दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला
तरी लाजुनी तू; खळी लाल होणे, मुरकणे, इतरणे वगैरे वगैरे

कुणालाच नव्हती खबरबात काही, कुठे वाच्यता ना कुठे बोलबाला
तुझ्या आणि माझ्यात एकत्व येणे, स्वत:ला विसरणे वगैरे वगैरे

अनासक्त मी! हे तिला मानवेना, कसे डाव लटकेच खेळायची ती
वृथा आळ घेणे, मनस्ताप देणे, रुजूवात करणे वगैरे वगैरे

कधी द्यायची ती दुटप्पी दुजोरा, मुळी थांग पत्ता मनाचा न येई
मला पेच हा की पुढे काय होणे! मनाशी कचरणे वगैरे वगैरे

मुसळधार होती तुझी प्रेमवर्षा, किती चिंबलो ते कळालेच नाही
जणू थेंब प्रत्येक मकरंद धारा, मधाचे पखरणें वगैरे वगैरे

तुझी ठेव अस्पर्श तू रक्षिलेली, मिळाली मला; ते ठसे आज ताजे
स्मरे त्या क्षणांचे मदोन्मत्त होणे, कराग्रे विहरणे वगैरे वगैरे

“अभय” एक युक्ती तुला सांगतो मी, करावे खरे प्रेम मातीवरी या
भुई संग जगणे, भुई संग मरणे, भुई संग झरणे वगैरे वगैरे

                                                       –  गंगाधर मुटे “अभय”
—————————————————————-

अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर

अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर

९ आणि १० मार्च २०१३
*   *   *
Puraskar
*   *   *

Daryapur
व्यासपिठावर कवी इंद्रजित भालेराव, साहित्यिक डॉ.प्रतिमा इंगोले, गझलकार बबन सराडकर आणि मान्यवर
*   *   *

Daryapur
अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलनात गंगाधर यांना शाल, श्रीफ़ळ आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

*   *  *   *

Puraskar

*   *   *

Puraskar

*   *   *
Puraskar
*   *   *
Puraskar
*   *   *
Puraskar
*   *   *
Puraskar
*     *     *     *
प्रा. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणानंतर‘गावाकडं चल माझ्या दोस्ता’ , ‘शिक बाबा शिक, लढायला शिक’ आणि “माझ्या जन्माची कहानी” या कविता सादर करून गावाकडे वळण्याचा आणि शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला.

* * * *
* * * *

माय मराठीचे श्लोक – रिंगटोन डाउनलोड करा

Ringtone Download
माय मराठीचे श्लोक – रिंगटोन डाउनलोड करा.
वेळ : ३२ सेकंद – MP3 आकार – 1.22 MB


माय मराठीचे श्लोक – रिंगटोन ऐका.


संपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी  येथे  क्लिक करा.

 ————————————————————-

हंबरून वासराले चाटते जवा गाय

हंबरून वासराले

हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय

काट्याकुट्या येचायाले जाये माही राणी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानतं नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय

                           कवी – स्व. प्रा.स.ग.पाचपोळ
                           काव्यवाचन – विजय विल्हेकर
————————————————-
काव्यवाचन ऐकण्यासाठी येथे  क्लिक करा.

गाव ब्रम्हांड माझे


गाव ब्रम्हांड माझे

सांगताना अवेळीच सांगू कसे?
पोळलेल्या मनाचे असे हे हसे!

काल गर्दी किती; रांग होती इथे
आटतांना कुणी सोबतीला नसे

हात घेताच हातात का वाटले?
तप्त अग्नीत जळलेय मोती जसे

शिक्षणाने मिळालाय विश्वास की;
चंद्र तारे अता दूर ना फ़ारसे

पिंजरा तोडुनी मी सिमा लांघल्या
गाव ब्रम्हांड माझे “अभय” छानसे

                              – गंगाधर मुटे
———————————————