
नमस्कार मित्रहो..
ही माझी छोटीसी दुनिया…
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले मन:पूर्वक स्वागत..
मित्रहो,
तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं एक माझं छोटासा गाव. जन्म आणि बालपण येथेच गेलेलं. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करताना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपरिहार्यतेमुळे पुन्हा गावाकडे पावले वळली आणि येथे स्थायिक झालो तो कायमचाच.
कविता,गाणी व भजने लिहिण्याची बालपणी खुप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ निर्माण झालेत आणि ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरुणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळून राख झाली. आणि त्यासोबतच कविता,गाणी व भजने लिहिण्याची ऊर्मी,प्रेरणा कुठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणून कळलेच नाही.
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारुण्य जळताना.”
अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वर्षे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरेल एवढा काळ कायम होती.
काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते मिळाले. पण कविता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कवितेला अन कवितेने मला पूर्णतः: एकमेकांना विसरलोच होतो.पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव्हते कधी.
एका अर्थाने आयुष्य संपलेच होते.
* * * * *
पण …..
पण आयुष्याने पुन्हा एकदा कोलांटउडी घेतली आणि “नव्हत्याचे होते” झाले. दोन तपाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मी लिहिता झालो.
मित्रहो,
मी हाडाचा ना कवी ना लेखक.
मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.
शेतकरी कुटुंबात जगतांना मी जे काही पाहिलं, अनुभवलं,
काही माझ्या वाट्याला आलेली माझी अनुभुती, माझी अभिव्यक्ती, त्यासोबतच काही इतरांच्या वाट्याला आलेल्या व्यथा; पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या.
ते बरं-वाईट वास्तव प्रामाणिकपणे चितारण्याचा प्रयत्न करतोय.
आपल्या मर्यादा सांभाळून व्यक्त होण्याची एक धडपड करतोय.
त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय.
हे जग फार झपाट्याने बदलत आहे, संगणकीय तंत्रज्ञानाने गरूड झेप घेतली आहे. जीवन जगण्याच्या परिभाषा बदलत आहेत, विकास आणि विलासाच्या व्याख्या बदलत आहेत.
मात्र दुर्दैवाने ही सर्व विकासाची परिमाणे बिगरशेतीक्षेत्रातच तेवढी बदलत आहेत. बहुसंख्येने असणारा शेतकरी समाज व इतर कष्टकरी समाज अजूनही अंधारातच चाचपडत आहे, विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा कल्पना केवळ वल्गना ठरत आहेत.
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी
हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायची गरज आहे पण ….
जोडे सजावटीला एसी कपाट ते
भाजी-फळास जागा मात्र उघड्यावरी
ज्या देशाची ध्येयधोरणे बिगरशेतीउद्योगाला पूरक आणि शेतीला मारक असतील आणि वरून “कृषिप्रधान देश” म्हणून डंका पिटला जात असेल त्या देशात गरिबी आणि अठराविश्व दारिद्र्य यांचेच अमाप पीक येणार हे उघड आहे.
* * * * *
मी कवी नाही कारण कविता लिहायला लागणारी प्रतिभा आणि कल्पनाविलास माझ्याकडे नाही.
मी लेखक नाही कारण लेखनकौशल्य आणि साहित्यिक दर्जा माझ्याकडे नाही.
आणि तरीही लिहिण्याचा प्रयत्न करतोय..
कारण….
मला आता शेतीच्या दुर्दशेला वाचा फोडायची आहे.
मला आता शेतीच्या दुर्दशेला वाचा फोडायची आहे.
या प्रचलित व्यवस्थेने धुत्कारलेल्या आणि माणूस म्हणून माणसासारखे जीवन जगण्याचा अधिकार नाकारलेल्या शोषित समाजाच्या व्यथांना चव्हाट्यावर मांडायचे आहे.
मी काय लिहितो, कसे लिहितो, याचे मला भान आहे. माझे लेखन बहूसंख्यजनांना न रुचणारे, न पटणारे किंवा अनाकलनीय असू शकते, याची मला जाणीव आहे. कधीकधी तर क्रित्येकाच्या भावना दुखावणारे, तडाखे,चटके देणारे असू शकते, हेही ज्ञात आहे मला. पण नाईलाज आहे, वास्तव हे कटू असले तरी ते वास्तव असते, आणि मी ते टाळू शकत नाही. लेखन करतो म्हणून लेखक आणि कविता लिहितो म्हणून कवी, एवढंच माझं लेखक व कवी या शब्दांशी नातं. एरवी लेखक, कवीसाठी लागणारी योग्यता माझ्यात आहे किंवा नाही, मलाच संशय आहे. कारण मी कल्पनाविलासात फार काळ रमू शकत नाही. लोकांना रुचावे, दाद मिळावी, आपल्याला वाहवा मिळावी म्हणून त्या तर्हेने लेखन करण्याचे जाणूनबुजून मी प्रयत्न करू शकत नाही.
वाचक, रसिक, समीक्षक हा लेखकाच्या दृष्टीने देव असतो हे मान्य, पण त्यांचे फ़ाजिल लाड पुरविलेच पाहिजे, याबाबत मी सहमत होऊ शकत नाही. याउलट गरज असेल तेथे त्यांना दोन खडे बोल ऐकवण्याची कठोरता माझ्यात असायलाच हवी, यावर मी ठाम आहे. लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे एवढ्यासाठी मी लिहू इच्छित नाही. केवळ उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणे, सीमित म्हणा की संकुचित म्हणा, पण एवढाच उद्देश माझ्या डोळ्यासमोर असतो, हे खरे आहे.
* * * * *
उपेक्षितांची दुर्लक्षित बाजू कागदावर चितारायचा प्रयत्न करणारे आजवर खूप झालेत. पण इतिहास असे सांगतो की, या तर्हेचे व्रत घेतलेली बरीचशी माणसे मध्येच भरकटली आणि शेवटी देवाच्या आळंदीची वाट चुकून चोराच्या आळंदीला पोचलीत. आणि त्यामागच्या अनेक कारणांपैकी ’‘लोकप्रियता मिळविण्यासाठी लेखनीचा वापर करणे” हे एक प्रमुख कारण आहेच आहे. एकदा का पुरस्कार/शासकीय मानमरातब किंवा लोकप्रिय होण्याची इच्छा मनात जागृत झाली की सर्वांना रुचेल, पसंतीस पडेल असे लेखन लिहिण्याकडे कल झुकलाच समजावा. मग कटू, कठोर, तडाखे देणारे, दुष्प्रवृत्तीवर घाव घालणारे लेखन जन्माला घालणारी लेखनी स्वत्वाच्या विनाशाकडे वाटचाल करायला लागलीच असे निर्विवाद समजावे. मग या आभासी जगाच्या भुलभुलैयात लेखणीची धार कधी आणि कशी बोथट झाली, याचा उलगडा भल्याभल्यांना होत नाही.
जी चूक इतरांनी केली, तीच चूक माझ्याकडून होऊ नये,एवढे बळ विधात्याने मला द्यावे, आणि या प्रवासात लोकप्रियता लाभली किंवा पुरस्कार वगैरे मिळाले तर आनंदच आहे, पण नाही मिळाले तरी त्यात खेद वाटण्यासारखे काहीच नाही, आपला मार्ग तेवढा महत्त्वाचा, तो भरकटू नये, हीच धारणा मरेपावेस्तोवर कायम राहावी, त्यात अंतर येऊ नये, एवढीच आंतरिक इच्छा आहे.
मित्रहो,
आपणास माझे काव्य आवडले तरी आणि
ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या…
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा.
Email : ranmewa@gmail.com
,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,*,,,,,,,,,,,,,,,
संक्षिप्त परिचय
नाव : गंगाधर महादेवराव मुटे
जन्म : २७ फ़ेब्रुवारी १९६२
शिक्षण : बी. एससी (गणित)
व्यवसाय : मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन, कापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती
प्रकाशित साहित्य :
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०
२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२
३) “नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३
४) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३
५) लोकमत, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविधवृत्तपत्रातून सातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता प्रकाशीत.
६) पुणे, नाशिक व औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पक्षिक “शेतकरी संघटक” मध्ये “वाङ्मयशेती” हे नियमित सदर लेखन.
या संकेतस्थळांची निर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.
फ़ेसबूक : www.facebook.com/gangadharmute
फ़ेसबूक पेज : www.facebook.com/my.net.farming ( माझी वाङ्मयशेती)
पुरस्कार : १) स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय मराठी TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित “ब्लॉग माझा” या जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार
२) मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट नेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत “वांगे अमर रहे” या ललितलेखाला पारितोषिक
३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा – २०११ या स्पर्धेत “कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापू” या कवितेस प्रथम पुरस्कार
४) २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२ व्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “अंकूर वैभव” पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.
सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास.
सध्या शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत
संपादकीय कार्य : १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.
संपर्क पत्ता : मु. पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा – ४४२३०७
* * *
नमस्कार !
आपल्या शे्तीचे थोडे फोटो टाका ना !
जयंत.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे जयंतजी.
यथावकाश नक्की फ़ोटो टाकेन.
खरे आहे आपले. अनेक कारुण्यगर्भ कहाण्या ४ भिंतीत जन्म घेतात आणि तिथेच त्याना मूठमातीही मिळते. छान वाटले आपले लेखन वाचून.
गंगाधराव : उत्तम जमलाय बॉग!!! आपल लिखाण आपला आयुष्याबद्दलचा अनुभव अन दृष्टीकोन दाखवत.. असेच लिहीत रहा ..खुप खुप शुभेच्छा !!!
सस्नेह :
गिरीश कुलकर्णी
मुटेसाहेब,
ब्लॊग आवडला….आणि तुमचं मनमोकळं मनोगतही फ़ार भावलं.
तुमचे अनुभव, कल्पना इथे लिहायला मनापासुन शुभेच्छा !
सस्नेह
प्रकाश काळेल
प्रकाशजी,गिरीशजी धन्यवाद.
एका मराठी शेतकऱ्याचा स्वत:चा ब्लॉग असू शकतो. यावर माझा विश्वासच बसत नाहिये.
तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा….
तुषारजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मुटेसाहेब, तुमचा ब्लॉग आवडला.. तुम्ही शेतीवर (कधीकधी जरा अतीच 🙂 ) लिहिता माबोवर ते पण आवडते.. कवितांच्या बाबतीत मी जरा ’जड’ असल्याने फारसा फिरकत नाही.. अधिक उत्तम कविता लिहा..
मुटे साहेब एक मदत हवी होती.
मीम वर व्यनी केला आहे. लवकरात लवकर पहा अन लिहा.
आधिच धन्यवाद.
Gangadharjee, tumachya Ma. Bo. warahya kavita etc me nehami wachate…kharach khup uuchch darja che lihita tumhi…ani tumachya likhanamadhe khup vividhata ahe….shubhechchha !! (mhanaje aamhala hee bharapur navin wachayala milel :))
गंगाधरजी,तुमचे लिखान मी मायबोलीवर नेहमी वाचते.
खुप छान आणि उच्च दर्जाचे लिहिता तुम्ही.
तुमच्या लिखानामध्ये खुप विवीधता आहे…
शुभेच्छा…!!
(म्हणजे आम्हालाही नविन वाचायला मिळत राहील. :))
मुटेसाहेब,
मला तुमचा ब्लॉग आवडला. तुमच्या कविताही हलक्या-फुलक्या आहे.
तुमचा शेतातील अनुभव, तुमची मराठी भाषेविषयीची तळमळ ती तुमच्या कवितांतुन जाणवते..
असेच भरपुर लिहा….
तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!
श्रीवर्धन, पुणे.
नमस्कार. मला तुमच्या कविता आवडल्या. तुमच्या देशभक्तीपर कवितेला compose करून मी हि कविता compititionla पाठवू का. त्यासाठी तुमची parmission हवी आहे.उत्तराची वाट पाहते. thank U. ( मला आवडलेली कविता – रे जाग यौवना रे.)
शंतनुजी,पाषानभेदजी,श्रीवर्धनजी,मृणालजी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मृणालजी,
मेल केली आहे. न मिळाल्यास कळविणे. धन्यवाद..!!
स्वप्नालीजी,
तुमची कॉमेंट स्पॅम झाल्याने ती मला आज पहायला मिळाली.
आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.
Namste 1
Jayant’la Anumodan !
आपल्या शे्तीचे थोडे फोटो टाका ना !
(mi maybolicha moon id ahe)
.. असेच लिहीत रहा ..खुप खुप शुभेच्छा !!!
धन्यवाद मंदारजी,
उशिराबद्दल क्षमस्व…..!!
तुमच्या कविता छान आहेत.
मुटेकाका .. मस्त..
नमस्कार गंगाधरजी,
मी सुद्धा वर्हाडातल्या एक शेतकर्याचा मुलगा.
पण आता प्रौढ आहे. आपल्या कविता मी नेहमीच वाचतो व ऐकतो.
आमच्या वेळी प्रो. देविदास सोटे वर्हाडी कविता लिहित असत.
मला त्यांच्या कविता खूप आवडायच्या.
पण बराच काळ नोकरीनिमित्त बाहेरदेशी असल्यामुळे मराठीशी संपर्क कमी झाला.
मायबोलीशी संबद्ध कायम रहावा म्हणून बरेच प्रयत्न करत असतो.
आपल्या कविता वाचन त्यातलाच एक. असो.
आपला
गणेश हजारे
(1 September 2010)
गंगाधरजी, मस्त साईट आहे तुमची..
नागपुरी तडका तर लाजवाब…. 🙂
(९ मे २०१०)
गंगाधरभौ,
तुमची शेतकर्यांबद्दल असलेली कळवळ नेहमीच तुमच्या लिखाणातून दिसून येते. ती तशीच राहु देत. ज्यांनी शेतकर्यांचं जिवन जगलं आहे किंवा अनुभव तरी आहे त्यांना नक्कीच ती कळणार. शेती हा खरं तर एक व्यवसाय कारण इतर व्यवसायां प्रमाणेच यात गुंतवणूक, मेहनत ही करावी लागते नफा मिळवायला. परंतु नजीकच्या काळात हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असेच दिसतेय. सरकारची धोरणे लहान शेतकर्यांना मदत करण्या ऐवजी, अश्या शेतकर्यांना शेतीपासून परावृत्त करण्याचीच दिसून येत आहेत.
एके काळी भूदानाची चळवळ चालवून तसेच कसेल तो शेतकरी, तोच शेतमालक या धोरणाखाली जी थोडीफार शेतजमीन मजुरांना/गरीबांना मिळाली ती सुद्धा काढून घेण्याचं सध्याच्या सरकारांचं धोरण दिसून येतंय अर्थातच यात काही व्यक्तींचा आर्थिक फायदा होणे हाच त्या मागचा मुख्य उद्देश आहे.
मला स्वत: ला तरी भविष्यकाळ चांगला दिसत नाहीय (लहान शेतकर्यांच्या अस्तित्वाबाबत). नाइलाजाने का होईना परंतु लहान शेतकर्यांना हळु हळु शेतीच्या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल असे दिसतेय. जर जगायचे असेल, पुढील पिढीला जिवन द्यायचे असेल तर हा पर्याय स्विकारावा लागेल.
निसर्ग चा समतोल बिघडत चाललाय, वाढत्या जागतीक उष्णतामानामुळे पावसाचं चक्र हे अनियमीत होणार, एक वर्ष कमी पाउस म्हणून पिक कमी परंतु खर्च जास्त, दुसरं वर्ष जास्त पाउस पिक वाया, नुकसान हे असं दोन तीनदा लागो पाठ झालं की लहान शेतकरी संपलाच.
सरकार काय करणार हे सांगायला नकोच.
या बाबतीतलं तुमचं लिखाण चालूच ठेवा. कोणाच्याही नकारार्थी प्रतिकीयांवर लक्ष देणे आवश्यक नाही.
शेतकर्यांचा फायदा होवो किंवा न होवो तुम्हाला जे खटकतेय ते लिहा.
तुम्ही एखादा धर्मग्रंथ लिहीत नाहीय किंवा तुम्हाला तुमच्या लिखाणातून एखादा धर्म/संप्रदाय स्थापन करायचा नाहीय त्यामुळे प्रत्येक लिखाण हे त्याच तोडीचं असणे आवश्यक नाहिय. असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून क्रांति होणे आवश्यक नाही किंवा तशी अपेक्षा ही ठेवू नये.
[असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून जर क्रांति व्हायला लागली असती तर रोजच ती झाली असती आणि कदाचीत त्यामुळे तीचं महत्त्व सुद्धा राहीलं नसतं]
.
समंजस
13 September 2010 7:55 PM
मला तुमचा ब्लोग आवडला!!!
तुम्ही छान लिहिता. एक वेगळा ब्लॉग!!!
-अभि
गंगाधर मुटेजी -रानमोगरा वाचतो आहे . अप्रतिम ह्या शिवाय मी त्याला काही संबोधू शकत नाही .
आपल्या तळहातावर साहित्याची ,प्रतिभेची जी ठळक रेषा उमटली आहे. त्याचे खूप कौतुक आपले फोटो आल्बम अप्रतिम ,
शेतकरी मेळाव्याचे फोटो देखील डोळे दिपवणारी आहे .त्यातील आपले बरेचशे लिखाण मी वाचलेले आहे .
आपली कवितेतील चौफेर टोलेबाजी मी बघत आहेच .नागपुरी तडका मस्त जमून गेला आहे .
ईतर ललित लिखाण पण छान जमले आहे . त्यात तुमचा अनुभव बोलत आहे. हे खूप बरे वाटते .
माझ्या मनापासून शुभेच्छा. पुढील प्रतिभेच्या प्रवासासाठी
आमच्या गावाची शान म्हणजे गंगाधर मुटे व त्यांचा रानमेवा.
संतोषजी, अनामिकजी, गणेशजी, गजाननजी, समंजसजी, वरीआरजी, प्रकाशजी, नरेशजी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
तुमचे लिखानकाम उत्तम आहे. ते नसते तरिही आवडले असते. शेतकरी हा कोणत्याही भागातला आणि कसाही असला तरि त्याविशयी आपुलकी राहणारच…..
मा. श्री. गंगाधर मुटे यांस, सप्रेम नमस्कार.
परवा आपली कविता मिसळपाव या संकेतस्थळावर वाचली -‘बायको : नागपुरी तडका’ , आवडली. त्या निमित्ताने तुमच्या ब्लॉग वर आलो. बरेचसे लि़खाण एका बैठकीत वाचून काढले. आपल्या कविता छान आहेतच, परंतू आपले स्फुटलेखन फारच आवडले. विशेषतः वांग्याची कहाणी, शेतकरी होण्यासाठी आवश्यक पात्रता, शेतकर्याला आयकर का असावा हे फारच आवडले.
शेतकरी होण्यासाठी आवश्यक गोष्टी वाचताना जणु मी माझीच स्टोरी वाचतो असा भास झाला. मी १४ वर्षांपुर्वी पुण्यातील काँप्युटरचा स्वयंरोजगार (आणि पत्नीची नोकरी, एसपी कॉलेज मध्ये लेक्चरर) सोडून काहीतरी वेगळे करायचे म्हणून पुण्यापासून १०० कि.मी. वरील गावी, वडिलोपार्जित शेतीवर, पत्नी व दोन छोट्या मुलांसह, जावून रहाण्याचा निर्णय घेतला. आणि आज पन्नाशीला पोहोचल्यावर मागे वळून पहाताना काहीच दिसत नाही. माझ्या बरोबरीच्या लोकांची दोन दोन घरे, गाड्या इन्व्हेस्टमेंट्स इ. होवून ते निवृत्तीचे प्लॅनिंग करीत आहेत व आम्ही मात्र घरचे दूध व धान्य यांच्या फुशारक्या मारीत होतो तिथेपण नाही आहोत. त्यामुळे स्वतःची जिरवून घेण्याच्या तुमच्या मताशी सहमत आहे. कर्जाचे मोठे मोठे आकडे आणि ज्यांचे आयुष्यात कधी तोंडही पाहीले नसते अशा लोकांची कर्जे घेतल्यामुळे आणि फेडू न शकल्यामुळे त्यांना तोंड देता देता हाल होतात. खोटे बोलण्याला व वायदे करण्याला तर सीमाच नाही. लोकांचा तर सोडाच, घरच्यांचा व आतातर माझाच माझ्या शब्दावर विश्वास नाही अशी परीस्थीती आहे खरी.
मध्यंतरी पुण्याच्या एका मित्रास अशीच वडिलोपार्जित जमीन वाट्यास आली. त्याने मला सल्ला विचारला की, जमीनीतून पैसा कसा मिळेल? त्याला एका शब्दात सांगितले – विकल्यावर. खरोखरच त्याने चांगल्या किमतीस जमीन विकली आणि पुण्यास आणखी एक फ्लॅट घेवून सुखी झाला. मी पण बहुतेक त्याच वाटेवर आहे. दोन्ही मुले आता मोठी झालीत. (२२ व १७ वर्षे). त्यांनी पुण्याला जाण्याचे ठरविले आहेच. त्यामुळे २,४ एकर ठेवून बाकी १२ एकर विकले तर बर्याच कटकटींतून सुटका होईल असे वाटते.
हि सर्व रामकहाणी सांगण्याचे कारण आपल्या लि़खाणाने अगदी दुखर्या नसेवर हात ठेवला. आपल्या ब्लॉगचे मुद्दाम पत्नी बरोबर सहवाचन केले. आम्ही हसलो खरे, पण ते हसू म्हणजे, आपला लहानपणीचा फोटो पहाताना आपण कसे बावळट होतो ते पाहून हसू येते असा काहीसा प्रकार झाला. तुमच्या लेखनाच्या आरश्यात आम्हाला आमचेच प्रतिबिंब दिसले. हा आरसा दाखविल्या बद्दल आभार.
शुभेच्छांसहीत,
आपला – एक शेतकरी
—————————————————–
I have seen your show today in star mazha & gone through ur site .
Ya, ur poems r exl well i have heard a lot about u from my brother Rajesh Kherde akola
Ur work shows the ever best use of the blog & hearty congrats
मला तुमची वेबसाईट खूप खूप आवडली ……
puna ekda sharad joshi ani shetkari sanghtana……
hardik abhinandan kaka
pranav babuji kitukale
chandur bazar shetkari sanghatana
9823600381
अभिनंदन!
देशाला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्यांचा विकास होणे गरजेचे आहे कारण देशाची खरी ऊर्जा ही तळागाळात असते आणि नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे व्यक्त होणे ही काळजी गरज आहे.तुम्ही उद्याच्या शेतकऱ्याचे प्रतिक आहात.
तुम्हाला मातीच्या आणि ब्लॉगच्या मशागतीसाठी शुभेच्छा!!!!!
Dear Gangadharji,
Ram Ram,
Mala tumchya sobat kahi divas rahun, tumchi sagli sheti aani tumcha pravas samjun ghyayla sandhi dilit tar, aabhari rahin.
नमस्कार उमेशजी,
http://www.baliraja.com
येथे या. आपल्याला बरीच चर्चा करता येईल.
Purity of mind is very important, thats found in your thoughts. Dhanywad
गंगाधरजी,
आपले वाचन मी नेहमी वाचत असतो. आज तुमच्या बद्दल वाचुन नारायण सुर्वे आठवतात.
ते म्हणाले होते —- “भाकरीचा चंद्र शोधण्यात आर्धी जिंदगी बरबाद झाली”
त्या वेळी या ओळींचा अर्थ कधी उमजला नाही. हा अर्थ कळायला हजारो दिवस गेले.
“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
स्वप्नेच वांझ झाली, तारूण्य जाळतांना.”
ही वाक्ये लिहीताना किती जीव जळला असेल ते हा जीवच सांगू शकेल. व्वा.. छान, अप्रतीम म्हणयला किती वेळ लगतो हो… आणि आपल्या लिखाणाची तुलना अशा दोन चार शब्दात होऊ शकत नाही…
तुम्ही आज जे काय लिहीताय ते फार छान आहे. तुमचे विशेष करून शेतक-यावरील लेख फार सुंदर असतात आणि तो एक शेतकरीच फार उत्तम त-हेने समजु शकेल.
भाऊ, इथे खूप सुखावलो.
very nice blog
mala tumache vichar aavdale …………mala tumhala bhetayche aahe..
भारतजी,
अवश्य भेटू.
साहेब नमस्कार,
तुमच्या पोर्टलला भेट दिली.
खूप तळमळीने शेती आणि शेती जीवनाचे बारकावे आपण मांडत आहात.
तुमचे मनापासून धन्यवाद !
आम्ही जळगाव येथून नुकतेच कृषी सहकारी बेरोजगार संस्थेच्या वतीने एक मासिक सुरु केले आहे.”कृषी एक्सप्रेस”.
आपण आमच्या मासिकासाठी आपण नियमितपणे काही लिहावे,अशी आमची विनंती आहे.
Like Our KRUSHI EXPRESS Page….
By Clik This Link….
खालील लिंक वर क्लिक करून कृपया आमच्या मासिक ‘कृषि एक्सप्रेस’ च्या पेज ला आपण लाईक करावे,हि विनंती.
https://www.facebook.com/pages/कृषि-एक्सप्रेस/317991078352004
संपर्क…..
विवेक ठाकरे (सल्लागार संपादक)
मासिक कृषी एकस्प्रेस
जळगाव.
मोबा-7620093937
9595234555
नमस्कार,
आपण येथेही भेट देऊ शकता. माझे सर्व लेखन
http://www.baliraja.com/
येथे उपलब्ध आहे.
mute saheb khup chan vatle ……tumchya gazal vachtana suresh bhatanchi aathvan jhali……lihit raha……shubhechha.
धन्यवाद बन्सोडसाहेब.
सर, आपला ब्लॉग खुप आवडला. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतानाही आकांडतांडव न करता सर्वसामान्य वाचकांना पचतील अशा शब्दात आपण मांडले आहे. आधुनिक युगाची जाणीव ठेऊन नव्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करत आहात हे पाहून फारच आनंद झाला.
माझ्याही ब्लॉगला आपण भेट द्यावी ही विनंती आहे.
धन्यवाद सर.
आपल्या ब्लॉगला अवश्य भेट देईन.