सस्नेह निमंत्रण
एक नवे संकेतस्थळ
बळीराजा डॉट कॉम
आपण येथे वाचू शकता,
मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा…..!
गंगाधर मुटे, निमंत्रक
* * *
नमस्कार मंडळी,
आज मिती वैशाख कृ.६ रोज सोमवार दिनांक २३ मे २०११. आकाशात ढग गर्दी करायला लागलेले. रोहिनी नक्षत्राचे आगमन अवघ्या काही तासाच्या अंतरावर येऊन ठेपलेले. अशा या मंगलदायी शुभपर्वावर “बळीराजा डॉट कॉम” या संकेतस्थळाचा शुभारंभ करताना अत्यंत आनंद होत आहे.
शेती विषय केंद्रस्थानी ठेऊन एखाद्या शेतकर्याने एखादे मराठी संकेतस्थळ निर्माण करून ते चालविणे तसे फ़ारच जिकिरीचे काम आहे. मुद्रीत माध्यमातील लेखन वाचण्याशी सुद्धा जेथे हाडाच्या शेतकर्याचे हाडवैर आहे तेथे संगणकिय तंत्रमाध्यमात शेतकर्यांना सामील करून पुढील वाटचाल करणे किती महाकठीण काम आहे, याची आम्हांस जाणिव आहे. मात्र परिश्रम आणि चिकाटीने हे कार्य सुरू ठेवल्यास, त्यासाठी तंत्रज्ञान विषयक शिबीर आयोजित करून शेतकरीपुत्रांना प्रशिक्षण दिल्यास, प्रचार आणि प्रसार केल्यास जास्तीत जास्त शेतकरी मंडळींना या उपक्रमात सामिल करून घेता येईल, असा विश्वास आहे.
अनादीकाळापासून ज्या समाजाच्या पिढोन्-पिढ्या स्वत: अबोल राहून इतरांचे ऐकण्यातच गेल्या, त्या समाजाला बोलते करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून पुढील वाटचाल करायचा “बळीराजा डॉट कॉम” या संकेतस्थळाचा मानस आहे. या कामात आपणासर्वांनी आशिर्वाद आणि सक्रिय सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती आहे.
या मित्रांनो,
काळ्याआईच्या कष्टकर्यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्यांनो,
हक्कासाठी लढणार्यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.
* * * * * *