हव्या कशाला मग सलवारी ?
भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?
नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढीगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ….!
टकमक बघू द्या बघणार्यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेऊ द्या घेणार्यांना
सुखावू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
नव्या युगाची मी नारी …!
स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
अभय वापरा घरोघरी …!
गंगाधर मुटे
…………………………………………………………..
(विडंबन)
…………………………………………………………..
सर, माझ्या मनातले विचार तुमच्या कवितेत उतरले आहेत …माझी सुद्धा सतत ओरड चालू असते संस्कृती -रक्षणा साठी पण शेवटी हाती निराशा येतेच …काही लोक खरच खूप नालायक पने वागू लागलेत …छान कविता आहे …आवडली ! खासकरून कवितेमधला उप्रोधीकपणा ! …
तोकडे कपडे घालण्याचा अट्टाहास हे संस्कृती पेक्षाही immaturity चे लक्षण आहे ..बालिश वयातच काहीतरी वेगळेपणा दाख्वावासा वाटतो ..तो कर्तबगारीने दाखवणे शक्य नसते ..मग दाखवा इतर काहीतरी ..
तिसरे कडवे योग्य आहे ..पण उपरोधिकच अर्थाने नव्हे ..खरेच काहीही घाला ..पण सर्वच पुरुष नजर खाली घालून नम्र राहतील अशी अपेक्षा नसावी ..
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा..!!
kharach mast kavita 🙂