’माझी गझल निराळी’ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार

अंकूर वाङ्मय पुरस्कार – २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर

              महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी “अंकूर वाङ्मय पुरस्कार” देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त झाली होती. ५०० रू. रोख, शाल श्रीफ़ळ देवून अंकूर साहित्य संमेलनात सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०१३ चे पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. अंकूर वाङ्मय पुरस्कार – २०१३ च्या स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कारासाठी परिक्षक मंडळाने ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाची निवड केलेली आहे.
गझलसंग्रह : माझी गझल निराळी
गझलकार : गंगाधर मुटे
प्रकाशक : शब्दांजली प्रकाशन, पुणे
         पुरस्कार वितरण नोव्हेंबर/डिसेंबर २०१४ मध्ये गोवा येथे होणार्‍या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.
Mazi Gazal Nirali

माझी गझल निराळी
———————————————————————————————————————