अस्सल देशी हायकू(?)

अस्सल देशी हायकू(?)

हायकू हा एक मस्त काव्यप्रकार, मुळचा जपानी (असे म्हणतात)
हा प्रकार मला खुप आवडला.
हायकूच्या तंत्राबद्दल पुरेशी माहीती व्हायचीय.
होईल यथावकाश. तोपर्यंत…
अस्सल देशी हायकू(?) सादर.

१)
टीव्ही,मि़क्सर,बाईक जापानी
आता हायकुही जापानीच
फ़क्त बायकू तेव्हडी भारतिय उरली. 😦
२)
त्याला बघून वेणी थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
सुपारी लागली असेल बहुतेक.
३)
डांबर,सिमेंट,गिट्टी खायची नसते
आहार शास्त्रात बसत नाही
पोटविकार-तब्बेतीस हानीकारक असते.
४)
जन्मास घालतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी….??
मला टाळक्याची गरज नव्हती… मी टवाळकी निवडला.
काही चुकलय माझं…??? 🙂 🙂
५)
आडदांड सोसाट्याचा वारा सुटला तेव्हा
ढगांनी आकाशात गर्दी करून जाळे विणले.
हवेच्या रेट्याने चंद्र घसरला तर तो जमिनीवर पडू नये म्हणुन. 😀

गंगाधर मुटे