नमस्कार मित्रहो,
पिढ्यान्-पिढ्यापासून शेतकर्यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर…! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय.
नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. एका सार्वजनिक संकेतस्थळावर १-२ लेख लिहिल्या नंतर तेथे घमासान चर्चायुद्ध झ इंटरनेटसुद्धा शेतकर्यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या आंतरजालावरील वावराला आता उणेपुरे साडेपाच वर्ष होत आहेत.या साडेपाच वर्षात माझे शेतीविषयक लेखन २० लाखापेक्षा जास्त वाचकापर्यंत पोचले आहे, ही फ़ार समाधानाची बाब आहे.
माझा साडेपाच वर्षाचा लेखाजोखा :-
माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या खालीलप्रमाणे :-
०१) http://www.baliraja.com बळीराजा डॉट कॉम – (२,८५,७१०)
०२) http://www.gangadharmute.com माझी वाङ्मयशेती – (२,७५,८४२)
०३) gangadharmute.wordpress.com – रानमोगरा – (८८,४००) – सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.
०४) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ७३,०२५)
०५) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( ८३,३३८ )
०६) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( ३६,९४७ )
०७) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१६,६३४)
०८) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( १६,९११ )
०९) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (६,७९६)
१०) ranmewa.blogspot.in – रानमेवा – (३,५२२)
एकूण वाचन संख्या – ८,८७,०९७
खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही. मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे उघड आहे.
०१) www.facebook.com/gangadharmute
०२) www.youtube.com/gangadharmute
०३) www.shetkari.in
०४) sharad-anant-joshi.blogspot.in
०५) www.twitter.com/gangadharmute
०६) www.facebook.com/groups/kawita
०७) www.facebook.com/my.net.farming
०८) www.facebook.com/groups/baliraja
०९) www.maayboli.com/user/26450/created
१०) www.misalpav.com/user/8199/track
११) www.mimarathi.net/user/382/mytrack
१२) www.sureshbhat.in/user/1099/track
Thank you Mr Internet!
– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-