लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन
 
             कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती, कांद्याच्या बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप आणि तंत्रज्ञानावर बंधने नको, या प्रमुख मागण्या ऐरणीवर आणून केंद्र शासनाच्या कांदा-बटाटा विषयक धोरणाला जोरदार हादरा देण्यासाठी आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे दिनांक १४ ऑगष्ट २०१४ ला दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत १ तासाचे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. श्री. शरद जोशी यांनी केले.
 
             लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दीड किलोमीटर अंतरावरील लासलगाव रेल्वेस्थानकापर्यंत शेतकरी संघटनेचे सहा हजार आंदोलक पाईक घोषणा देत प्रचंड मिरवणूक काढून गेले व रेल्वेट्रॅकवर ठाण मांडून बसले. सुमारे एक तास मनमाड-इगतपुरी ही शटल रेल्वे गाडी अडविण्यात आली. रेल्वेट्रॅकवर पत्रकारांशी वार्तालाप करताना मा. शरद जोशी म्हणाले की, सत्तेवर येताच मोदी सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा सपाटा लावला आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्यामुळे कांदा २०० ते ३०० रुपयांनी घसरला असून यापुढे कांदा उत्पादकांचा शासनाने अंत पाहू नये अन्यथा १९८० सालच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करीत राज्यव्यापी रेल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मोदी सरकार वांधा करणारा निर्णय घेणार असेल तर शेतकरी मतपेटीतून त्याचा रोष प्रकट करतील आणि त्याचे गंभीर परिणाम मोदी सरकारला भोगावे लागतील, त्यामुळे निर्णयाचा फेरविचार करण्याचे त्यांनी मोदींना आवाहन केले.
 
             पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक माणुरी कांगणे, चंद्रमोहन मिश्रा, ए.के. स्वामी यांचेसह आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आलेले होते तरीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शांततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करून दाखविले. शेतकरी देशाचा खराखुरा राजा असून तो देशाच्या साधनसंपत्तीची नासधूस करीत नाही. जाळपोळ, आगी लावणे, लूटमार करणे, दगडफेक करणे हे सच्च्या शेतकर्‍याला आवडत नाही, हे या शांततापूर्ण रेल्वे रोको आंदोलनाने सिद्ध केले. खरंतर रेल्वे अडवणे हेही शेतकर्‍यांचे काम नाहीच पण;
 
आसुड उगारणारा माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या मग्रूर लांडग्याने
 
असे स्वत:च्या मनाशी म्हणतच तो नाईलाजाने रस्त्यावर उतरत असतो. पण नाईलाजाने का होईना पण जेव्हा केव्हा उतरतो तेव्हा तेव्हा शासनसत्तेला हादरवून सोडतो. तद्वतच याही प्रसंगी शेतकरी संघटना, शरद जोशी जिंदाबाद आणि प्रमुख मागण्यांच्या घोषणांनी त्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता.
 
             मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व आंदोलनकर्ते अपसाईडच्या लूप लाईनवर ठिय्या मांडून बसले. मनमाड-इगतपुरी शटलचे आगमन होताच इंजिनवर बसून कार्यकर्त्यांनी गाडी रोखून धरली. शेतकर्‍यांनी गळ्यात कांदा, बटाट्याच्या माळा घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रेल्वेगेट बंद असल्यामुळे मनमाड लासलगाव मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे रस्ता रोकोही अनायासे सफल झाला होता. ठीक ४ वाजता या आंदोलनाचे सेनापती गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी छोटेखानी समयोचित भाषण करून सर्व आंदोलकांचे व उत्तम तर्‍हेने परिस्थिती हाताळल्याबद्दल पोलिस खात्याचे आभार मानले व रेल्वे रोको आंदोलन समाप्तीची घोषणा केली.
 
             तत्पूर्वी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता कांदा उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी म्हणाले की, केंद्र शासनाचे कृषी विषयक धोरण शेतकरीविरोधी असून मागील सरकारचीच धोरणे मोदी सरकार पुढे नेत आहे. कांदा, बटाट्यासारख्या नगदी पिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शुद्ध हरवलेल्या सरकारच्या नाकाला आता कांदा फोडून लावण्याची वेळ आली आहे. सरकारने शेतकर्‍यांचा अधिक अंत न पाहता कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून त्वरित वगळला पाहिजे. शेतमालाला खुल्या बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य अशी शेतकरी संघटनेची दोन प्रमुख उद्दिष्टे असून कोणत्याही सरकारने शेतमालाच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नये. कांदा, बटाट्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घातल्याने या दोन्ही शेतमालाची वाहतूक करता येत नाही, उत्पादनावर बंधने आली आहेत, प्रक्रियेवर बंधने आली आहेत व साठवणुकीवर बंधने घालण्यात आली असल्याने ते आम्हाला मान्य नाही. केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकर्‍यांवर अन्याय करीत असून, या सरकारचे पानिपत करण्याची ताकद शेतकरी संघटनेत आहे. कांदा हा जीवनावश्यक नसून, कांदा न खाल्ल्याने आजपर्यंत कोणी दगावला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषी क्षेत्र दिवसेंदिवस संकुचित होत असून, त्यात होणारी वाढ असून नसल्यासारखी आहे. दुसरीकडे लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असून, ४०० पट वाढलेल्या लोकसंख्येला पुरेल एवढा अन्नसाठा शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर उभा करून दाखविला म्हणून ही लढाई तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. केवळ शेतकर्‍यांमध्ये जागृती करून शेतकरी संघटना थांबणार नाही, तर शेतकर्‍यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य व तंत्रज्ञान मिळावे, यासाठी शेतकर्‍यांचा पक्ष स्थापन करण्याचे संघटनेने ठरवले आहे. मात्र या आंदोलनात महिलांचा सहभाग नसल्याबद्दल मा. शरद जोशी यांनी खंत व्यक्त केली.
 
             लासलगाव येथे शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या रेलरोको आंदोलनापूर्वी बाजारसमितीमध्ये झालेल्या विराट सभेच्या व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष डॉ. मानवेंद्र काचोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष अ‍ॅड दिनेश शर्मा, अ‍ॅड वामनराव चटप, रवी देवांग, रामचंद्रबापू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैलेजा देशपांडे, स्मिता गुरव, निर्मलाताई जगझाप, अर्जुन तात्या बोराडे, देविदास पवार, संजय कोल्हे, तुकाराम निरगुडे आदी शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. प्रारंभी लासलगाव बाजार समितीत सभापती नानासाहेब पाटील यांनी शरद जोशी व इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
 
             आंदोलनात किसनराव कुटे, शिवाजीराव राजोळे, दत्तात्रय मोगल, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, भास्कर सोनवणे, शांताराम जाधव, फुलाआप्पा, बाबासाहेब गुजर, विष्णू ताकाटे, रामकिसन बोंबले, डॉ. श्याम आष्टेकर, गिरिधर पाटील, भानुदास ढिकले, केदू बोराडे, विलास देशमाने, मधुकर हांबरे, प्रभाकर हिरे, अशोक भंडारी, सुभाष गवळी, सुरेश जाधव, सोपान संघान, विशाल पालवे, लक्ष्मण मापारी, विनोद पाटील, संतू झांबरे, शिवाजी राजोळे आदींसह देवळा, कळवण, लासलगाव, सटाणा, तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
 
             कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थन देण्यासाठी आंदोलनात संपूर्ण राज्यभरातून शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणीवरून श्री गोविंद जोशी, राम शिंदे, प्रल्हाद बारतले, मदन शिंदे, शेषराव राखुंडे, वर्ध्यावरून गंगाधर मुटे, सतीश दाणी, धोंडबा गावंडे, शांताराम भालेराव, गणेश मुटे, अशोक कातोरे, मनोहर जयपूरकर, गोपाल चदनखेडे, अमरावतीवरून श्रीकांत पाटील पुजदेकर, राजेंद्र आगरकर, जालन्यावरून पुंजातात्या, लातूरवरून मदन सोमवंशी, माधव मल्लाशे, माधव कल्ले, बुलढाण्यावरून दामोदर शर्मा, समाधान कणखर, सादीक देशमुख, नामदेव जाधव, भिकाजी सोलंकी, शेषराव साळके, प्रल्हाद सोनुने, जळगाववरून कडुआप्पा पाटील, उल्हास चौधरी, मधुकर वेडु पाटील, धुळ्यावरून शांतुभाई पटेल, गुलाबसिंग रघुवंशी, ए.के.पाटील, आत्माराम अण्णा पाटील, सांगलीवरून शितल राजोबा, सिंधुताई गुरव, सिंधू कोळी, नवनाथ पोळ, रामचंद्र कनसे, अण्णासो पाटील, सातार्‍यावरून ज्ञानदेव सकुंडे, बाळासाहेब चव्हाण, कोल्हापूरवरून अण्णासो कुरने, अनिल पाटील, अरुण सावंत, पूण्यावरून लक्ष्मण राजणे यांनी आंदोलन सफ़ल करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
 
             या रेलरोको आंदोलनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता गेल्या काही काळापासून सुस्त पडलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेला या आंदोलनाने प्रचंड उर्जित अवस्था प्राप्त झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी भविष्यकाळासाठी आश्वस्त झाल्यासारखा भासत होता.
 
                                                                                                                     गंगाधर मुटे
                                                                                                     महासचिव, स्वभाप, महाराष्ट्र प्रदेश
—————————————————————————————————————————–
चित्रवृत्तांत :
 
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————

lasalgaon rail roko

लासलगाव रेल्वेरोको आंदोलन

————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन – प्रचंड पोलिस बंदोबस्त
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
लासलगाव रेल्वेरोको आंदोलन – शेतकरी रुळावर ठिय्या देऊन बसले
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
शिस्तबद्ध मोर्चा काढून आंदोलक शेतकरी रेल्वेकडे जाताना
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
आंदोलनापूर्वी झालेल्या सभेस मार्गदर्शन करताना मा. शरद जोशी
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष आंदोलकांना मार्गदर्शन करताना
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
आंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पडले पाहिजे, याविषयी सुचना देताना माजी अध्यक्ष श्री रवी देवांग
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
उपस्थित विराट आंदोलकसमुदाय
————————————————————————————————————
lasalgaon rail roko
कानात तेल ओतून आपल्या प्राणापेक्षा प्रिय साहेबांचे विचार ऐकताना उपस्थित पाईक
————————————————————————————————————
 

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         कापसाला ६०४० रू, सोयाबिनला ५०००रू. आणि धानाला ३२०० रू आधारभूत किंमत जाहिर करावी, या प्रमुख मागणीसह प्रस्तावित सिलींग , भुसंपादन कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेतर्फ़े वायगाव चौरस्ता, आर्वी, सेलडोह आणि जांब चौरस्ता येथे आज दि. २३ नोव्हेंबर रोजी ५ तासाचे पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.
         यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड घट आलेली आहे. खरीप हंगामाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडल्यानंतर पुन्हा शेतकरी रबी हंगामाच्या उदिमाला लागलेला आहे परंतू जिल्ह्यात १८ तास शेतीसाठी वीज भारनियमन असल्याने आणि ६ तास मिळणारी वीज कमी दाबाची आणि खंडीत असल्याने शेतकर्‍यांसमोर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. परिणामत: पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यांनी उचल खाल्ली असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
         सरकार मात्र नेहमीप्रमाणेच शेतीच्या मदतीसाठी उदासिन असून शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर काहीही हालचाल सुरू झालेली नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेती विषयावर अवाक्षरही बोलायला तयार नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, हीच भुमिका शासनाची असल्याने आज राज्यभर पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

         या आंदोलनात प्रवाशी वाहनांना थांबवून त्यातील प्रवाशांचे पान-फ़ूल देवून स्वागत करण्यात आले. सध्याची शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती आणि त्याबातची सरकारची शेतकरीविरोधी भूमिका याबद्दलची कैफ़ियत प्रवाशांसमोर मांडण्यात आली. सामान्य जनतेनेच आता शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सरकारला वठणीवर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना हात जोडून विनंती करण्यात आली. प्रवाशांनी सुद्धा शेतकर्‍यांच्या आजच्या हलाखीच्या स्थितीशी सहमती दर्शवत सरकारने जगाच्या पोशिंद्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
*  *  *
वायगाव चौरस्ता (वर्धा) – वायगाव येथिल पानफ़ूल आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर मुटे, नंदूभाऊ काळे, प्रा. पांडुरंग भालशंकर, सतिश दाणी, दत्ता राऊत, महेश वल्लभवार, सौ. शारदा प्रभाकर झाडे, बापू ठाकरे, गोविंद भगत, बाबा साटोणे, महादेव गोहो, अरविंद राऊत, माणिक उघडे, शोभा कोरेकार, ज्योती भगत, तानू ठाकरे, मधूकर नेजेकार, देवराव हुडे, राजू इखार, नारायण होले यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सेलडोह (वर्धा) – सेलडोह येथील पानफ़ूल आंदोलनात माजी आमदार सौ. सरोज काशीकर, सुनंदा तुपकर, निळकंठ घवघवे, रविंद्र खोडे, शकिल खोडे, चेतराम मेहुणे, धोंडबा गावंडे, शांताराम सोनटक्के, अरविंद बोरकर, रंजना सोनटक्के यांचेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
*  *  *
जांब चौरस्ता (वर्धा) – जाम चौरस्ता येथे शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख मधुसूदन हरणे, प्रा. मधुकरराव झोटिंग, वसंतराव दोंदल, उल्हास कोटमकर, जीवन गुरनुले, अजाबराव राऊत, साहेबराव येडे, जि.प. सदस्य चंद्रमणि भगत, जि.प. सदस्य विणा राऊत, पं.स. सदस्य सुनिल बुरबुरे, दमडु मडावी, कैलास नवघरे, अनिल धोटे, केशव भोले, शंकर घुमडे, हरि जामुनकर, गणेश माथनकर, सुधाकर भगडे यांच्या नेतृत्वात पान, फुल आंदोलन करण्यात आले.
*  *  *
आर्वी (वर्धा) – आर्वी-तळेगाव मार्गावर शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा शैलजा देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
*  *  *
बुलडाणा – शेतकरी संघटनेतर्फे आज, शनिवारी वेगळा विदर्भ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पान-फुल आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले. बुलडाणा तालुक्‍यातर्फे धाड नाक्‍यावर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला थांबवून प्रवाशांना पान-फुल देत त्यांचे स्वागत केले. संघटनेच्या मागण्यांचे पत्रकही त्यांना देण्यात आले.
         यावेळी वाहनधारकांची कोंडी झाली होती. त्या ठिकाणी झालेल्या छोटेखानी सभेत डॉ. हसनराव देशमुख, नामदेवराव जाधव यांनी वेगळ्या विदर्भाचे फायदे सविस्तर समजावून सांगितले. वेगळा विदर्भ झाला, तर विदर्भात होणारी वीज शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना व नागरिकांना 24 तास मिळू शकते व उर्वरित वीज टिकून मोठा महसूल मिळू शकतो. 24 तास वीज मिळाल्यामुळे शेतीचे व कारखानदारीचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांना आत्महत्येला आळा बसू शकतो. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
*  *  *
वणी (जि. यवतमाळ) – येथील शेतकरी संघटनेने वरोरा मार्गावरील वाहनांना थांबवून चालकांना पानफूल देऊन वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्यांसाठी शनिवारी दुपारी एकला आगळेवेगळे आंदोलन केले.
         या आंदोलनादरम्यान, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजीही करण्यात आली. दिवसेंदिवस सरकारी धोरणामुळे बुडत चाललेला शेतीव्यवसाय व उत्पादन शेतकरी, पिकांचा भरून न निघणारा उत्पादन खर्च, शेतकऱ्यांवरील वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कापसाला राज्य सरकारने शिफारस केल्याप्रमाणे 6040 रुपये प्रतिक्‍विंटल भाव केंद्राकडून जाहीर करावा, धान्याचा व खताचा वाढता खर्च लक्षात घेता सोयाबीनला पाच हजार रुपये केंद्राने जाहीर करावा, उसाला तीन हजार 200 रुपये भावाची पहिली उचल देण्यात यावी, शेतकऱ्यांचे वीजबिल व कर्ज माफ करण्यात यावे, तसेच वीजजोडणी थांबविण्यात यावी, विदर्भ राज्य तत्काळ घोषित करण्यात यावे, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी हटविण्यात यावी, केंद्र सरकारने केलेल्या सीलिंगच्या कायद्यात सुधारणा करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
*  *  *
पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता

पान फ़ूल आंदोलन
वायगाव चौरस्ता. रापम च्या बस चालकाला पानफ़ूल देतांना 
पान फ़ूल आंदोलन
नांदेड
पान फ़ूल आंदोलन
लोकमत
पान फ़ूल आंदोलन
लोकशाही वार्ता
पान फ़ूल आंदोलन
महाराष्ट्र टाईम्स
पान फ़ूल आंदोलन
नवभारत
पान फ़ूल आंदोलन
पुण्यनगरी
पान फ़ूल आंदोलन
सकाळ
पान फ़ूल आंदोलन
भास्कर
पान फ़ूल आंदोलन
तरुण भारत
पान फ़ूल आंदोलन
देशोन्नती

साप गिळतोय सापाला

साप गिळतोय सापाला

               बळी तो कान पिळी किंवा मोठे मासे लहान मास्याला गिळतात, यासारख्या म्हणी बर्‍याचदा ऐकायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास शेतात चक्क एक भला मोठा विषारी नाग एका बिनविषारी सापाला गिळताना बघायला मिळाला.

             एक अतिजहाल विषारी गव्हाळ्या नाग एका बिनविषारी लांबलचक धामण जातीच्या सापाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. गव्हाळ्या नाग कात टाकण्याच्या अवस्थेत (कोषी आल्याने) त्याची हालचाल बरीच मंद होती. बिळातून २ फ़ूट बाहेर तोंड काढून त्याने आपले भक्ष पकडलेले होते. धामण बरीच लांबलचक असल्याने नागाला सहजासहजी आपले भक्ष्य गिळंकृत करता येत नव्हते. लढत काट्याची होईल असे स्पष्ट जाणवत होते.

             छायाचित्र घेण्यासाठी हवी तशी जागा उपलब्ध नसल्याने हवा तसा फ़ोटो मोबाईलने घेता आला नाही.
शिवाय मला अन्य कामासाठी शेत सोडून जायचे असल्याने पुढे काय झाले ते पाहता आले नाही.

snake

नागद्वार – दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

नागद्वार – दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 
                     सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे मी अगदी लहानपणापासून ऐकूनच होतो. शरीराने धट्टेकट्टे, मनाने खंबीर व जिवावर उदार होऊन वाटचाल करणारेच नागद्वारला जाऊ शकतात, असाच त्या काळी समज होता. त्या काळी नागद्वार तीर्थाला जाण्यास निघालेल्या यात्रेकरूंना सार करायला (निरोप द्यायला) अख्खा गाव मारुतीच्या पारावर गोळा व्हायचा. तो निरोप समारंभ म्हणजे अक्षरशः ओक्साबोक्सी रडारडच असायची. “हा जगून वाचून आला तर आपला” अशीच कुटुंबीयांची मनोभावना असायची. त्यामुळे नागद्वार तीर्थयात्रा म्हणजे अती कठीण व देवदुर्लभ आहे, याची मला जाणीव होतीच. 
                    मी म्हणजे देशाटनाला चटावलेला प्राणी. थोडाफार भाग वगळला तर अनेकदा अनेक कारणामुळे अख्खा देश कानाकोपर्‍यापर्यंत फिरलो आहे. निसर्गरम्य पहाडीतील निरनिराळी निसर्गरम्य स्थळे पाहिली आहेत. चिखलदरा, मैहर, बम्लेश्वरी, वैष्णोदेवी, उटी, कन्नूर, कोडाईकन्नल, माऊंटआबू पाहून झाली आहेत. आठ पैकी सहा अष्टविनायक, बारा पैकी अकरा ज्योतिर्लिंग, चार धामापैकी तीन धाम (रामेश्वर, पुरी व द्वारका) करून झालेत. आता एकदा बद्रीनाथ-केदारनाथ केले की बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम एकाच वेळी पूर्ण होणार. 
                    पण या सगळ्या ठिकाणांपेक्षा नागद्वार सर्वार्थाने खचितच वेगळे आहे. फारच कष्टाचे आहे पण आनंददायी आहे. देशात सर्वत्र फसवेगिरी, ठगगिरी आणि खिसेकापूंचा सुळसुळाट असताना येथे मात्र प्रामाणिकपणा आणि इमानदारी अजूनही जिवंत आहे. पंचमढीला गाडी जेथे जागा मिळेल तेथे पार्क करा आणि बिनधास्त निघून जा. कोणी हात देखील लावणार नाहीत. तिथल्या कोरकूकडे सामानाची पिशवी द्या व तुम्ही निर्धास्त व्हा. तो त्याच्या वेगळ्या शॉर्टकट मार्गाने पुढे निघून जातो. त्याची आणि तुमची दिवसभर भेट होत नाही पण तो तुम्हाला ठरल्या ठिकाणी तुमचे ओझे बरोबर आणून देतो. त्यासाठी तुम्हाला त्याचे नाव माहीत करून घ्यायची किंवा ओळखसुद्धा ठेवायची गरज नाही. तोच तुमची ओळख ठेवतो व तुम्हाला शोधून तुमचे सामानाचे ओझे तुमच्या स्वाधीन करतो. यात्रा करणारे सर्व यात्रिक परस्परांशी अत्यंत आपुलकीने वागतात. एकमेकांना चढा-उतरायला स्वतःहून मदतीचा हात पुढे करतात. ही यात्रा करताना यात्रिकांमध्ये केवळ “भगत आणि भग्तीन” एवढेच नाते असते. दुर्गम रस्ता पार करताना व एकमेकांना मदतीचा हात देताना/घेताना स्त्री-पुरूष या भेदाभेदाचा कुणाच्याच मनात लवलेश देखील नसतो. 
                    सहा-सात वर्षापूर्वी मी नागद्वारला जाऊन आलो होतोच पण या वर्षी पुन्हा मनात ऊर्मी आली आणि पुन्हा जायचा बेत ठरला. यावर्षी अती पावसाने अन्य पहाडीक्षेत्राप्रमाणे नागद्वार पहाडीक्षेत्रातील दरड कोसळून रस्ते अवरुद्ध झाल्याच्या आणि रस्ते चालण्यासाठी अयोग्य तथा प्रतिकूल होऊन बंद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रात झळकतच होत्या. पण ठरल्याप्रमाणे ८ ऑगष्टला आम्ही प्रवासाला निघालोच. सोबत एक बायको, दोन मुले, एक भाचा आणि १० नातेवाईक असे एकूण १५ जनांचा लवाजमा घेऊन आम्ही निघालो. सौंसर पार केले आणि सुरू झाला घाटाचा रस्ता. प्रचंड नागमोडी वळणे. सौंसर ते पंचमढी या २०० किमी लांब घाटवळणाच्या रस्त्याची तुलना गोवा ते मुंबई या मार्गावरील कोकणी भागातील घाटांशीच होऊ शकेल. पाऊस संततधार कोसळत असताना या वळणांतून स्विफ़्ट-डिझायर चालविण्याचा जो आनंद मला मिळाला तो शब्दात सांगणे खरेच कठीण आहे. 
                    सातपुडा पर्वताच्या नैसर्गिक वनस्पतींनी नटलेल्या पर्वतरांगांमध्ये पंचमढी हे गाव वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे. यालाच सातपुड्याची राणी असे म्हणतात. इथे आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोने मे २००९ मध्ये पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय. जैवविविधतेच्या बाबतीत WWF अर्थात World Wildlife Fund ने हा परिसर जगातील ४ थ्या नंबरचा परिसर घोषित केलाय. इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरशः मोहून टाकते. सभोवताल नैसर्गिक झाडाझुडुपांनी वेढलेल्या पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच शिखरावरून जागोजागी दुधाच्या फ़वार्‍यासारखे झरझरणारे छोटे-मोठे धबधबे आणि त्याही पेक्षा मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण. पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे सुद्धा कळत नाही. धुवांधार कोसळणारा पाऊस त्रासदायक वाटण्यापेक्षा आल्हाददायक वाटतो. येथे नागद्वारला अनेक यात्रिक दरवर्षी नित्यनेमाने येतात. का येतात याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही कारण लौकिकदृष्ट्या सांगण्यासारखे काहीच नाही. पंचमढीवरून नागद्वारकडे निघालो की कुठेही फुलझाडे नाहीत, बागबगीचे नाहीत, घरे नाहीत, पक्षी-प्राणी नाहीत; पायवाटा आहेत त्यादेखील अत्यंत ओबडधोबड. कुठे-कुठे अक्षरशः दीड-दोन फूट रुंदीच्या पायवाटा आणि बाजूला हजारो फूट खोल दर्‍या. चुकून पाय घसरला तर मानवी देहाचा सांगाडासुद्धा मिळणे कठीण. गेला तो गेलाच. त्याला त्या दर्‍यांमधून शोधून काढू शकेल अशी कोणतीही प्रणाली आज अस्तित्वात नाही. आणि तरीही दरवर्षी लाखो यात्री येथे हजेरी लावायला येत असतात. 
                    आम्ही पंचमढीला रात्री मुक्काम करून ९ तारखेला सकाळी निघालो नागद्वारच्या दिशेने. यात्रेच्या दिवसात पंचमढीवरून पुढे धूपगढपर्यंत स्वतःचे वाहन नेता येत नाही. त्या मार्गाने फक्त स्थानिक परवानाधारक वाहनेच चालतात. आम्हाला एक जीप मिळाली. ९ आसनक्षमतेच्या जीपमध्ये १५ लोकांना कोंबून जीपगाडी ६ किमी अंतरावरील धूपगडाच्या प्रथमद्वाराशी थांबली. 
                    धूपगढ हे सातपुडा पर्वतराजीतील 4430 फूट उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्‍या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे. धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो. सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आले असावे. 
                    आणि येथून सुरू झाली आमची पायदळ यात्रा. काजरी, श्रावण बाल मंदिर, गणेशाद्वार, नागद्वार (पद्मशेषगुफ़ा), पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाड़ी, आमकी पहाड़ी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता (माई की गिरी) , दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगढ़, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हल्दीशेष हे सुमारे २० किमी अंतर पायी चालून परत धूपगढ असा प्रवास. मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. बॅग किंवा सामानाची पिशवी घेऊन चालणे अवघड असल्याने आम्ही आमच्या जवळील मुक्कामाच्या साहित्याचे दोन भले मोठे गाठोडे केले व ते दोन कोरकूंच्या स्वाधीन केले. त्यांनी ते गाठोडे उचलले आणि भराभरा निघून गेले. काजरीला मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची आमची भेट होणार होती.
 ——————————————————————
Nagdwar
अशा पाऊलवाटांनी चालणे म्हणजे अवघडच
————————————————————————————————————————————————————
                     काजरी येथे पोचल्यावर श्रावण बाल मंदिर दर्शन घेतले. काजरी येथेच रात्री एका झोपडीत मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी मोठे अंतर चालायचे होते. म्हणून पहाटे ४ वाजताच पुढील प्रवासाला सुरुवात करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते म्हणून सर्व पहाटेच उठलो, हाती विजेर्‍या घेतल्या आणि अंधारातच जंगलातून ओबडधोबड पाऊलवाटेने “एक डोंगर चढता, एक डोंगर उतरता” या प्रकारे मार्गक्रमण सुरू केले. तेथे सपाट म्हणून रस्ते नाहीतच. सर्व वाटा शिखर चढणार्‍या आणि शिखर उतरणार्‍या. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-छोटे “अन्नदानाचा भंडारा” लागलेला असतो आणि तो सुद्धा अगदी फुकट. कुठे काजू-मनुका घातलेला उपमा असतो तर कुठे जिलबी-बुंदा. भात, भाजी, पोळ्या, चहा सारे काही रस्त्याने फुकटच मिळते. अनेक सामाजिक संस्था या कामी पुढाकार घेऊन स्वखर्चाने भोजनाची व्यवस्था करतात. सतत कोसळणारा पाऊस आणि या डोंगरखड्याच्या ओबडधोबड चालण्यास असुरक्षित अशा पायवाटेने स्वतःपुरत्या अन्नाचे ओझे सोबत घेऊन जाणे अशक्य. त्यामुळे एका अर्थाने सर्व यात्रेकरू त्या मार्गावर अन्नासाठी “गरजू” बनतात. त्यांना या भाविक मंडळींच्या सामाजिक संस्था “अन्नसुरक्षा” प्रदान करतात आणि तिही अगदी फुकट. वाटेने फुकटाच्या प्रसादावर ताव मारत आम्ही सकाळी ८ च्या सुमारास नागद्वारला पोचलो. 
—————————————————————— 
Nagdwar
नागद्वाराचे प्रवेशद्वार
 —————————————————————— 
 दोन पहाडांच्या मधोमध एका निरुंद कपारीत पद्मशेष बाबाची छोटीशी मूर्ती आहे. ती कपारी आता थोडी रुंद आणि उंच केली असावी, असे दिसले. त्यामुळे अंदाजे २०० फूट अंतर आता एकावेळी एकाला उभ्याने चालत जाता येते. काही काळापूर्वी सरपटत जायला लागत असावे. असा अंदाज येतो. 
—————————————————————— 
Nagdwar

पद्मशेषद्वार

 —————————————————————— 
पंजाबी लंगर वगळता देशात इतरत्र कुठेही, कोणत्याही तीर्थस्थळी फुकट अन्नप्रसाद मिळत नाही. याउलट सर्वत्र नाडवणूक, खिसेकापू, भंकसगिरी होत असताना या दुर्गम भागात जेथे या संस्थांना सर्व साहित्य प्रचंड कष्टाने डोक्यावर घेऊन जावे लागते तेथे या संस्था लाखो लोकांसाठी फुकटात जेवायची व्यवस्था करतात आणि आग्रहाने जेवू घालण्यात धन्यता मानतात, हे इथले मोठे वैशिष्ट्य ठरावे. 
—————————————————————— 
Nagdwar

अन्नदानाचा भंडारा – येथे आम्ही पोटभर जेवण घेतले. 

——————————————————————
Nagdwar

काही ठिकाणी अशी लोखंडी निशाणीची व्यवस्था केली आहे. 

——————————————————————
Nagdwar

दगडधोंड्यांच्या रस्त्यातून वाट काढत चालताना यात्रिक. 

——————————————————————
Nagdwar

गुळगुळीत वाट आणि बाजूला शेकडो फूट खोल दरी 

——————————————————————
Nagdwar

थकल्यासारखे वाटल्यावर काही क्षणांची विश्रांती घेताना

 ——————————————————————
Nagdwar

मनोहारी ओढा आणि दुर्गम वाटा

 ——————————————————————
Nagdwar

या वाटेने अनवाणी चालण्याचा आनंद काही वेगळाच. 

—————————————————————— 
दोन दिवस सतत चालून आम्ही १० तारखेला परत धूपगढला रात्री ११ च्या सुमारास पोचलो. माझी चप्पल हरवल्याने मला मात्र प्रवास अनवाणी पायानेच करावा लागला. 
———————————————————————————————————-
चौरागढ : पंचमढीला जटाशंकर, गुप्त महादेव अशी देवस्थाने आहेत. ते बघून आम्ही चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून 4315 फूट आणि सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं, की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो. इथे शंकराचं मंदिर असून सभोवताल त्रिशूळांच्या रांगाच रांगा आहेत. अनेक भाविक नवस फ़ेडायसाठी किंवा श्रद्धेने खांद्यावर त्रिशूळ घेऊन येतात. 
 —————————————————————— 
Nagdwarचौरागढाचे प्रवेशद्वार. 
——————————————————————
Nagdwar

चौरागढ चढण्याला पायर्‍या आहेत पण चढताना देव आठवतोच. 

——————————————————————
Nagdwar

चौरागढ चढताना क्षणभराची विश्रांती. 

——————————————————————
Nagdwar

एकदाचे चौरागढाचे शिखर दृष्टीपटात आले, शिवमंदिर दिसायला लागले आणि चेहर्‍यावर हास्य फुलायला लागले. 

——————————————————————
Nagdwar

प्राचीनकाळीन शिवमंदिर

 ——————————————————————
Nagdwar

हर हर महादेव

 —————————————————————————————————
अन्होनी गरम पाण्याचे कुंड : पंचमढीवरून ४७ किमीवर अन्होनी येथे गरम पाण्याचे कुंड आहे. बाजूलाच ज्वाला माता मंदिर आहे. कुंडातील पाणी एवढे गरम असते की त्यातून वाफ निघत असते. या पाण्यात आपण हात घालू शकत नाही. बाजूलाच दोन हौद बांधले आहेत. या कुंडातील पाणी तेथे घेतले जाते. भाविक तेथे आंघोळी करतात. येथे आंघोळ केल्यास चर्मरोग दुरुस्त होतात, अशी जनभावना आहे. 
—————————————————————— 
Nagdwar

गरम पाण्याचे कुंड – पाण्यातून वाफ निघते

 —————————————————————————————————–
 पंचमढीला आम्ही नागद्वार, चौरागढ आणि अन्होनी इतकेच पाहू शकलो. तीन दिवस सतत पायी चालून एवढे थकून गेलो की आणखी काही बघायची इच्छाच उरली नव्हती. मात्र येथे बरेच काही बघण्यासारखे आहे. गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात. पंचमढीला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत, तर काही ठिकाणं अवघड आहेत. 
 पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, धबधबे, बी फॉल, अप्सरा, विहार, पंचमढी मधील सर्वांत उंच म्हणजे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप हा धबधबा वगैरे बघायचे राहून गेले मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा जायचा विचार आहे.
पंचमढीला कसे जावे? 
* हवाई मार्गाने जायचे झाल्यास भोपाळ वरून १९५ कि. मी. 
* रेल्वेने जायचे झाल्यास होशंगाबाद जवळील पिपरिया इथे उतरून पुढे बसने – अंतर ४५ कि. मी. आहे. 
* नागपूरहून बसने पंचमढीला जाता येते – अंतर सुमारे २७० कि. मी. आहे.
                                                                                                                              – गंगाधर मुटे 
———————————————————————————————————

‘योद्धा शेतकरी’ व ‘वांगे अमर रहे’ प्रकाशन समारंभ

‘योद्धा शेतकरी’  वांगे अमर रहे  विमोचन समारंभ

             ‘योद्धा शेतकरी’ (www.sharadjoshi.in) या संकेतस्थळाचा विमोचन समारंभ आणि गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ वर्धा येथील गुजराती भवनात दिनांक २२ जुलै २०१२ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न झाला. संकेतस्थळाचे उद्घाटन पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक यांचे हस्ते तर “वांगे अमर रहे” पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, लोकमत, नागपूरचे संपादक मा. सुरेश व्दादशीवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.
             व्यासपिठावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वभापचे अध्यक्ष, माजी आमदार अ‍ॅड वामनराव चटप, माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभापचे जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे, अ‍ॅड दिनेश शर्मा, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, राम नेवले, अंजली पातुरकर व अन्य पदाधिकारी हजर होते.

**** वर्तमानपत्रातील वृत्त ****

महाराष्ट्र टाईम्स

आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार- जोशी

म. टा. प्रतिनिधी , वर्धा
             भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
             यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुटे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
             शेतकरी संघटनेची http://www.sharadjoshi.in अर्थात ‘ योद्धा शेतकरी ‘ या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या ‘ वांगे अमर रहे ‘ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
*

लोकमत

शेतीवर पोट असणार्‍यांनाच शेतकर्‍यांच्या वेदना कळतात – शरद जोशी

वर्धा। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
                 भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाते. मात्र याच देशातील शेतकर्‍यांची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट शेती व्यवसायावर असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
स्थानिक गुजराती भवन येथे शेतकरी संघटनेच्या वतीने योद्धा शेतकरी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
                    या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पि.टी.आय.चे माजी अध्यक्ष वेदप्रताप वैदीक तर अध्यक्षस्थानी लोकमतचे संपादक प्रा.सुरेश द्वादशीवार उपस्थित होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदन हरणे आदी मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून या उद्घाटन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित वांगे अमर रहे या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
           सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. द्वादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरूण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला संघटनेचे कार्यकर्ते नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. पटर्वधन यांच्या बासरी वादनातून वैष्णव जन तो या गिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
*

सकाळ

शेतकर्‍यांसाठी शरद जोशींनी उभारलेला लढा महत्त्वाचा

पत्रकार वैदिक : ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वर्धा,ता २२:                    
              शेतकर्‍यांकरिता शरद जोशींनी उभा केलेला लढा महत्त्वाचा आहे. त्यांचे मौलिक विचार येणार्‍या काळातही दिशादर्शक ठरतील, असा विश्वास जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदीक (दिल्ली) यांनी श्री. जोशी यांच्या समग्र जीवनकार्य़ावरील ’योद्धा शेतकरी’ संकेतस्थळाच्‍या येथील उद्घाटन कार्य़क्रमात व्यक्त केला.                    

              येथील गुजरात भवनाच्या सभागृहात आज उद्घाटन समारंभ पार पडला. कार्य़क्रमाला शेतकरी संघट्नेचे सर्वेसर्वा शरद जोशी, जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामनराव चटप, स्वभापच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटनेच्या महीला आघाडीच्य़ा अध्यक्ष शैलजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संकेतस्थळावर शेतकरी सघंटनेची विविध आंदोलने, छायाचित्र, त्यावरील वृत्तांत, शरद जोशींनी लिहीलेली १७ मराठी, तीन इंग्रजी आणि दोन हिंदी पुस्तके, राज्यसभेतील त्यांची भाषणे, जीवन परिचय आदींचा समावेश आहे

.                      यावेळी संघटनेचे पदाधिकारी गंगाधर मुटे यांच्या “वांगे अमर रहे” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात श्री. मुटे यांनी मागील दोन वर्षात लिहिलेल्या वैचारिक लेख, कथा, ललीत लेखनाचे संकलन आहे.                     

                      पुढे बोलताना श्री. वैदीक म्हणाले, ’योद्धा शेतकरी’ हे संकेतस्थळ आपण इंग्रजी आणि हिंदी मध्ये सुरू केले. त्यांचा क्रम आधी मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असायला हवा होता. सध्या देशात भ्रष्टाचाराच्या काहूर माजले आहे. भ्रष्टाचारावर लगाम लावण्याकरिता कठोर पावले उचलण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.                    
                      यावेळी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. शैलजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

*

लोकशाही वार्ता

शेतीवर पोट असलेले नेतेच शेतकर्‍यांसाठी लढतात

प्रतिनिधी/ २२ जुलै
                   वर्धा : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते मात्र याच देशातील शेतकर्‍याची दैनावस्था आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी लढण्याचा आव आणणारे अनेक नेते मंडळी आहे. पण ते अद्यापही शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही. कारण त्यांना शेतकर्‍यांच्या समस्या कळल्याच नाही. ज्या नेत्याचे वा कार्यकर्त्यांचे पोट हे शेती व्यवसायावर भरत असेल त्यांनाच शेतकर्‍यांच्या खर्‍या वेदना कळतात, समस्येची जाणीव असते आणि तेच शेतकर्‍यांच्या न्यायासाठी पोटतिडकीने भाग घेऊन लढतात, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी केले.
              स्थानिक गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या पुढाकाराने ‘योद्धा शेतकरी’ या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार पी.टी. आय चे माजी अध्यक्ष वेदप्रतापजी वैदिक तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश व्दादशीवार उपस्थित होते.
              शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष वामन चटप, महिला आघाडी स्वभाप अध्यक्षा सरोज काशीकर, शेतकरी संघटना महिला आघाडी अध्यक्षा शैलेजा देशपांडे, अंजना पाथुरकर, दिनेश शर्मा, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, स्वभाप जिल्हाध्यक्ष मधुसूदण हरणे यांची उपस्थिती होती. प्रास्तविक सरोज काशीकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष मुटे यांच्या प्रयत्नातून फळाला गेलेल्या योद्धा शेतकरी संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुटे लिखित ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. उद््घाटनीय भाषणातून महाराष्ट्राच्या भूमीत शरद जोशीसारखे शेतकरी नेते निर्माण होणे म्हणजे अहोभाग्य असल्याचे वैदिक यांनी सांगितले. तर प्रणेते शरद जोशी यांनी या संकेतस्थळाची कल्पना पूर्वीपासूनच मनात होती परंतु काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच शेतकरी संघटनेला व नेत्यांना इतर नेत्यांप्रमाणे महत्त्व प्राप्त झाले नाही. ही संकेतस्थळाची इच्छा मुटे यांनी पूर्णत्वास नेल्याने शेतकरी संघटनेला नवी भरारी मिळाली आहे. यामुळे त्यांनी मुटे यांचे अभिनंदन केले. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी हे संकेतस्थळ चालविण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुरेश व्दादशीवार यांनी शरीराने थकलेल्या पण विचाराने अजूनही तरुण असलेल्या शेतकरी नेत्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी शेतकर्‍यांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी स्वीकारावी असे सांगितले. तसेच या संकेतस्थळाने शेतकरी संघटना व तिचे कार्य हे सर्वदुर पसरणार असल्याने सध्या आलेली मरगळ झटकुन शेतकरी संघटनेने पुन्हा नव्याने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. शरीराने थकलेल्या पण मनाने आणि विचाराने तरूण असलेल्या नेत्याला आराम देऊन केवळ त्यांच्या मार्गावर कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी असे सांगितले. येत्या ९ ऑगस्टला हजारोंच्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी छातीवर संघटनेचा लाल बिल्ला लाऊन पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांच्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवी देवांग यांनी दिली. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित झाले होते. पटवर्धन यांच्या बासरी वादनातून ‘वैष्णव जन तो तेने कहीए जे पीर परायी जाने रे’ या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*

लोकशाही वार्ता

लोकपाल विधेयकांने काय साध्य होणार?

जिल्हा प्रतिनिधी/ २२ जुलै
              वर्धा : पं. नेहरु प्रणित समाजवादाच्या नावाखाली या देशामध्ये परमीट राज्य आणले.यातूनच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. याला आळा घालण्यासाठी कायदा करणे महत्वाचे नाही. इतकेच नव्हे तर सध्या गाजत असलेल्या लोकपाल विधेकातूनही हा भ्रष्टाचार संपुष्टात येणार नाही. मग असे विधेयक तयार करून काय साध्य होणार असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी उपस्थित केला. आज वर्धा शहरातील गुजराती भवनात शेतकरी संघटनेच्या वेबसाईटचे उद््घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
              यावेळी उद्घाटक म्हणून दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार वेदप्रताप वेदीक, अध्यक्षस्थानी प्रा. सुरेश द्वादशीवार तर प्रमुख पाहूणे म्हणून अँड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलेजा देशपांडे, मधुसुधन हरणे, अँड. दिनेश शर्मा, रवी देवांग, अंजना पातुकर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते. शरद जोशी पुढे म्हणाले, गोखले, न्या. रानडे, टिळक यांच्या काळातील आदर्श आता अस्ताला जात आहे. नेहरुवादी समाजवादाने भ्रष्टाचाराला जन्म दिला. त्याला कायमचा निपटून काढायचा असेल तर राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे.
              शेतकरी संघटनेने शेतकर्‍यांचे प्रश्न अतिशय गांभिर्याने राज्यकर्त्यांकडे मांडले. हा संपूर्ण इतिहास वेबसाईटच्या माध्यमातून आता जगापर्यंत पोहचणार आहे. ही वेबसाईट शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांनी तयार केली. यामध्ये संघटनेच्या निर्मितीपासूनचा इतिहास व महत्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जेष्ठ पत्रकार वेदीक म्हणाले, राज्यसत्तेने यथा स्थितीवादाला आधार बनवू नये. जनआंदोलनामुळे संपूर्ण जगात राजकीय सत्तेत बदल होत आहे. या आंदोलनांना समाज परिवर्तनाचे आधार असले पाहिजे. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था आपण अजूनही तयार करू शक लो नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नवे तंत्रज्ञान शेतीला मारक ठरवू नये असेही ते म्हणाले. प्रा. द्वादशीवार यांनी शरद जोशी यांच्या कार्याचा आढावा घेवून ही संघटना बळकट करण्यासाठी नव्या भूमिका जोशी यांच्या नेतृत्वात अजूनही कायम असल्याचे आवर्जुन नमुद केले. यावेळी गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या ‘वांगे अमर रहे’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
*

Sharad Joshi

Farmer

Web Site
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
शेतकरी
———————————————————————————-
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
———————————————————————————-
शेतकरी संघटना
————————————————————————————–
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते गोविंद जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले..
————————————————————————————–
कृषी
————————————————————————————–
माजी आमदार आणि स्वभापच्या अध्यक्षा सौ. सरोज काशीकर यांनी प्रस्ताविक केले.
————————————————————————————–
शरद जोशी
————————————————————————————–
माजी आमदार आणि स्वभापचे अध्यक्ष अ‍ॅड वामनराव चटप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
————————————————————————————–
संकेतस्थळ
———————————————————————-
अ‍ॅड दिनेश शर्मा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
———————————————————————-
Dinesh Sharma
———————————————————————-
मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
———————————————————————-
Shetkari Sanghatana
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
Wardha
———————————————————————-
मा. वेदप्रताप वैदीक यांनी संकेतस्थळाचे औपचारिक विमोचन केले.
———————————————————————-
Kisan
———————————————————————-
संकेतस्थळाचे अवलोकन करताना मान्यवर.
———————————————————————-
Wange Amar Rahe
———————————————————————-
कार्यक्रमाला उपस्थितांनी हॉल गच्च भरून गेला होता.
———————————————————————-
Shetkari
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
Gangadhar Mute
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
वेदप्रतापजी वैदीक
———————————————————————-
उद्घाटनपर भाषण करतांना पी.टी.आय या वृत्तसंस्थेचे व नवभारत टाईम्सचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रतापजी वैदीक.
———————————————————————-
गंगाधर मुटे
———————————————————————-
संकेतस्थळाचा संक्षिप्त परिचय करून देताना गंगाधर मुटे.
———————————————————————-
Sharad Joshi
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
 शरद जोशी
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
वांगे अमर रहे
—————————————————————————————
गंगाधर मुटे लिखित “वांगे अमर रहे” पुस्तकाचे विमोचन करताना मा. शरद जोशी आणि मान्यवर.
—————————————————————————————
शरद जोशी
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी मार्गदर्शन करतांना.
—————————————————————————————
संकेतस्थळ
—————————————————————————————
प्रा. पांडुरंग भालशंकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
—————————————————————————————
सुरेशजी व्दादशीवार
—————————————————————————————
मा. सुरेशजी व्दादशीवार अध्यक्षीय भाषण करतांना.
—————————————————————————————
Womens
—————————————————————————————
कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली.
—————————————————————————————
Ravi Dewang
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग यांनी संकेतस्थळाच्या निर्मितीबद्दल गंगाधर मुटे यांचे पुष्पहाराने विशेष अभिनंदन केले.
—————————————————————————————
रवी देवांग
—————————————————————————————
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग मार्गदर्शन करताना.
—————————————————————————————
शैलजा देशपांडे
—————————————————————————————
शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. शैलजा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
—————————————————————————————
Deshonnati
—————————————————————————————
Agrowon
—————————————————————————————
Wange amar rahe
—————————————————————————————

———————————————————————————————————

वांगे अमर रहे PDF फ़ाईल स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
———————————————————————————————————

प्रतिविधानसभा – वृत्तांत

प्रतिविधानसभा – वृत्तांत

                     नागपूर येथील रामनगर मैदानावर दि. १० व ११ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेद्वारा प्रतिविधानसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रतिविधान सभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिलाची ९ हजार कोटींची थकबाकी माफ करण्यात आली. याशिवाय, शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही, असेच हमी भाव देण्याचे धोरण आजवर शासनाने राबविले असल्याने शेतकर्‍यावरील सर्व कर्जे अनैतिक आहेत हे लक्षात घेऊन शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जातून कर्जमुक्त करण्याचे संकेत देण्यात आले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने सुचविलेली कुठलीही मागणी मान्य करीत नसल्याने सभागृहाने केंद्राचा निषेधाचा ठराव पारित करीत, प्रसंगी दिलेला पाठिंबाही मागे घेण्याचा इशारा देण्यात आला.

                              शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अवघे राज्य ढवळून निघत असताना उपराजधानीतील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनेने प्रतिविधानसभेचे आयोजन केले होते. रामनगर मैदानावर दिवसभर सभागृहाचे कामकाज चालले. माजी आमदार सरोज काशीकर यांची विधानसभेचे प्रतिअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रतिमुख्यमंत्री म्हणून ऍड. वामनराव चटप यांनी तर प्रतिउपमुख्यमंत्री म्हणून श्री रवि देवांग यांनी भूमिका बजावली.

                            प्रारंभी प्रतिअध्यक्षा सरोज काशीकर यांनी ध्वजारोहन केले. १० डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव येथील गोळीबारात शहीद झालेल्या तसेच आजवर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर कामकाजाला रितसर सुरूवात झाली. मा. प्रतिमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंडळातील सर्व प्रतिमंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रश्‍नोत्तराने सभागृहाच्या कामकाजास सुरवात झाली. प्रश्‍नावलीतील दहाही प्रश्‍न कृषी, वीज, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय व उच्चशिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहविभाग, नगरविकास, विधी व न्याय या खात्याशी संबंधित होते. प्रश्‍नोत्तराच्या प्रारंभी प्रतिविरोधी पक्षनेते राम नेवले यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाल व उत्पादन खर्चासंबंधी प्रश्‍न विचारून सरकारची परीक्षा घेतली. हेमंत ठाकरे यांनी कापसाच्या आधारभावाबाबत व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट तसेच सरकारच्या याबाबतच्या बोटचेपे धोरणाबद्दल नाराजी व्यक्‍त केली. देवीप्रसाद ढोबळे यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीची मागणी केली. भारनियमन आणि वीजसंकटावर सरकारला दोषी धरले. अनिल चव्हाण यांनी उस उत्पादकांना भाव न देणाऱ्या कारखानदारांवर टीकेची झोड उठविली.

                           प्रतिमुख्यमंत्र्यांनी आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे संकेत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले. प्रतिउपमुख्यमंत्री व कृषिमंत्री रवी देवांग यांनी निर्यात धोरण नेहमीच खुले असावे असे मान्य करीत, केंद्राकडे बोट दाखवत महागाईच्या नावावर केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याची टीका केली. चर्चेमध्ये देविप्रसाद ढोबळे, अनिल चव्हाण, शरद गदरे, विष्णु वानखेडे, जी.पी.कदम, सतिश दाणी, संतोष तांदळे, शेख रशीद, दिलीप भोयर, बाबुराव हाडोळे, मुरलीधर ठाकरे, निवृत्ती शेवाळे, माणिक कांबळे, तुळशिराम कोठेकर, भगवान शिंदे, निळकंठ घवघवे, गजानन भांडवले, शिवाजी राजोळे, विक्रम शेळके, सुनिल शेरेवार, जीवन गुरनुले, धोंडिबा पवार, गजानन बंगाळे, बैजीनाथ ढोरकुले, अण्णाजी राजेघर, ज्ञानेश्वर गादे, किशोर ढगे, घनश्याम पुरोहीत, जालिंदर देशमुख, उल्हास कोटमकर, जयंत बापट, सौ. रेखा हरणे, अजय बसेर, जे.डी.देशमुख, प्रभाकर माळवे, सुरेश आगलावे, गुलाबसिंह रघुवंशी, प्रवीण देशमुख यांनी भाग घेतला तर गुणवंत पाटील हंगरगेकर, ललित बहाळे, रवी देवांग, वामनराव चटप यांनी चर्चेला उत्तर दिले.

                       प्रतिवस्त्रोद्योग व पणनमंत्री विजय नवल यांनी कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल २००० रुपये अनुदान देण्याची घोषणा करताच सभागृहात गदारोळ झाला. भीक नको, घामाचे दाम हवे, अशी मागणी केली. यात हस्तक्षेप करीत मुख्यमंत्र्यांनी हे अनुदान नसून आजवर शासनकर्त्यांनी केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून शेतकर्‍यांना सन्मानजनक मदत देत असल्याची घोषणा करीत वादावर पडदा टाकला. त्यासोबतच कापसाला ६ हजार रूपये, सोयाबीनला ३००० रुपये, धानाला २६०० रुपये व तुरीला ५००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्याची शिफारस केंद्राकडे लावून धरण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. प्रतिउर्जामंत्री मधुसूदन हरणे यांनी आजवर शासनाकडून अनेक चुका झाल्याचे सभागृहात कबूल केले. प्रतिसहकार मंत्री अनिल घनवट यांनी सहकारी लॉबीवर नाराजी व्यक्‍त करीत प्रसंगी शेतकऱ्यांचे पैसे हडपणाऱ्या कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशारा दिला.

                     प्रश्‍नोत्तरानंतर लक्षवेधी झाल्या. शेतकरी वीजबिल भरू शकत नाहीत. भारनियमनाचा नेहमीचाच विषय आहे. शेतमालाला भाव नाही, उलटपक्षी कर्जाचा डोंगर आहे. ही परिस्थिती उद्भवण्याला शासन आणि वीज नियामक मंडळातील अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे, याकडे लक्ष वेधत प्रतिऊर्जामंत्री मधुसूदन हरणे यांनी १५ दिवसांत अधिकाऱ्यांनी संपत्ती जाहीर करावी, असे निर्देश देत, असे न केल्यास आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येतील व थकबाकीच्या मुक्तीपोटी येणारे तुट भरून काढण्यासाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर दिवसभर अशासकीय विधेयकावर चर्चा होऊन दिवसभराचे कामकाज करण्यात आले.

                           रामनगर येथील मैदानात प्रति विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी अशासकीय विधेयकाच्या स्वरूपात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारा प्रस्ताव राजकुमार तिरपुडे यांनी मांडला. नागपूर करारानुसार दीड महिना हिवाळी अधिवेशनाचा काळ असावा असे ठरले असताना अधिवेशन ८ ते १० दिवसांवर आले आहे. विदर्भाचा सिंचन, रस्ते, पाणी, शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, सामाजिक न्याय वीज, कर्जे याबाबतचा अनुशेष वाढत आहे. विदर्भाला प्रगत करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे असून, विदर्भातील जनतेचे स्थलांतर, आदिवासींचे कुपोषण, पुरेसा कच्चा माल असता नक्षलग्रस्त जिल्ह्यात निर्माण न झालेले उद्योग, वाढती बेरोजगारी, वाढता नक्षलवाद यामुळे ११ जिल्ह्यांचे विदर्भ राज्य झाले पाहिजे, अशी मागणी श्री. तिरपुडे यांनी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या अशासकीय विधेयकावरील डॉ. गोविंद वर्मा, तन्हा नागपुरी, दिगंबर अकर्ते, शेषराव आटोणे, शेरखान पठाण, विक्रम शेळके, अहमद कादर, गुणवंत नागपुरे, ओमप्रकाश तापडिया, शेख बशीर, धनंजय धार्मिक, अहमद कादर, ओमप्रकाश तापडिया, राम नेवले यांनी चर्चेत भाग घेतला. उपमुख्यमंत्री रवी वेदांग यांनी विधेयकासंदर्भात निवेदन करताना वेगळा विदर्भ राज्याची मागणी मान्य केली आणि विधानसभेत हा ठाराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, “ये तो अंगडाई है, आगे घोर लडाई है’ असा नारा देत ऍड. वामन चटप यांनी पुढील आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. प्रश्नोत्तराच्या तासात सौ. सिंधुताई इखार, सचीन डाफ़े, सौ. संध्या राऊत यांनी भाग घेतला.

                          राज्यातील ढासळत्या आर्थिक स्थिती विषयी तसेच तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने करावयाची उपाययोजना यावर डॉ. गोविंद वर्मा, उत्तमराव बाभळे यांनी अशासकीय विधेयके मांडली. विष्णुजी वानखेडे यांनी रखडलेले सिंचन प्रकल्प, टोलनाके, ग्रामीण भागातील सोयी-सुविधा, कालबाह्य कायद्यांची छाटणी, आरोग्यसेवेतील रिक्त पदे यावर चर्चा केली. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पकडण्यात आलेल्या दारूसंदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात येऊन त्यावर गंभीर चर्चा झाली. याशिवाय ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांवर सोपविण्यात आलेली शिक्षणबाह्य कामे या विषयीची लक्षवेधी चांगलीच गाजली. यावर शिक्षणमंत्री डॉ. आप्पासाहेब कदम यांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचे आश्‍वासन दिले. ग्रामीण भागातील रस्ते, वीज व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पथ कर रद्द करण्यात यावा, आदिवासींच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निश्‍चित तरतूद करण्यात यावी, या मागण्याही मान्य करण्यात आल्या.

एफडीआयला पाठिंबा

                           अर्धा तास या सदराखाली परकीय थेट गुंतवणुकीला पाठिंबा देणारा ठराव मांडण्यात आला. यावरील चर्चेत विनय हर्डीकर, शशिकांत मदाने, बाबुराव हाडोळे यांनी भाग घेतला. हा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांना अधिक भाव मिळेल, त्याचप्रमाणे ग्राहकांनासुद्धा गुणवत्तापूर्ण वस्तू मिळेल, असे या ठरावात म्हटले आहे.

रामगिरीवर शेतकर्‍यांची चढाई

                      प्रति विधानसभेची सांगता झाल्यानंतर प्रतिविधानसभेत मंजूर झालेले ठराव सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने भेटीची परवानगी नाकारल्यामुळे शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून निवेदन देण्याचा प्रस्ताव रवि देवांग यांनी मांडताच उपस्थितांनी हात उंचावून जबरदस्त घोषणा त्या प्रस्तावाचे अनुमोदन केले. सायंकाळी ४ वाजता प्रतिविधानसभेतील ठराव मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी पोहचवून देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. प्रतिविधानसभेचे मुख्यमंत्री माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दोन हजार शेतकरी रामगिरीकडे रवाना झाले. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी त्यांना लेडीज क्लबजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय न परतण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केल्याने ते पोलिसांच्या सुरक्षेला भेदत रामगिरीकडे गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलाविली. तत्काळ पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. वनभवन परिसरात शेतकर्‍यांना पुन्हा अडविण्यात आले. शेतकरी रामगिरीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. ते संतापले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात यवतमाळ जिल्ह्यातील पुंडलिकराव ठाकरे (६५) रा. आष्टोना, ता. राळेगाव या शेतकऱ्याच्या डोक्‍यावर लाठीचा प्रहार झाल्याने मुर्च्छितावस्थेत त्यास मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लाठीमार

                     पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला; परंतु कार्यकर्त्यांनी या पोलिसी बळाला न जुमानता पोलिस जिमखाना क्‍लबकडे आगेकूच चालूच ठेवली. रामगिरी या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानापासून केवळ हाकेच्या अंतरावर मिरवणूक पोचल्यावर पोलिसांना मिरवणूक अडविण्यात यश मिळाले. या स्थानापर्यंत आजवर कोणतीही मिरवणूक अथवा मोर्च्या पोचलेला नाही, असे सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी पाचारण केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.

 मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट

                      माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवि देवांग, गुणवंत पाटील, अनिल घनवट, राम नेवले, शैला देशपांडे, कैलास तवार, अरुण केदार, मधुसुदन हरणे, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते. शेतकरी संघटनेने प्रतिअधिवेशना मंजूर झालेल्या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना सादर केली. कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्यात यावा, विजेचे भारनियमन बंद करावे, शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे, या मागण्यांचा यात समावेश आहे. भेटीच्या प्रारंभीच शेतकरी संघटनेने एफ़ डी आय ला समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानले. कोणत्याही शेतमालास निर्यातबंदी न लावण्याच्या शेतकरी संघटनेच्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. मात्र क्विंटल मागे न देता कापूस, सोयाबिन व धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रति एकरी मदत देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र यावर शिष्टमंडळाने असहमती दर्शवली आणि गरज भासल्यास संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा मुख्यमंत्र्यांना इशारा देण्यात आला.

                                                                                                        – गंगाधर मुटे
                                                                                           प्रतिमुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

———————————————————————————————————————————————-
प्रति विधानसभा मंत्रीमंडळ
 सौ. सरोजताई काशीकर 
अध्यक्ष
 श्री प्रभाकर दिवे 
उपाध्यक्ष
 अ‍ॅड वामनराव चटप 
मुख्यमंत्री
 श्री रविभाऊ देवांग 
उपमुख्यमंत्री (कृषी)
 श्री गुणवंत पाटील हंगरगेकर 
गृह
 अ‍ॅड दिनेश शर्मा 
सांसदीय कामकाज
 श्री ललित बहाळे 
अर्थ
 अ‍ॅड अनंत उमरीकर 
विधी व न्याय
 श्री कैलास तवार 
महसुल
 श्री पुरुषोत्तम लाहोटी 
सार्वजनिक बांधकाम
 श्री समाधान कणखर 
ग्रामविकास
१०
 श्री मधुसुदन हरणे 
उर्जा
११
 डॉ. आप्पासाहेब कदम 
शिक्षण
१२
 श्री नंदकिशोर काळे 
समाजकल्याण
१३
 श्री अजित नरदे 
उद्योग
१४
 श्री अनिल घनवट 
सहकार
१५
 श्री विजय निवल 
वस्त्रोद्योग व पणन
१६
 श्री राजेंद्रसिंह ठाकूर 
अदिवासी विकास
१७
 श्री अरुण केदार 
सिंचन
१८
 श्री जगदीश बोंडे 
नगरविकास
१९
 श्री भाष्कर महाजन 
आरोग्य
२०
 सौ. शैलजा देशपांडे 
महिला,बालकल्याण
२१
 श्री जयकिरण गावंडे 
क्रिडा व युवककल्याण
२२
 श्री नितीन देशमुख 
दुग्ध व्यवसाय
२३
 श्री विनय हर्डीकर 
उच्चशिक्षण व तंत्रज्ञान
२४
 श्री दगडू एकनाथ शेळके 
अन्न व नागरी
२५
 श्री ब.ल.तामस्कर 
रोजगार हमी
२६
 श्री विजय विल्हेकर 
सांस्कृतिक
 श्री राम नेवले 
विरोधी पक्षनेता
 सौ. अंजली पातुरकर 
तालिका सभापती
 श्री उत्तमराव वाबळे 
तालिका सभापती
 श्री ओमप्रकाश तापडिया 
तालिका सभापती
 श्री गंगाधर मुटे 
मुख्य सचिव

———————————————————————————————————————————————-
प्रतिविधानसभा
प्रतिविधानसभा – अध्यक्ष, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ

———————————————————————————————————————————————-

प्रतिविधानसभेला उपस्थित आमदार मंडळी

———————————————————————————————————————————————-
Ramgiri
रामगिरी समोर ठिय्या देवून बसलेले शेतकरी कार्यकर्ते

———————————————————————————————————————————————-
रामगिरी

पोलिस लाठीमारात जखमी झालेले शेतकरी पुंडलिक ठाकरे यांना उपचारासाठी हलवितांना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते

———————————————————————————————————————————————-
पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांचेशी चर्चा करताना शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ.

———————————————————————————————————————————————-
लाठीचार्ज
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची आंदोलकांना माहिती आणि पुढील रणनितीची घोषणा करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग

———————————————————————————————————————————————-

होतकरू झाड

होतकरू झाड

मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा
कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा

नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे
कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा

                                                 गंगाधर मुटे
—————————————————–
(नव्या यमांची नवीन भाषा    या गझलेतील शेर)