४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन
नमस्कार मंडळी,
- तीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.
-
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी “शेती अर्थ प्रबोधिनी” ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.मोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी “युगात्मा परिवार” मोबाईल एप डाउनलोड करा.
http://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app614211
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.