प्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई


                                                                                                       प्रा. मधुकर पाटील
                                                                                                      बोरीवली (पश्चिम),
                                                                                                      मुंबई – ४०० १०३
प्रिय कवी गंगाधर मुटे,


             तुमचे-आमचे प्रिय मित्र प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांनी पाठविलेला तुमचा आंबटगोड “रानमेवा” मिळाला.
मन:पुर्वक आभार तुमचे आणि प्रा. सुरेशचंद्राचे.
           ’आंबटगोड’ म्हटले या रानमेव्याला कारण यामध्ये उपहास-उपरोधाचा ठसका देणारा आंबटपणा आहे आणि भावात्म काव्यात्मकतेचा ’गोडवा’ ही आहे.

शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली तारुण्य जाळताना



असे ’शेतकरी-भोग’ भोगताही तुम्ही काव्य ’जगत’ आहात याबद्दल अभिनंदन.
आणि सत्य ’आत्मगत’ आणि ’समूहगत’ ही – असाच प्रत्यय देणारे.
अंगारमळा-आंबेठानच्या ख्यातनाम शरद जोशी यांच्यापासून पुणे-मुंबई-अहमदनगर-अकोला ते अगदी हॉंगकॉंग-कुवैत-आस्ट्रेलिया-अमेरिका येथपर्यंतच्या अनेक जाणत्यांनी तुमच्या ’रानमेव्या’ला दाद दिली आहे – त्यात तुम्हाला अज्ञात असलेल्या एका रसिकाची भर-


तुमच्या खास आवडलेल्या कविता :


बळीराजाचे ध्यान, माणूस, हे गणराज्य की धनराज्य?, अट्टल चोरटा मी, सरबत प्रेमाच्या नात्याचं, शल्य एका कवीचे, कुठे बुडाला चरखा?, धकव रं शामराव, आंब्याच्या झाडाला वांगे, लकस-फ़कस, झ्यामल-झ्यामल, तरी हुंदक्यांना गिळावे किती?, अंगार चित्तवेधी.


तुमच्या कवितेतील ’कवितांना’ जन्म देणार्‍या प्रतिमा:


गगनावरी तिरंगा – ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे
*
तारांगणे उद्याची – कक्षा तुझी असावी
*
छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ….!
*
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
*
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
*
आकाश अंथरोनी, तार्‍यास घे उशाला
बाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला
*
लावती घामाला किंमत सस्ती
त्वेषाने अंबर चिरू द्या की रं ……!
*
उषेला बांग देऊ द्या की रं ……!
*
जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा
*
अरे माणूस माणूस
कसं निसर्गाचं देणं?
गुण श्वापदाचे अभये
नाही मानवाचं लेणं ……!
*
ताई-दादा राबताती, पिकताती माणिकमोती
जसं कैवल्याचं लेणं, ओंब्या-कणसं झुलताती
*
चंद्रास ग्रासताना अंधार घोर झाला
*
तुमच्या कवितेतील सुंदर कल्पनाविलास: 


अट्टल चोरटा मी
*
सरबत…… प्रेमाच्या नात्याचं
*
विलाप लोकसंख्येचा
*
तुमच्या कवितेतील शाब्दलय:


– मात्रा/अक्षरवृत्तातील सर्वच कविता
– तू हसलीस, खेटून बसलीस
– स्वच्छ ऊन अन्‍ मोकळी हवा
  मस्त विहंगतो पाखरांचा थवा
– अलबेल्या वल्लरींना
  झाडे झुडपे झोका झुलवतात


तुमच्या कवितेतील सर्जनशील शब्द:


उजाडणे ही बुजाडेल,
राजकर्‍यांनो….,
झकोले, झ्यामल-झ्यामल


तुमच्या कवितेतील तात्विक स्पर्श:


– न चिरंतन काही, क्षणभंगूर पसारा
– वाली तुझा तूची
– आक्रमणाला उत्तर बचाव नसते
– “मी-तू”, “तू-मी” कशाला हवंय रे?


तुमच्या कवितेतील उपहास-उपरोध:


तुम्ही चळवळीतले कृतिशील कार्यकर्ते – सामाजिक/राजकीय अनुभवाने पोळून निघालेले.
म्हणूनच प्रत्यक्ष आणि शाब्दिक उपरोध/उपहासाचीही कुर्‍हाड चालवणारे.
उदाहरणे सर्वत्र अविष्कृत झालेली.


                                                                     आपला स्नेहशील,
                                                                    प्रा. मधुकर पाटील


* प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांना आशिर्वादपर नमस्कार सांगणे.
——————————————————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s