औंदाची शेती – २०१५
१९-०६-२०१५
भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी
*****************************************
कपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला.
बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही.

आणि
शेतकर्याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही.

(त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्यांना हवेहवेसेच आहे.)
*****************************************
पेरते व्हा!

याला आमचेकडे फ़साटी म्हणतात.
तुमच्याकडे काय म्हणतात.
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे?