माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

नमस्कार मित्रहो,

                 आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस “जागतीक मराठी भाषा दिवस” म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.

                नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. आंतरजालावर १-२ लेख लिहिल्या नंतर इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही.

                मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगेमय/वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

मागील १२०० दिवसांचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या.

०१) gangadharmute.wordpress.com – माझी वाङ्मयशेती – (६३,९६५) –
                                                                             सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०२) www.baliraja.com – बळीराजा डॉट कॉम – ( ५७,३९० ) 

०३) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ३१,०७०)

०४) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( २५,८०६  ) 

०५) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( १२,५०३ ) 

०६) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१४,५७२)

०७) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( ५,९०४ ) 

०८) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (३,२२५)

०९) ranmewa.blogspot.in – रानमेवा – ( २८०४ )
खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही.
मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे स्पष्ट आहे.

                एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

                                  Thank you Mr Internet!


                                                                                          – गंगाधर मुटे
—————————————————————————————–
Facebook
—————————————————————————————–

गझलकार’-सीमोल्लंघन विशेषांक-२०११

‘गझलकार’-सीमोल्लंघन विशेषांक-२०११


गझलकार मित्रांनो,
नमस्कार. 
गेल्या चार वर्षांपासून जेष्ठ गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत त्यांच्या ‘गझलकार’  या ब्लॉगवर दरवर्षी सीमोल्लंघन विशेषांक प्रकाशित करतात.
२०११ च्या सीमोल्लंघन विशेषांकाकरिता आपल्या पाच (किंवा त्याहूनही जास्त)गझला आणि आपलेच छायाचित्र ब्लॉगवर प्रकाशनाकरिता आपण पुढील email id वर पाठवाव्या ही विनंती.
gazalkar@gmail.com संपादकांच्या पसंतीस उतरलेल्या गझलांना प्रकाशित केले जाईल. 

पुढील लिंकवर त्या  ब्लॉगवरचे विशेषांक आपण अवश्य पहा-वाचा-प्रतिक्रिया कळवा.


————————————————————————————————
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्नबळीराजा डॉट कॉम
————————————————————————————————