर्व विजेत्यांच्या वतीने आभार.

    आज सर्वच भाग अपलोड केलेत.

  5. खूप छान वाटले ही बातमी वाचून ! अत्यंत हार्दिक अभिनंदन.

  6. खूप छान. एक शेतकरी तंत्रज्ञानही सांभाळतो. हे आश्वासक चित्र मोठे व्हायला हवे. खेडेगावात इंटरनेट पोचावे. तसेच शेतीबाबत सरकारी धोरणही सुधारावे तरच हे होईल त्यासाठी शुभेच्छा

  7. गंगाधरजी,
    मी बघितला कार्यक्रम फ़ेसबूकवर.
    खूप आनंद आणि अभिमान वाटला. हार्दिक अभिनंदन.
    असेच यश मिळत राहो.
    तुम्ही नवे inspiration दिले ग्रामीण भागातील लेखकांना.

    उमेश

  8. मुटे साहेब,
    आभार.
    त्याचवेळी नेमकी आमच्या इथली वीज गेली असल्याकारणाने बघायला नव्हता मिळाला कार्यक्रम.
    तुमच्यामुळे बघितला.

    धन्यवाद.
    🙂
    अनघा

  9. नमस्कार काका,
    मी प्रशांत पुरुषोत्तम काळे. तुमचा कार्यक्रम पाहिला
    आणि पाहून छान वाटले.

    प्रशांत काळे, हिंगणघाट

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s