माय मराठीचे श्लोक…!!

माय मराठीचे श्लोक…!!

नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

                             – गंगाधर मुटे “अभय”
…………………………………………………………..
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
…………………………………………………………..


श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
—————————-
गायक – विनायक वानखेडे
गीत- गंगाधर मुटे
तबलावादक – प्रविण खापरे
हार्मोनियम – सुरेश सायवाने

44 comments on “माय मराठीचे श्लोक…!!

 1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
  जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
  धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
  एवढ्या जगात माय मानतो मराठी

  याच शब्दांनी आपणास मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या .
  मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपन सगळे तत्पर राहू.!!!!!!!!!!!!!!!! हीच अपेक्षा
  जय महाराष्ट्र

 2. काका, मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या ॥

  आपले मराठी मनाचे श्लोक फ़ार छान आहेत.
  खरचं
  जरी वेगळी बोलती बोलभाषा
  अनेकात एकत्व एक परिभाषा
  असे भाग्य ज्यांना मिळाली मराठी
  घडो हे समस्ता! नमो माँ मराठी..!!

  या श्लोकांचा आपण प्रचार जरुर करा.

 3. अतिशय मनाला भिडणारी रचना .. खूप आवडली ..
  मी माझा माझ्या आवडत्या कविता असा ब्लॉग चालवतो .. आपली परवानगी असेल तर त्यात हे सामील करेन ..

 4. सुंदर आहे.
  एकदम मस्तच. एकदम आपल्या “कुसुमाग्रज” वगैरे कवींसारखी झाली आहे. –> “महान”! खरंच!
  शुभेच्छा!!!

 5. व्वा! मस्त. गंगाधरजी, सगळ्यांच्याच भावना समर्थपणे व्यक्त केल्यात.

 6. वा ! गंगाधरजी. सुपर्ब. आपणास ही आमच्या मनापासुन शुभेच्छा !!!

  मराठीचा जय हो !!!!

 7. DEAR SIR
  खरोखरच तुमच्या कविता चांगल्या आहेत. प्रथमता धन्यवाद .
  सर तुमची एक कविता अगदी मनाला भिडून गेली ती म्हणजे महागाई.
  खरोखरच खूप मार्मिक शब्दात तुम्ही वर्णन केले आहे, तशेच मी तुमची “शेतकरी मर्दानी” हि कविता पाठ करण्यासाठी प्रिंट OUT काढलेली आहे . मी पण एक साधा कवी आहे, त्यामुळे कवीचे शब्ध कवीलाच समजणार. धन्यवाद सर .कृपया आपला मोबाईल नं. द्यावा. THANK YOU.

 8. चंद्रकांतजी,
  प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
  तुम्ही तुमचा इ-मेल किंवा दिलेला नाही.
  माझा मोबाईल नं कसा कळवणार?

 9. नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
  तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
  जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
  घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!

  उत्तम रचना गंगाधरजी.!

 10. नमस्कार.
  अतिउत्तम. मराठीची गोडवी गाणारी आपली कविता अत्युत्तम आहे.

 11. Namaskar kaka, aapla ha upkram far awdla Chan ashyach prerana denarya ankhi apratim kavita amhala anubhaun shabdshaha arth bodh karun dya tumchaya marfat……..dhanyawad….ani yenarya diwali chya hardik shubhecha.

 12. अप्रतिम कविता हे सर खुप खुप आवङली

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s