बळीराजाचे ध्यान

बळीराजाचे ध्यान ….!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

21 comments on “बळीराजाचे ध्यान

 1. वाह ! मुटेजी,
  अस्सल् मातीतली कविता !
  सुरेख जमली आहे !
  कास्तकाराच्या प्रति असलेल्या तुमचा कळवळा यातून स्पष्ट दिसुन येतो !

 2. बळीराजा डॉट कॉम मधे तुमची पुरस्कृत गझल वाचली. अभिनंदन.
  कांही वर्षांपासून श्री भीमराव पांचाळ (प्रसिद्ध गझल-गायक) चांगल्या गझलांच्या शोधात असतात. त्यांनी तुमच्या गझल पाहिल्या अथवा गाइल्या आहेत का, नक्की कळवावे.

 3. स्टार माझाच्या शूटींगचे वेळी मुंबईला आलो तेव्हा श्री भीमराव पांचाळे यांचेशी माझी भेट झाली. त्यानंतर त्यांचेशी दोन-तीनदा वेगवेगळ्या कार्यक्रमात भेट झाली. त्यांनी माझ्या काही गजला पाहिल्या आहेत.
  मात्र अजून गायनाबद्दल विषय निघालेला नाही.

 4. Wonderful post sir, we are also contributing from our side to make our agriculture best in every aspect through http://www.agrimates.com, There we are providing various information for farmers as well as non-farmers and students about agriculture. we hope that you also help us for making this information available to all possible people, you can also post any agriculture related news, post, inventions in article section.
  Thank you.
  http://www.agimates.com

 5. International Diwali Ank Association
  विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०१२

  दिवाळी अंक ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा असून ती अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या उद्देशाने जयसिंगपूर येथील आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना दरवर्षी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करते, त्यात उत्कृष्ट दिवाळी अंकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. याही वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

  या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 20 प्रकारामध्ये 20 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजाला जातो. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील शेकडो नामवंत प्रकाशन संस्था आपले दिवाळी अंक या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरवतात. लेखक, कवी, संपादक, प्रकाशक, वितरक, मुद्रक, मराठी साहित्याबद्दल प्रेम असणारे रसिक अशा सर्वांचा एक स्नेहसोहळा या निमित्त साजरा होतो.

  विशेष आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुली मराठी दिवाळी अंक स्पर्धेमध्ये दिवाळी अंकातील साहित्य, वैविध्य, मांडणी आणि छपाईचा दर्जा या संदर्भात गुणवत्तेच्या निकषावर सर्वोत्कृष्ठ अंकांना वरील 20 प्रकारामध्ये मान्यवर मराठी व्यक्तीच्या हस्ते गौरवपर स्मृतीचिन्ह जयसिंगपुरात प्रदान केली जातील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व दिवाळी अंकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी अधिकृतरित्या आलेल्या दिवाळी अंकामधूनच पुरस्कारांसाठी अंकांची निवड केली जाणार आहे. पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रांतील मान्यवर या स्पर्धेसाठी परीक्षक असतील.

  वेबसाईट / ई-दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफितीच्या स्वरूपातले दिवाळी अंकही ६ मुद्रित प्रती संबंधीत सामुग्रीसह (CD / DVD) पाठवून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ब्रेललिपी व ई-दिवाळी अंकासाठी स्वतंत्र निकषावर पुरस्कार दिले जातील. त्यासाठी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रांतील मान्यवर परीक्षक म्हणून काम पाहतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (६) प्रती नोंदणीकृत टपाल किवा कुरिअर मार्फत या संस्थे कडे सोमवार दिनांक ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने प्राचार्य डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक – आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर – 416101, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर , महाराष्ट्र, ईमेल – alishaadvertisingagencies@gmail.com या पत्यावर पाठवाव्यात किवा 02322 – 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळी अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून ५०० पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.

  दिवाळी अंक स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी कृपया खालील बाबींचा विचार करावा

  o आपला दिवाळी अंक मुदतीत पोहचायला हवा.

  o शक्यतो आपले पार्सल नोंदणीकृत डाकेने पाठवावे.

  o कुरिअरने पाठविण्यापूर्वी जयसिंगपूर येथे कोणत्या कुरिअर कंपन्या सेवा देतात याची खातरजमा करावी किवा स्पर्धा आयोजकांशी संपर्क साधून कुरिअर कंपनी चे नाव जाणून घ्यावे.

  o आपल्या दिवाळी अंकाच्या वेगळे पणाबद्दल १००० शब्दात परीक्षण पाठवावे.

  o आपल्या नियतकालिकाचा नमुना अंक (आपण जर नियतकालिक चालवत असाल तर)

  o या पूर्वी प्राप्त झालेल्या अन्य पुरस्काराची माहिती

  क्र. पुरस्कार देणारी संस्था वर्ष पुरस्कार प्रकार

  o नियमित अंकाचा प्रकाशन कालावधी
  □दैनिक □साप्ताहिक □पाक्षिक □मासिक □द्वैमासिक □त्रैमासिक □अर्धवार्षिक □वार्षिक □अनियतकालिक

  o परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहील व या बाबत कोणतीही तक्रार चालणार नाही.

  o दिवाळी अंक व प्रकाशन संस्थेस असलेले अन्य सदस्यत्वाचा तपशील

  क्र. संस्थेचे नाव सदस्य होण्याचे वर्ष सदस्यत्व प्रकार

  o एखादी किवा सर्व प्रवेशिका कोणत्याही करणा शिवाय नाकारण्याचा, कोणत्याही वेळी नियम – अटी मध्ये बदल करणे, पूर्व सूचना न देता स्पर्धा रद्द करण्याचा, स्पर्धेची मुदत कमी करण्याचा अथवा वाढविण्याचा, स्पर्धेचा निकाल राखून ठेवण्याचा आणि पारितोषिक वितरणाची तारीख ठरविण्याचा अधिकार आयोजकांना राहील.

  संपादकाची अधिकृत स्वाक्षरी ______________ शिक्का पूर्ण नाव ____________________________

 6. sundar pan ek takrar suddha aahe,ki pratyek veli maza ha baliraj asa ka dakhwala jato ka nahi tyachi paristhiti sudharlelei dakhwali jaat? i hope this will change very soon with help of our young educated generation of farmers
  .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s