अभिप्राय : – डॉ मधुकर वाकोडे
श्री गंगाधर मुटे,
स.न.
आपण पाठविलेला ’रानमेवा’ मिळाला.
रानमेवा म्हटले की, त्याची लज्जत काही औरच आणि खरोखर हा संग्रह आस्वाददायी आहे.
आपल्या अनेक कविता आवडल्यात.
किती विविधता आहे आपल्या लेखनात.
गझल, लावणी, अंगाई, बालगीते, तुंबडीगीते, विडंबनगीते, आरती, भावगीत, बडबडगीते, वर्हाडी
……. आणि सारं काही अकृत्रीम.
आपले मन:पूर्वक अभिनंदन.
रानमेवा काव्यसंग्रहाच्या प्रारंभी श्री गणेश वंदना आणि अखेरीस गणपतीची आरती.
खूप बरे वाटले.
हेच तुमच्या स्वाभाविकतेचे गमक.
आरतीच्या तिसर्या कडव्यातील ’आम्ही तुझी लेक’ ऐवजी ’आम्ही तुझे लेक’ (लेकरं या अर्थी) दुरुस्ती केली तर भाषिक दोष दूर होऊन अधिक अर्थपूर्णता येईल.
एक चांगला संग्रह वाचायला मिळाला, याचा आनंद झाला.
पुनश्च अभिनंदन,
– डॉ मधुकर वाकोडे
……… **………….. **…………. **…………..**…………
Khupach chan abp maza wr niwad zalyabaddal kachangaon washiya kadun abhi nadan