शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २०११

शेतकरी संघटक ६ नोव्हेंबर २०११

वर्ष 28 । अंक 15 । 6 नोव्हेंबर 2011

अंतरंग
जागरण
परिशिष्ट 9 हेच भ्रष्टाचाराच्या राजवटीचे उगमस्थान

सुभाष खंडागळे 3 

————————————————————————–
आजकाल
पोशिंद्यांच्या घरावर तुळशीपत्र

ज्ञानेश्वर शेलार 6 

————————————————————————–
विचार
व्यक्तीकेंद्रीत समाज आणि राष्ट्रीयत्व

संजय कोले 8

————————————————————————–
कॉमन नॉन सेन्स
अण्णा आंदोलनाची छोटी जीत मोठी हार

सुधाकर जाधव 11 

————————————————————————–
स्वातंत्र्य
स्वच्छ समृद्ध जीवन- उत्तरार्ध

विनय हर्डीकर 13 

————————————————————————–
वाङ्‌मय शेती
सणांचे अनर्थशास्त्र

गंगाधर मुटे 21 

————————————————————————–
मिरचीचे खळे
लागले मिठू मिठू बोलायला

बाबू सोंगाड्या 24 

————————————————————————–
अभिजात वाङ्‌मय
गोदान

मूळ लेखक : मुन्शी प्रेमचंद, अनु. अनंत उमरीकर 26 

————————————————————————–
शेतकरी संघटना वृत्त 30

////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

पीडीएफ अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

//////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : भाग-१

.

                                अण्णाच्या सशक्त जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा असला तरी तशी शक्यता दिसत नाही. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असले तरी सध्या जे आंदोलन चाललेय ते आर्थिक भ्रष्टाचाराशी निगडित असल्याने या लेखमालेत आपण केवळ आर्थिक भ्रष्टाचाराची चर्चा करणार आहोत. अण्णांनी जनलोकपालामुळे ६० ते ६५ टक्के भ्रष्टाचार कमी होईल असे म्हटले असले तरी ही टक्केवारी भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या संख्येशी संबंधित आहे की भ्रष्टाचारामुळे होणार्‍या एकूण अपहाराच्या रकमेशी याचा खुलासा झालेला नाही. सशक्त जनलोकपाल विधेयक आले आणि त्याची काटेकोरपणे व इमानेइतबारे अंमलबजावणी झाली असे गृहीत धरून रकमेच्या अनुषंगाने विचार केला तर ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही कारण कोट्यवधीपेक्षा जास्त रकमेचे होणारे भ्रष्टाचार जरी थांबवता आले तरी हे उद्दिष्ट सहज गाठले जाईल.

                मुळातच गेल्या काही वर्षात उच्चपातळीवरील राज्यकर्त्यांचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार उघडकीस आल्याने आणि सरकार या भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्यातच प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, ही बाब जनसामान्याला प्रकर्षाने जाणवू लागल्यानेच जनप्रक्षोभाची कोंडी फुटून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला धार आली आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर अण्णांचे आंदोलन अधिक ठळकपणे जनतेच्या नजरेत भरायला लागले, हे अगदी उघड आहे.

               मात्र भ्रष्टाचार करणार्‍या व्यक्तींच्या एकूण संख्येचा विचार करता कितीही सशक्त जनलोकपाल विधेयक आणले तरी भ्रष्टाचारी व्यक्तींची संख्या एक टक्क्याने देखील कमी होण्याची शक्यता नाही. कारण भ्रष्टाचाराचे मूळ शासन संस्थेतच दडलेले आहे. सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र झाले आहे. उद्योग, व्यापार, व्यवसायाच्या प्रत्येक वाटा लायसन्स-परमिटच्या जाचक बंधनातून जात असल्याने प्रत्येक पायरीवर विराजमान असलेल्या देवी-देवतेला नवस कबूल केल्याखेरीज पाऊल पुढे टाकताच येत नाही. नैवेद्य दाखवल्याखेरीज टेबलामागील देव प्रसन्न होत नाही आणि नवस फेडल्याखेरीज कुणाचेच कार्य सिद्धीस जात नाही. जेथे जेथे म्हणून शासकीय नियंत्रणे आहेत तेथे तेथे भ्रष्टाचाराच्या अमाप संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि मिळालेल्या संधीचे सोने करायचे असते हे प्रत्येकाला पुरते ठाऊक असल्याने “संधीचे सोने” करण्याची संधी कुणीच दवडत नाही.

                  येणारे लोकपाल विधेयक आणि राबविणारी यंत्रणा सुद्धा शासनसंस्थेचाच एक भाग राहणार असल्याने ते भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ ठरण्याऐवजी भ्रष्टाचाराला पूरक आणि पोषकच ठरण्याची शक्यता जास्त आहे. जसे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा असूनही भ्रष्टाचाराला आवर घालता आला नाही, अगदी तसेच लोकपालाच्या बाबतीत घडेल. मात्र यातून दोन गोष्टी चांगल्या घडण्याची शक्यता आहे. पहिली अशी की भ्रष्टाचार करणार्‍यांना या नव्या “सशक्त” व्यक्तींनाही संगनमत करून आपल्यात सामावून घ्यावे लागेल. त्यामुळे अपहाराची जी रक्कम दहा लोकांतच हडप केली जाणार होती तिथे वीस लोकांमध्ये वाटून घ्यावी लागेल, त्या निमित्ताने विकेंद्रीकरणाची सुरुवात झाल्यासारखे होईल. दुसरे असे की या लोकपाल संस्थेला वार्षिक कर्तबगारीचा अहवाल “दमदार” दिसण्यासाठी काही ना काही तरी कार्यवाही करावीच लागेल. त्यामुळे त्यांनी पाच-पन्नास मोठे मासे जरी गळाला लटकवले तरी ६० ते ६५ टक्के रकमेचा भ्रष्टाचार कमी होईल असा अण्णांचा दावा प्रत्यक्षात खरा उतरायला कठीण जाणार नाही; कारण उच्चस्तरीय शासक-प्रशासकांच्या घोट्याळ्यातील रकमेचा आकडाच एवढा प्रचंड आहे की, तो आकडा ऐकताना एखाद्या संवेदनशील माणसाला चक्क “मूर्च्छा”च यावी.

                   अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांपैकी संपूर्ण देशातल्या दारिद्र्यं रेषेखालील सर्व कुटुंबांना अन्न आणि वस्त्र या दोन मूलभूत गरजा एक वर्षासाठी फुकटात पुरवायच्या म्हटले तरी तो खर्च भागून शिल्लक उरेल एवढ्या प्रचंड रकमेचा अपहार एकट्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात झालेला आहे. देशातल्या संपूर्ण शेतकर्‍यांना कर्जबाजारीपणातून एका झटक्यात पूर्णतः मुक्त केले जाऊ शकते एवढ्या किंवा यापेक्षा जास्त रकमेचे क्रित्येक घोटाळे एका-एका व्यक्तीने केले आहेत. चव्हाट्यावर आलेले घोटाळेच जर इतके महाप्रचंड आहेत तर प्रकाशात न आलेल्या घोटाळ्यांची संख्या किती असेल याची कल्पना करताना अंगावर काटा उभारल्याशिवाय राहत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कायद्याच्या कचाट्यात केवळ तेच भ्रष्टाचारी सापडतात ज्यांना रीतसर भ्रष्टाचार कसा करावा, याचे ज्ञान नसते. कायद्याला हवे तसे वाकविण्याचे कौशल्य नसते. मात्र जे पद्धतशीरपणे भ्रष्टाचार करण्यात पारंगत आहेत, ते कधीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. अगदीच स्वच्छ प्रतिमेचे महामेरू म्हणून उजळ माथ्याने मिरवत राहतात. अगदी स्विस बॅंकेत भरभक्कम खातेभरणी करूनही जनतेच्या नजरेत मात्र “बेदाग व्यक्तिमत्त्व” म्हणून अधिराज्य गाजवीत असतात.

                      जोपर्यंत घोटाळ्याच्या रकमा सुसह्य होत्या तोपर्यंत जनतेलाही फारसे नवल वाटत नव्हते कारण “जो तळ्याची राखण करेल तो पाणी पिणारच” हे गृहीत धरले जात होते पण आता पाणी पिण्याऐवजी चक्क तळेच हडप करण्याची भ्रष्टाचार्‍यांची नवी संस्कृती उदयाला आल्याने आजपर्यंतचा सुसह्य भ्रष्टाचार आता असह्य वाटायला लागला आहे. अण्णांच्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळण्याचे गमक यात दडले आहे.

(क्रमश:)                                                                                                          गंगाधर मुटे

———————————————————————————————————————————–

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.

वैदूदादा, वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.

                 घरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय? नगदी फी का देऊ नये? शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात. 

                 खिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती आजतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.

                किंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट “शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.

               शेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.

             विनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.

शहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकर्‍याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का? शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो? शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते? ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही? शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय? की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्‍या होतील असे शहरी माणसाला वाटते?  बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय? बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.

             वरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे. 

               मचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर “मचणे” या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे. 

                   बुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.

                     जेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये “बुढ्याचे मचले हाल” या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.

                       गीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो. 

                   मात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज “पापी पेट का सवाल है” या न्यायाने वैद्याला पेशंटची असायला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,

                “हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक.” 

               या चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून “सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले” असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.

                      खुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी “भले आम्ही देऊ कासेची लंगोटी” असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकला असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.

            या चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.

                                                                                                                                गंगाधर मुटे
———————————————————————————————————

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १

“येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही” अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल, असा आकाशवाणीवर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे. एकदा तर “पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले – शेतकरी चिंताग्रस्त” असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो वगैरे. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधीक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:
१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
———————
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
———————
३) foreca
http://www.foreca.com
——————-
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
——————
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
———————–
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
———————–
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
——————————-
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
——————————–
यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असते. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.
या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास “शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस” असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. “पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे” हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशासाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत?

मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.

क्रमश:
गंगाधर मुटे
———————————————————————————-

अतिरेक्यांनो तुमचे स्वागत आहे

cover

logo
वर्ष २८ ! अंक ८ ! २१ जुलै २०११

अंतरंग

जागरण

अतिरेक्यांनो तुमचे स्वागत आहे

श्रीकृष्ण उमरीकर………………………………………….3

शरदऋतू

आतंकवाद्यांचे भारतावर उपकार

शरद जोशी…………………………………………………..7

आजकाल

न्यायालयीन सक्रीयता की लोकप्रतिनिधींची निष्क्रीयता

ज्ञानेश्वर शेलार…………………………………………..11

मुद्दा

मग चळवळी का थंडावणार नाहीत?

रवि देवांग………………………………………………….14

मधोमध

भारताच्या रोजच्या मृत्यूचे सोयरसुतक कुणाला

दत्ता जोशी…………………………………………………16

कॉमन नॉन सेन्स

मंत्रिमंडळातील फेरबदल : शेतीच्या झारीतील शुक्राचार्यांना बक्षिसी

सुधाकर जाधव…………………………………………….19

आवाहन

बळिराजा डॉट कॉम

गंगाधर मुटे………………………………………………..21

वाङ्‌मय शेती

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

गंगाधर मुटे………………………………………………..23

भारत की जुबानी

सोने की सीढी

ऍड. दिनेश शर्मा…………………………………………..26

(उ)संतवाणी

अलीगढ की पदयात्रा

‘थंडा’ महाराज देगलूरकर………………………………29

शेतकरी संघटना वृत्त     ………………………………31

———————————————————————————————-
शेतकरी संघटक चा पिडीएफ़ अंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
———————————————————————————————

शेतीची सबसिडी आणि “पगारी” अर्थतज्ज्ञ

शेतीची सबसिडी आणि “पगारी” अर्थतज्ज्ञ


सबसिडी कुठाय?
गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जातेशाळाकॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्यावाचण्यात आलाअगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोयपण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीयेबहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की कायकिंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही नाअसा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहेशिवाय शेतीला सबसिडी आहेही बाब निखालस खोटी आहेअसे म्हणण्याचे धाडसही मी करू शकत नाही कारण शेतीची सबसिडी’ हा शब्द उच्चारणारी माणसे सामान्य नसतात. सर्वसाधारण माणसे या शब्दाचे उच्चारणं करीत नाहीत
शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते’ या विषयावर बोलणार्‍यांची नावे बहुधा नागडी नसतात. त्यांचे नावासमोर प्राडॉअ‍ॅड. बॅकॉमानायापैकी काहीना काही तरी लागलेले असतेचआणि जर का यापैकी काहीही नसलेच तर त्या व्यक्तीची तज्ज्ञपत्रकार, लेखक किंवा थोर मानसेवी समाजसेवक म्हणून समाजाने ओळख तरी मान्य केलेली असतेच. ही माणसे जे काही बोलताततेच प्रमाण मानण्याची अनुकरणीय शिकवण आमच्यासारख्या दळभद्री सामान्यजनांना आमच्या पालकांकडून आणि शाळा-कॉलेजातील “पगारी” गुरुवर्यांकडून मिळालेली असल्याने अगर तूम दिनको रात कहे, तो हम रात कहेंगे” असे म्हणण्याखेरीज अन्य काही पर्यायही आमच्यासमोर उपलब्ध नसतो.
आम्हाला जे काही शिकविले जातेते शिकविणार्‍याने पुस्तक वाचून शिकविलेले असतेपुस्तकात जे लिहिले आहेते वास्तवाला धरून आहे की निव्वळ कल्पनाविलासाचे मनोरे आहेत याची शहानिशा त्याने केलेली नसतेच किंबहुना त्याला तसा अधिकारही नसतोचशिवाय ज्याने पुस्तक लिहिले ते त्या विषयातले अनुभवसमृद्ध व्यक्तिमत्त्व असतेचअसेही नाहीएखाद्या विषयाच्या अभ्यासाला अनुभूतीची जोड मिळविण्यासाठी वणवण भटकून, विषयाच्या खोलात शिरून, वास्तविक जीवनमानाशी ताळमेळ जुळविण्याकरिता आयुष्यातील पाचपंचेविस वर्ष खर्ची घातले आणि मग त्या अनुभवअनुभूतीशी वैचारिक सांगड घालून पुस्तक लिहिले, असेही घडलेले नसते.
एखाद्या विषयाचे पुस्तक लिहायचे म्हणजे काय करायचे असतेतर त्या विषयाशी निगडित आधीच लिहिली गेलेली पुस्तके गोळा करायचीत्या पुस्तकातील उतारेच्या उतारे उचलून नव्याने मांडणी करायचीत्यावर लेखक म्हणून आपले नाव घालायचे आणि पुस्तक छापून मोकळे व्हायचेपुस्तकात जे लिहिले आहे त्याचे स्पष्टीकरण करता आले नाही तर नाचक्की होऊ नये म्हणून “हे मी म्हणत नाहीदुसराच कोणीतरी म्हणतो” असे भासवण्यासाठी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर संदर्भग्रंथसुची छापून मोकळे व्हायचे. ही असते पुस्तके लिहिण्याची सरळसोट पद्धत आणि अशा तर्‍हेने लिहिलेली पुस्तकेच शाळाकॉलेजात अभ्यासक्रमासाठी आधारभूत पाठ्यपुस्तके म्हणून निवडली जाताततेच आम्ही शिकतो आणि त्याच पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर स्वत:ला विषयतज्ज्ञ म्हणून मिरवत असतो.
शेतीला सबसिडी
शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जातेअर्थसंकल्पात भरीव तरतूद करून शेतीला मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य केले जाते, असा एक सरसकट सर्वांचा समज आहेआणि हा समज दृढ होण्यामागे वास्तवापासून फ़ारकत घेतलेल्या पुस्तकीज्ञानाचा बडेजावच प्रामुख्याने कारणीभूत आहेअसे खेदाने म्हणावे लागत आहे.
शेतीला सार्वत्रिक स्वरूपात कुठेहीकशातही आणि कोणत्याच मार्गाने थेट सबसिडी दिली जात नाहीया भारत देशाच्या कोणत्याही कोपर्‍यात नव्याने शेती करण्यासाठी किंवा आहे त्या शेतीचा विस्तार करण्यासाठी किंवा अधिक उत्पन्न घेण्यासाठी उत्तेजन म्हणून उद्योगाला दिली जाते त्या धर्तीवर कुठलीच सबसिडी दिली जात नाही किंवा अशा तर्‍हेची शेतकर्‍यांना सरसकट सबसिडी देणारी, ज्यात देशातील एकूण शेतकरीसंख्येपैकी किमान नव्वदपंचाण्णव टक्के शेतकर्‍यांना लाभ होईल अशा तर्‍हेची कोणतीही यंत्रणा अथवा योजना’ याआधीही अस्तित्वात नव्हती आणि आजही नाही.
सबसिडी कंपन्यांना
          शेतकर्‍यांना शेती परवडावी आणि गोरगरीबांना अन्नधान्य स्वस्तात मिळावे म्हणून शेतकर्‍याला सबसिडी दिली जाते असे वारंवार म्हटले जातेपण हे अर्धसत्य आहेकारण शेतकर्‍याला किंवा शेतमालास प्रत्यक्ष सबसिडी दिली जात नाहीशेतीसाठी लागणार्‍या काही निविष्ठाऔजारे यावर सबसिडी दिली जाते पण ती शेतकर्‍यांना नव्हे तर उत्पादक कंपन्यांना दिली जातेरासायनिक खते शेतकर्‍यांना कमी दरात उपलब्ध व्हावे म्हणून रासायनिक खते उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकार सबसिडी देते. आणि या सबसिड्यांचा फायदा कंपन्यांना होतो, शेती किंवा शेतकर्‍यांना नाही.
      अप्रत्यक्षपणे मिळणार्‍या आणखी काही सबसिडी आहेतपण त्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा इतर घटकांनाच जास्त होतोजिल्हा परिषदेला काही शेतकी औजारे सबसिडीवर असतात त्याचा फायदा पुढारी आणी त्यांचे हस्तक यांनाच होतोसाधा स्प्रे पंप पाहिजे असेल तर त्यासाठी जि..सदस्याचे अलिखित शिफारसपत्र लागतेसरसकट सर्व शेतकर्‍यांना किंवा गरजू शेतकर्‍यांना काहीही उपयोग होत नाहीशिवाय या अनुदानित औजारांची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक हजारांश किंवा एक लक्षांश देखिल नसते त्यामुळे अशा सबसिडींचा शेतकर्‍यांना फायदा होतो असे म्हणणे शुद्ध धूळफेक ठरते.
      कृषी विभागाच्या काही योजना असतात उदामच्छीतलावसिंचन विहिरीमोटारपंप वगैरेपण यामध्ये आदिवाशी शेतकरी, भटकेविमुक्त जातीजमातीचे शेतकरीअसे वर्गीकरण असतेम्हणजे या योजनेचे स्वरूप शेतकरीनिहाय नसून जातीनिहाय असतेत्यामुळे अशा योजनांमध्ये शेतकरी सोडून इतरांचीच गरिबी हटतेस्थानिक पुढारी अधिकार्‍यांशी संगनमत करून हात ओले करून घेतातत्यामुळे ज्याच्या शेतात विहीर नाही त्याला मोटारपंप मिळतो आणि ज्याच्या शेतीत फवारणीची गरज नाही त्याला स्प्रेपंप मिळतोअशा अनावश्यक वस्तू फुकटात मिळाल्याने एक तर त्या जागच्या जागी गंजून जातात किंवा तो शेतकरी येईल त्या किमतीत विकून मोकळा होतोअशा योजनांमध्ये सुद्धा लाभार्थी निवडायची संख्या गरजू शेतकर्‍यांच्या तुलनेत एक लक्षांश देखिल नसते.
      शासनाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी भरीव तरतूद केली म्हणून बराच गवगवा होतो. पण ती सर्व तरतूद कृषी विभागाचे कर्मचारी यांचे पगार, भत्ते, वाहनखर्च यातच खर्च होत असावी. शेतकर्‍यांपर्यंत पोचतच नाही. अर्थसंकल्पात शेतीसाठी म्हणून केलेली संपूर्ण तरतूद कृषी विभाग व कृषिविद्यापिठे यांच्या व्यवस्थापनावरच खर्च होत असावी. या अर्थसंकल्पिय तरतुदींचा दुरान्वयानेही शेतकर्‍यांशी सबंध येत नाही.
      दुभती जनावरे, कुक्कुटपालन, मेंढीपालन व ट्रॅक्टर साठी वगैरे कधीकधी थोडीफार सबसिडी दिली जाते, पण याला शेती म्हणता येणार नाही, हे शेती संबंधित व्यवसाय आहेत. त्यामुळे याला शेतीसंबधित व्यवसायाला सबसिडी असे म्हणावे लागेल. शेतीला सबसिडी कसे म्हणता येईल? शिवाय यातही लाभधारकाचे प्रमाण एक लक्षांश देखील नसते.

      प्रत्यक्षात 
शेतकरी घटक’ म्हणून या देशात सार्वत्रिक स्वरूपात शेतकर्‍याला फुकट काहीच मिळत नाहीअशा परिस्थितीत सरसकट शेतकर्‍यांना फुकट किंवा अनुदानित खायची सवय पडली म्हणून कष्ट करण्याची प्रवृत्तीच कमी झाली असा समज करून घेण्यामागे किंवा असा समज करून देण्यामागे काय लॉजिक आहेएकंदरीत शेतकी संबंधित सबसिडीचा विचार करता शेतकर्‍याला काही फायदा होतोअसे दिसत नसतानात्या तुलनेत शेतकी सबसिडीचा ज्या तर्‍हेने डंका पिटला जातोत्याला ढोंगीपणा म्हणू नये तर काय म्हणावे?
याउलट,
औद्योगिक क्षेत्राला मात्र भरमसाठ सबसिडी
      याउलट औद्योगिक क्षेत्राला मात्र भरमसाठ सबसिडी दिली जातेलघु उद्योगांना २५ ते ३५ टक्के रोख स्वरूपात सबसिडी दिली जातेया साठी विविध शासकीय योजना आहेतखादी ग्रामोद्योगजिल्हा लघु उद्योग केंद्र किंवा यासारख्या अनेक शासकीय यंत्रणा आहेतपंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी २५ लाख रुपये कर्ज घेतल्यास त्यावर ३५ टक्के म्हणजे चक्क ८ लाख ७५ हजार एवढी सबसिडी दिली जातेमोठ्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी करोडो रुपयांची सबसिडी दिली जाते.
वेतनधारक व जनप्रतिनिधींनाही सबसिडी
      शासकीय वेतनधारकांना श्रमाचा मोबदला म्हणून वेतन दिले जाते. आमदारखासदारमंत्रीजनप्रतिनिधी यांना श्रमाचा मोबदला मानधन’ या स्वरूपात दिला जातोवेगवेगळे भत्ते दिले जातातवेतनमानधन आणि भत्ते यांना सबसिडी किंवा अनुदान मानले जात नाहीपण येथे एक बाब महत्त्वाची ठरावी ती अशी कि यांना वेतनमानधन आणि भत्ते या पोटी मिळणारी रक्कम श्रमाच्या मोबदल्याच्या तुलनेने शेकडो पटींनी जास्त असतेशासकीय कर्मचारी आणि जनप्रतिनिधींना वेतनमानधन स्वरूपात मिळणारी प्रत्यक्ष रक्कम ही किमान वेतन कायद्यानुसार महिन्याचे एकूण कामाचे तास या हिशेबाने तयार होणार्‍या आकड्याच्या रकमेपेक्षा कैकपटींनी जास्त असतेही वरकड रक्कम एका अर्थाने सबसिडी किंवा अनुदान याचेच अप्रत्यक्ष रूप असतेहे मान्य करायला जड का जात आहे?
शहरी नागरिकानंही सबसिडी
      शेतीचे ओलीत करण्यासाठी शेतकरी शेतात स्वश्रमाने किंवा बॅंकेकडून वा खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज घेऊन विहीर खणतो. या कामात शेतकर्‍याला कसलीच सबसिडी किंवा अनुदान मिळत नाही. त्यावर बॅंका कायदा बासनात गुंडाळून चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करते. थकबाकीदार झाला की त्याच्या शेतीचा लिलाव करून त्याला भूमिहीन करते. शेतकर्‍याला पिण्याच्या पाण्यासाठी विहीरही स्वखर्चानेच किंवा लोकवर्गणी करूनच करावी लागते. आणि जर का दुष्काळ पडून त्या विहिरी आटल्या तर आमच्या मायबहिनिंना कित्येक किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन पाणी आणावे लागते.
      याउलट शहरी माणसाला पिण्याच्या पाण्याची सोय करताना शारीरिक श्रम करून विहीर खोदावी लागत नाही. बॅंकेकडून कर्ज काढून नजिकच्या नदीवरून पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागत नाही. मायबाप सरकारच सरकारी तिजोरीतूनच अब्जावधी रुपये खर्च करून “पाणीपूरवठा योजना” राबवते. शहरी माणसाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर स्वत:लाच करावी लागली असती तर त्याला त्याच्या कुटुंबापुरते पाणी नदीवरून आणायला काही लाख किंवा काही करोड रुपये खर्च आला असता. शिवाय पाणी शुद्धीकरणासाठी खर्च आला असता तो खर्च वेगळाच. बिगर शेतकरी वर्गाला विशेषतः शहरी नागरीकाला शासन जेवढ्या सुखसुविधा पुरविते ती एका अर्थाने अप्रत्यक्ष सबसिडीच असते. या तुलनेने शेतकर्‍याला काहीही फुकट किंवा सवलतीच्या दराने पुरवले जात नाही. उदा. बिगर शेतकरी माणसाला स्वयंपाकाचा गॅस सवलतीच्या दराने पुरवला जातो. शेतकर्‍याला स्वयंपाकासाठी लाकूड-इंधन-सरपण गोळा करायला खर्च येतो, घरात सरपण काही फुकट येत नाही, त्याला फोडायलाही खर्च येतो. त्यावर कुठे सबसिडी दिली जाते?
म्हणजे ज्यांना बराच काही लाभ होतो, त्याची साधी चर्चा देखील होत नाही. अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात वस्तुस्थिती विशद करणारे प्रतिबिंब उमटले जात नाही. आणि ज्याला काहीच दिले जात नाही, त्याला खूप काही देत आहोत, असा डांगोरा पिटला जातो.
धन्य आहेत ते विद्वान महापंडित आणि आमचे “पगारी” अर्थतज्ज्ञ…….!!
काय करावे या “पगारी” अर्थतज्ज्ञांचे? यांचे पाय धुऊन तीर्थ प्यावे की शेतकर्‍यांनी आपल्या चामडीचे पादत्राणे बनवून यांच्या पायात घालावे? शेतकर्‍यांनी नेमके काय करावे म्हणजे या “पगारी” अर्थतज्ज्ञांचे पाय वास्तववादी जमिनीला लागतील?
*   *   *
ताजा कलम :- माफ करामी विसरलो होतोएक गोष्ट मात्र शेतकर्‍याला अगदी फुकटात मिळते.
पीळदार मिशी बाळगणार्‍या शेतकर्‍याच्या घरात जर त्याची बायको गर्भवती असेल तर तिच्या गर्भसंवर्धनासाठी तो पीळदार मिशी बाळगणारा शेतकरी अपात्र आहे असे गृहीत धरून आमचे मायबाप राज्यकर्ते फुकटात मूठभर लोहाच्या लाल गोळ्या तिच्यासाठी घरपोच पाठवतातअगदी दर महिन्यालान चुकता ………! 
आणि
आमची लुळीलंगडीपांगळी मानसिकता पुढार्‍यांच्या साक्षीने टाळ्यांचा कडकडाट करते ….!
…… तुम्ही पण टाळ्या वाजवा….!!
….. बजाओ तालियां….!!!
…… Once more, Take a big hand…..!!!!

                                           गंगाधर मुटे
……………………………………………………………………..

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!

अण्णा, सेवाग्रामला या! दारूने आंघोळ करू…..!!
आदरणीय अण्णा,
                        आपण ’जनलोकपाल विधेयकाच्या’ मागणीसाठी केलेले उपोषण खूप गाजले. चार दिवस सलगपणे विविध वृत्तवाहिन्यांवर अण्णा आणि त्यांचे उपोषण हा एकच विषय गाजत होता. वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून आले. इंटरनेटवरही या विषयाची खूप चर्चा झाली. जगाच्या कानाकोपर्‍यातून पाठिंबा जाहीर करण्यात आला. फ़ेसबूकवरून वेगवेगळ्या तर्‍हेने समर्थन व्यक्त केले गेले. सार्वजनिक संकेतस्थळावर धमासान चर्चा झडल्यात. अनेकांनी आपापल्या ब्लॉगवरून या आंदोलनाची दखल घेतली. शेतकरी संघटनेच्या औरंगाबादला झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत या भ्रष्टाचारमुक्ती अभियानाला सक्रिय पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. आणि सेवाग्राम येथील बापूकुटीसमोर सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत लाक्षणिक उपोषण करून जनलोकपाल विधेयकाला समर्थन देण्याचे भाग्य आम्हालाही लाभले.
                         या विधेयकाच्या समर्थनार्थ संपूर्ण देशातला आमआदमी लढण्यासाठी मैदानात उतरला असला तरी त्यातील किती लोकांना जनलोकपाल विधेयक कितपत कळले हे सांगणे कठीण आहे. पण भ्रष्टाचारावर इलाज व्हायलाच हवा. “काहीच न करण्यापेक्षा, काहीतरी करणे कधीही चांगले” एवढाच विचार करून आणि प्रथमच भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे देशभरातली एवढी आमजनता रस्त्यावर उतरायला तयार झाली असणार, हे उघड आहे.
                     भ्रष्टाचाराचा महाभयंकर राक्षस आटोक्यात येण्याऐवजी वणव्यासारखा पसरून दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण करत आहे. त्यात आमजनता होरपळून निघत आहे. “जगणे मुष्किल, मरणे मुष्किल” अशा दुहेरी कैचीत आमजनता सापडली आहे. या सर्व प्रकारात राजसत्ताच एकतर स्वतः: लिप्त आहे किंवा खुर्ची वाचविण्याच्या मोहापायी हतबल होऊन डोळेझाक करत आहे, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहे, हे आता जनतेला कळायला लागले आहे. त्यामुळे त्यांना संताप व्यक्त करण्यासाठी लढायला एक भक्कम आधार हवा होता; तो त्यांना तुमच्यात दिसला म्हणून आमआदमी नेहमीच्या कोंडलेल्या भिंती ओलांडून बाहेर पडला. त्यासाठी अण्णा तुमचे लक्ष-लक्ष अभिनंदन आणि कोटी-कोटी धन्यवाद!
अभियान नव्हे जनचळवळ
                       भ्रष्टाचार मुक्ती अभियान आता नुसते अभियान राहिले नसून एक जनचळवळ होऊ पाहत आहे. योग्य मुहूर्तावर, योग्यस्थळी या चळवळीची मुहूर्तमेढही रोवली गेली आहे. पण ही चळवळ पुढे न्यायची तर यापुढची वाटचाल नुसती सात्त्विक अथवा भावनिक असून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यासाठी तुम्हाला या लढाईसाठी त्या तोडीचे सवंगडीही शोधावे लागेल. कारण चित्रविचित्र विचारधारा जोपासणारे अनेक विचारवंत एकत्र येणे सोपे असते पण उद्दीष्ट्य साध्य होईपर्यंत एकत्र टिकणे महाकठीण असते. त्यांच्यात आपसातच फार लवकर पोळा फुटायला लागतो, हा पूर्वानुभव आहे.
                         अण्णा, जेव्हा तुम्हाला नगर जिल्ह्यात सुद्धा पुरेशी प्रसिद्धी मिळाली नव्हती तेव्हापासून म्हणजे १९८५-८६ पासून तुम्हाला मी ओळखतो. तुमच्या कार्यशैलीवर मी तसा बारकाईने लक्ष ठेवून आहे. या देशातल्या सबंध गरिबीवर मात करता येईल असा काही कार्यक्रम तुम्ही हाती घ्याल, अशा आशाळभूत नजरेने मी तुमच्याकडे सदैव पाहत आलोय. पण माझी निराशाच झाली हे मी नाकारण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या कार्याचे मोल कमी आहे असे मला म्हणावयाचे नाही आणि जेव्हा देशभरातून तुमच्या कार्याचा गौरव होत असताना माझ्यासारख्या एका फ़ाटक्या माणसाने एक वेगळाच सूर काढणे हेही शोभादायक नाही. पण तुम्ही दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करून या देशातल्या लक्षावधी खेड्यांमधल्या एकाही माणसाला “दुसरा अण्णा” बनून आपल्या गावाचे “राळेगण सिंदी” करता आलेले नाही. अगदी मला सुद्धा तुमचा कित्ता गिरवून माझ्या गावाचे रुपांतर “राळेगण सिंदी” सारख्या गावामध्ये करता आलेले नाही.
एवढे अण्णा कुठून आणायचे?
                      अण्णा, एकेकाळी क्रिकेटमध्ये भारतात वेगवान गोलंदाज ही दुर्मिळ गोष्ट होती, पण कपिलदेव आले आणि मग त्यांचे अनुकरण करून मोठ्या प्रमाणावर वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागलेत.
ज्याला “भारतरत्न” म्हणून गौरविण्यात केंद्रसरकारने चालढकल चालविली त्या सचिन तेंडुलकरने तर फलंदाजीची व्याख्याच बदलून टाकली आणि सचिनचे अनुकरण करून गावागावात चेंडू सीमापार तडकवणारे फलंदाज तयार झालेत.
                        सर्व रोगावर रामबाण इलाज म्हणून प्राणायाम आणि योगाभ्यासाचे धडे स्वामी रामदेवबाबांनी दिले आणि अल्पकाळातच जनतेने अनुकरण केले आणि देशभरात हजारो “रामदेवबाबा” तयार झालेत.
                    “शेतकर्‍यांचे मरण हेच सरकारचे धोरण” असून “शेतमालास रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला” त्यासाठी “भीक नको घेऊ घामाचे दाम” असा मंत्र शरद जोशींनी दिला आणि पिढोन्-पिढ्या हतबलपणे जगणारा शेतकरी खडबडून जागा झाला.
शरद जोशींचे अनुकरण करूनच गावागावात लढवय्ये शेतकरी तयार झालेत.
याउलट
                    संपूर्ण देशातील खेड्यांची “राळेगणसिंदी” करायचे म्हटले तर त्यासाठी काही सरकारी ठोस योजना बनत नाही कारण कदाचित ती अव्यवहार्य असेल. मग सरकारी तिजोरीतून गंगाजळी आपापल्या गावापर्यंत खेचून आणायची तर प्रत्येक गावात एकेक अण्णा हजारे जन्मावा लागेल. आणि अशी कल्पना करणेसुद्धा अशास्त्रीय आणि अव्यवहार्य आहे.
                      अण्णा, आपला देश हा नेहमीच चमत्कारिक व्यक्तिमत्त्वाच्या मागे धावणारा आणि व्यक्तीपूजक राहिला आहे. त्यामुळे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या कार्याची व्यावहारिक पातळीवर “चर्चा” करणे एकतर मूर्खपणाचे मानले जाते किंवा निषिद्धतरी मानले जाते. त्यामुळे बाबा आमटे, अभय बंग, अण्णा हजारे किंवा सिंधुताई सपकाळ ही व्यक्तिमत्त्वे उत्तुंग असली तरी यांच्या कार्यामुळे एकंदरीतच समाज रचनेवर, संस्कृतीच्या उत्क्रांतीवर, प्रशासकीय यंत्रणेवर आणि नियोजनकर्त्या निगरगट्ट राज्यकर्त्यांच्या धोरणांवर काहीही प्रभाव पडत नाही, हे सत्य असूनही कोणी स्वीकारायला तयार होत नाही.
जनलोकपाल विधेयक
                          अण्णा, “जनलोकपाल विधेयक” यायलाच हवे. त्यासाठी तुमच्या समर्थनार्थ मी माझ्यापरीने यथाशक्ती प्रयत्न करणारच आहे. पण या विधेयकामुळे काही क्रांतीकारी बदल वगैरे घडून येतील, या भ्रमात मी नाही. मानवाधिकार आयोगाचा फायदा ’कसाब’ला झाला पण या देशातल्या कष्टकरी जनतेला वेठबिगारापेक्षाही लाजिरवाणे जीवन जगावे लागते, शेतकर्‍यांना आयुष्य संपायच्या आतच आपली जीवनयात्रा संपवावी लागते. देवाने दिलेल्या आयुष्यभर जगण्याच्या त्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यास मानवाधिकार आयोग कुचकामी ठरला आहे. माहितीच्या अधिकाराचा उपयोग या देशातल्या सव्वाशेकोटीपैकी फक्त मूठभर लोकांनाच झाला. त्यामुळे तुम्ही ज्या मार्गाने वाटचाल करताहात त्यामुळे आमजनतेचे फार काही भले होईल असे मला वाटत नाही.
                       अण्णा, तुम्ही ४-५ दिवस दिल्लीला उपोषण केले आणि आम जनतेच्या नजरेत “हिरो” झालेत. कदाचित हिच आमजनता तुम्हाला एक दिवस “महात्मा” म्हणून गौरवायला मागेपुढे पाहणार नाही. तुमच्या समर्थनार्थ मैदानात उतरायला लागलीच आहे. त्यामुळे मूठभर लोकांच्या नव्हे या “आमजनतेच्या” आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे काही क्षण निर्माण होण्यासाठी तसे थेट प्रयत्न करणे ही आता तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नुसती सात्त्विक अथवा भावनिक आंदोलने करून भागणार नाही तर त्यासाठी तर्कसंगतीची जोड लागेल, अभ्यासपूर्ण वास्तवाचे भान लागेल. करावयाच्या उपाययोजनांची नेमकी जाण लागेल. त्यानुरूपच पुढील वाटचाल करावी लागेल.
                          अण्णा, तुमचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे. पण कायद्याने सगळे प्रश्न सुटत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कायदा करून उपयोगाचा नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. दुर्दैवाने कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही, नाही तर आहे तेच कायदे खूप आहेत. त्यामुळे प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी पुन्हा नवा कायदा किंवा विधेयक हे काही रामबाण औषध ठरू शकत नाही.
                              याउप्परही तुम्हाला कायदा आणि विधेयके आणली म्हणजे प्रश्न चुटकीसरसी सुटतात, असे वाटत असेल तर मग या वर्धेला. हा जिल्हा महात्मा गांधीजींच्या पावनस्पर्शाने पवित्र झाल्यामुळे फार पूर्वीपासून येथे संपूर्ण जिल्हाभर कायदेशीर दारूबंदी आहे. पण याच जिल्ह्यात पावलापावलावर हवी तेवढी दारू, अगदी ज्या पाहिजे त्या ब्रॅंडमध्ये उपलब्ध आहे आणि गावठीही मुबलक उपलब्ध आहे.
                        नाही खरे वाटत? मग या सेवाग्रामला बापुकुटीसमोर. येताना एकटेच नका येऊ, हजारो कार्यकर्त्यांसह या आणि येथे दारूनेच आंघोळ करा. हजारो लोकांना आंघोळ करायला पुरून उरेल एवढी दारू एकटे सेवाग्राम हे गावच पुरवेल, याची मला खात्री आहे.
कायद्याच्या राज्याचा विजय असो!
                                                                                  गंगाधर मुटे
——————————————————————-
(प्रकाशित : “शेतकरी संघटक” २१ एप्रिल २०११)
——————————————————————-

मीमराठी बक्षिस समारंभ


मेहता पब्लिकेशन हाऊस आणि मी मराठी.नेट (
http://www.mimarathi.net 
यांच्या संयुक्त विद्यमाने “लेखन स्पर्धा २०१०” ही आंतरजालीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
अधिक माहिती या दुव्यावर मिळेल. http://www.mimarathi.net/node/5216
या स्पर्धेत “वांगे अमर रहे…!”
या ललित लेखाला पारितोषक मिळाले आहे.
………………………………………………
हा लेख खालील दुव्यावर वाचता येईल.

……………………………………………..

या स्पर्धेमधे २०७ प्रवेशिका पात्र ठरल्या होत्या.
स्पर्धेसाठी 
श्री. शंकर सारडा
श्री. प्रविण टोकेकर
श्री. रामदास
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
……………..

१९ मार्च रोजी लेखन स्पर्धा २०१०-२०११ बक्षिसं समारंभ ठाणे येथे संपन्न झाला,

दिवस : १९ मार्च, २०११.
वेळ : ४.०० ते ७.०० संध्याकाळी.
पत्ता :
लक्ष्मी केशव मंगल कार्यालय, प्रताप सिनेमा समोर, कोलबाड रोड, खोपट, ठाणे (प).

…………………

लेखन स्पर्धा बक्षिस समारंभाची काही – क्षणचित्रे

(सर्व छायाचित्र श्री रोहन चौधरी आणि मी मराठी डॉट नेट च्या सौजन्याने.)



****


******

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?
              जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही. त्यांच्या मते कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन जर शेतीमध्ये वापरले गेले तर या समग्र भारत देशातल्या शेतीत क्रांतीकारी बदल घडून येतील आणि शेती व्यवसायाची प्रचंड भरभराट होईल.
         कृषी विद्यापीठातील संशोधक, विषयतज्ज्ञ, आणि स्वतः कुलगुरू यांच्याही बोलण्याचा रोख कायमच उपदेशात्मक असतो. जणू काही शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी परमेश्वराने यांना ’प्रेषित’ म्हणूनच भूतलावर जन्माला घातले आहे.
         दरवर्षी या विद्यापीठांना पोसण्यासाठी शासकीय तिजोरीतून प्रचंड खर्च केला जातो. त्याबदल्यात संशोधन काय केले जाते, याचाही आढावा घेणे गरजेचे आहे, अशी मात्र कोणालाच गरज भासत नाही. ऊस, केळ, ज्वारी, गहू, बाजरी, तूर,सोयाबीन वगैरे मुख्य पिकांसंदर्भात क्रांतीकारी संशोधन करण्यास किंवा त्या-त्या पिकाच्या क्रांतीकारी जाती,प्रजाती अथवा संकरित वाणाचे संशोधन करण्यात अजूनही या कृषी विद्यापीठातील संशोधकांना फारसे यश आलेच नाही, याकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
        पाऊस गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पडला तरी तग धरेल, बदलत्या हवामानाचा प्रतिकार करून चांगले उत्पन्न देऊ शकेल, अशा तर्‍हेचे वाण अजूनही संशोधित करण्यात यश आलेले नाही. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस पाऊसपाण्याविषयी अनुमान वर्तविण्यात येत असते. पण यांच्या अनुमानात आणि एकंदरीत पाऊस पडण्यात कुठेही ताळमेळ दिसत नाही. याउलट यांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले की हमखास त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून कोरडा दुष्काळ पडतो आणि यांनी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकीत केले की त्यावर्षी अती पाऊस पडून हजारो एकर जमीन पाण्याखाली बुडून ’’ओला दुष्काळ” जाहीर करावा लागतो. 
         सलग दोन-तीन वर्षे पाऊस कमी पडला की, “शेतकर्‍यांनी प्रचंड वृक्षतोड केली म्हणून निसर्गाचा समतोल बिघडला” असा घासून पिटून गुळगुळीत झालेला एकमेव निष्कर्ष काढून ही मंडळी मोकळी होतात. त्यापुढे काही यांच्या संशोधनाची मजल जात नाही. मग शासनाच्या कृषी विभागाच्या मदतीने व सरकारी पैशाने “वृक्ष लावा, निसर्ग वाचवा” “पाणी अडवा, पाणी जिरवा” यासारख्या प्रचारकी थाटाच्या मोहिमा हाती घेतल्या जातात. अशा मोहिमांवर प्रचंड आर्थिक खर्च केला जातो, पण ही मंडळी (साहेब असल्यामुळे) स्वतः झाडे लावत नाहीत, आणि जनतेचा यांच्या शब्दावर विश्वास नसल्याने जनताही झाडे लावण्याच्या फंदात पडत नाहीत. निदान या मंडळींनी स्वतः काही झाडे लावली असती तर काही उपयोग तरी झाला असता, काही झाडे तरी लावल्या गेल्याचे समाधान मिळाले असते पण साहेबांनी झाडे थोडी लावायची असतात? साहेबांनी शारीरिक श्रमाची कामे करायचीच नसतात, शारीरिक श्रमाची कामे करण्यासाठी देवाने शेतकरी नावाचा प्राणी जन्माला घातला आहे, त्यानेच खड्डे खोदायचे, झाडे लावायची, असा या मंडळींचा पक्का समज असतो. त्यामुळे ही मंडळी सल्ले द्यायची कामे तेवढी करीत राहतात आणि शेतकरी यांच्याकडे कुतूहलाने बघत असतात. आणि यदाकदाचित काही झाडे लावली गेलीच तरी त्या झाडांचे आयुष्य फार तर महिना-दोन महिन्याचेच असते. कारण नंतर त्या झाडांचे संगोपनाचे पालकत्व कुणाकडेच नसते. 
       एवढी सगळी मोहीम राबवूनही नवीन झाडे काही लागले जात नाहीत. झाडे-झुडपे-जंगल आहे तोच असतो. तेवढ्यातच नवा पावसाळा सुरू होतो. आणि पाऊस धुवांधार कोसळायला लागतो. पाऊस एवढा कोसळतो की, पाऊस पडण्याचे सर्व उच्चांक मोडीत निघतात. “प्रचंड वृक्षतोडीमुळे पावसाचा तोल बिघडला” या अतीअभ्यासांती काढलेल्या सिद्धांताचे बारा वाजतात.
      शेतीच्या औजाराच्या संशोधनाबद्दलही तेच. विद्यापीठांनी शेतीसाठी बहुउपयोगी औजार बनविले आणि ते शेतीसाठी फारच उपयोगी ठरत आहे, असेही फारसे कधी घडत नाही. शेतीसाठी लागणार्‍या औजारामध्ये दोर-दोरखंड, कुळव-तिफण, कुर्‍हाड-पावडे वगैरे साहित्याचे डिझाइन गावातले कारागीर, ज्यांना अधिकृतपणे अकुशल मानले जातात तेच कारागीर करतात. लोखंडी नांगर, फवारणी यंत्र, मोटारपंप, यापासून ते टॅक्टरपर्यंतचे सर्व डिझाइन खाजगी कंपन्या करीत असतात, या क्षेत्रातही कृषी विद्यापीठातील संशोधकांचे योगदान नगण्यच आहे. 
      संपूर्ण देशातील कृषी विद्यापीठांनी थोडीफार कामगिरी केली असे एकमेव क्षेत्र आहे बियाणे संशोधन. कृषी संशोधकांनी संकरित बियाणात संशोधन करून नवे वाण निर्माण केले, पण अधिक उत्पन्न देणारे संकरित वाण केवळ कापूस, ज्वारी आणि टमाटर या पिकांपुरतेच मर्यादित राहिले. गहू, तूर, हरबरा, सोयाबीन, उडीद, मूग, भात, भुईमूग या पिकामध्ये अजूनपर्यंत तरी भरघोस उत्पन्न देणारे संकरित वाण निर्माण झाले नाही. निवड पद्धतीने सुधारीत जाती तयार होण्यापलीकडे अजून तरी बियाणे संशोधकांची झेप गेलेली नाही. पण बियाणे संशोधन विभागातही कृषिविद्यापीठांची मोलाची भूमिका आहे, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही.
         १९७० च्या सुमारास गुजरात विद्यापीठाने कपाशीमध्ये एच-४ नावाचे संकरित वाण तयार केले, त्यानंतर त्यांना दुसरे दर्जेदार संकरित वाण निर्माण करण्यास फारसे यश आले नाही. नाही म्हणायला एच-६, एच-८ संकरित वाण त्यांनी आणले पण ते वाण बदलत्या हवामानात फ़ारकाळ टिकू शकले नाही. त्याचप्रमाणे १९८०   च्या सुमारास मराठवाडा कृषिविद्यापीठाने एनएचएच-४४ व पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठाने एएचएच-४६८ या दोन कापसाच्या संकरित जाती निर्माण करण्याखेरीज संकरित बियाणे संशोधनात फार काही मौलिक संशोधन केलेले नाही, हे उघड आहे. 
      पण हे सर्व संशोधन पंधरा-वीस वर्षापूर्वीचे आहे, आणि हे सर्व संकरित वाण आता शेतीतून हद्दपार झालेले आहे.
     या उलट गेल्या वीस वर्षात खाजगी कंपन्यांनी मात्र बियाणे क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. जवळ-जवळ सर्वच पिकांमध्ये स्वतः संशोधन करून स्वसंशोधित बियाणे बाजारात आणले आहे आणि त्यालाच शेतकर्‍यांची पसंती मिळाली आहे.
      २०१०-११ हा खरीप हंगाम शेतीसाठी प्रतिकूल असूनही केवळ बीटीयुक्त बियाणे शेतीमध्ये पेरले म्हणून कापसाचे बर्‍यापैकी उत्पादन आले आहे. आणि कापसाची निर्यात सुरू आहे म्हणून कापसाला विक्रमी भाव मिळत आहे. कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर ती बिटी बियाणे संशोधित करणार्‍या मोन्सॅटो कंपनीची किमया आहे. कापसाला चांगले भाव मिळत असेल तर ती मुक्तअर्थव्यवस्थेची किमया आहे. मग कापूस उत्पादकांच्या आयुष्यात कदाचित चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण होत असेल तर यात शासन किंवा कृषिविद्यापीठांचे काय योगदान आहे?
            पण हे सत्य कोणी मानायलाच तयार नाही. कृषिविद्यापीठांनी गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाच्या समर्थनार्थ ते गाढाभर कागदपत्रांचा दस्तऐवज सादर करायला नेहमीच उतावीळ असतात. पण कागदोपत्री संशोधनाच्या आधारे पीएचडी, डी लिट वगैरे मिळू शकते, पण शेती पिकवायसाठी बियाणे-खते-कीटकनाशके लागतात, कागदपत्री दस्तऐवज हे काही पिकांचे खाद्य नाही. शिवाय या दस्तऐवजांचे सेंद्रिय खतात रूपांतर केले आणि पिकाला खाऊ घातले तर जास्तीत जास्त क्विंटल-दोन क्विंटल अन्नधान्य पिकू शकेल, पिकाच्या भाषेत या दस्तऐवजाला यापेक्षा जास्त काही अर्थ उरत नाही. मुलांची भाषा ज्याला चांगली कळते तोच चांगला पालक. ज्याला विद्यार्थ्याची भाषा कळत नाही तो शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाही, अगदी तसेच, ज्याला पिकांची भाषा कळत नाही तो शेतीमध्ये चांगले संशोधन करूच शकत नाही.
         पण दुर्दैवाने विद्यापीठीय शेतीसंशोधक आणि प्रत्यक्ष शेती यांचा अर्थाअर्थी काहीही संबंधच राहिलेला नाही. शेतीचे अर्थशास्त्र यांना कळत नाही कारण शेती किंवा शेतीसंशोधन याऐवजी शासकीय अनुदानावर यांचे प्रपंच चालतात. आणि निसर्गाचा लहरीपणा, हवामान, पाऊसपाणी किंवा ओला-कोरडा दुष्काळ यांचेशी शासकीय अनुदानाचा काहीही संबंध नसतो. अनुदान हे हमखास पीक असते.
        कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमीन आहे. सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनीच गेल्या पन्नास वर्षात केलेल्या संशोधनाची शिदोरी आहे. मग कृषी विद्यापीठांना अनुदानाची गरज का पडावी? आता एकदा सर्व विद्यापीठांचे अनुदान बंद करून यांना सांगण्याची गरज आहे की, बाबा रे, निव्वळ सल्ले देणे खूप झाले, या विद्यापीठाच्या हजारो एकरावर तुमच्याच संशोधनाच्या आधारे आता शेती करून किमान पाच वर्ष तरी जगून दाखवा, प्रपंच चालवून दाखवा आणि शेती करून होणार्‍या मिळकतीवर विद्यापीठाचे सर्व कारभार अनुदान न घेता चालवून दाखवा.
“आधी केले मग सांगितले” यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.
      पण ज्या विद्यापीठांना शेतीतील गरिबीचे कारण शेतीत उत्पादित केलेल्या मालास “उत्पादन खर्च भरून निघेल” एवढाही भाव मिळत नाही, यात दडलेले आहे, हेच अजूनपर्यंत कळलेले नाही, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा करणे, हेच मूर्खपणाचे आहे.
                                                                                       गंगाधर मुटे  
—————————————————————————————————————–                                                                                      

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग

सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग.

                 बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढीस लागला आहे. नत्र,स्फ़ुरद, पालाश या मुख्य खतांसोबतच सुक्ष्मखतांचा (Micro nutrient fertilizers) वापर वाढला आहे. पैकी नत्र,स्फ़ुरद,पालाश या मुख्य खतांची निर्मीतीसाठी प्रचंड गुंतवणुकीचे कारखाने लागतात.

परंतू सुक्ष्मखतांची (Micro nutrient fertilizers) निर्मीती किंवा प्रक्रिया-पॆकिंग करून विपनन करणे हा उद्योग/व्यवसाय म्हणुन अत्यंत चांगला पर्याय ठरू शकतो.
या अनुषंगाने इच्छूकांना मदत व्हावी या उद्देशाने येथे काही कृषीसंबधित करता येण्याजोग्या उद्योगांची एक यादी बनविण्याचा प्रयत्न करित आहे.


१) सुक्ष्मखते (Micro nutrient fertilizers)
पिकांच्या जोमदार वाढीसाठी १६ मुलद्रव्यांची (elements) आवश्यकता असते. त्यापैकी Fe, Zn, Mn, Cu, B, Mo, Cl हे प्रमुख मुलघटक असुन यांच्या एकापेक्षा अधिक मुलघटकांच्या योग्य त्या प्रमाणात मिश्रणाला सुक्ष्मखते म्हणतात. सध्या या सुक्ष्मखंतांना प्रचंड मागणी आहे.
मुलद्रव्यांची (elements) नांवे खालील प्रमाणे.
1) Copper sulphate (CuSO4.5H2O)
2) Zinc sulphate (ZnSO4.7H2O)
3) Borax or Sod.Borate (Na2B4O7.10 H2O)
4) Manganese Sulphate (MnSO4.4H2O)
5) Ammonium Molybdate ( (NH4)6Mo7O24.4H2O)
6) Ferrous sulphate (FeSO4.7H2O)
7) Magnesium sulfate (or magnesium sulphate)
………………………………………………………………………
२) जैविक खते (Bio-fertilizers)
A. Nitrogen fixers
Symbiotic: – Rhizobium, inoculants for legumes.
Non-symbiotic: – For cereals, millets, and vegetables.
a) Bacteria:-
i). Aerobic:-Azatobacter, Azomonas, Azospirillum.
ii) Anaerobic:- Closteridium, chlorobium
iii) Facultative anaerobes- Bacillus, Eisherichia
b) Blue green algae- Anabaena, Anabaenopsis, Nostoe
A. Phosphate solubilizing micro-organisms.
B. Cellulolytic and lignolytic micro-organisms.
C. Sulphur dissolving bacteria.
D. Azolla.
………………………………………………………………………….
३) संप्रेरके – फ़वारणीच्या माध्यमातुन वापर केला जातो.
पिकांची कायीक वाढ, फ़ळांची गुणवत्तासुधारणा, पिकांचा कालावधी
कमि-जास्त करणे वा तत्सम कारणासाठी संप्रेरके वापरली जातात.
सध्या वापरात असलेली काही मुख्य संप्रेरके.
१) आमिनो अ‍ॅसिड – Amino Acid.
२) जिबरेलिक अ‍ॅसिड – Gibberellic acid (also called Gibberellin A3, GA, and (GA3)
३) नॆपथ्यालिक अ‍ॅसेटिक अ‍ॅसिड – NAA
४) ह्युमिक ऎसिड – Humic acid – Fulvic acid organic plant food and root growth promoters
……………………………………………………………………………
१) या उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र,खादी-ग्रामोद्योग वा इतर शासकिय विभागांकडून बिजभांडवल स्वरूपात अर्थसाहाय्य होऊ शकते.
२) वर उल्लेखिलेले बहुतांश उद्योग २५ लाखाचे आंत असल्याने पंतप्रधान रोजगार योजनेंतर्गत सबसिडी मिळण्यास पात्र आहेत.
वरिल सर्व उत्पादनांना चांगली मागणी असून मालाची गुणवत्ता व मार्केटिंग
कौशल्य या दोन बाबींच्या आधारावर सहज यशप्राप्ती होऊ शकते.
.शुभेच्छासह.
.
गंगाधर मुटे.

—————————————————————————————————-

०३-०७-२०१३

टीप : शेतीविषयक सल्ला विचारणारे अनेक प्रश्न या लेखावर वाचकांकडून प्रतिसादामार्फ़त उपस्थित केले जातात. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी माझ्याकडे काहीही यंत्रणा नसल्याने मी कुणालाच फ़ारशी व्यक्तिगत मदत करू शकत नाही.
यावर पर्याय म्हणून मी http://www.baliraja.com/ या साईटवर काही पर्यायी व्यवस्था उभारायचा प्रयत्न केला परंतू अजूनपर्यंत तरी मला यश आलेले नाही.
त्यामुळे सल्ला अथवा मदतीची अपेक्षा असलेले प्रश्न प्रतिसादातून विचारले जावू नयेत. ही विनंती.