बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ… आनं… मशाल हाती धर …!!

तुह्यावाणी लाखो मेले… काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट … काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी… फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान… व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर …!!

कर्जपाणी, घेणंदेणं… आता चिंता सोड
आला दिवस तसा… मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी… शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”… झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर… आनं… आवाज मोठा कर …!!

जेव्हा पाय चालणारा… रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा… धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने… विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती… त्यांची यादी कर
एकटा नको मरू… संग… दहा घेऊन मर …!!

कायदा तुह्या विरोधात… ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ…. शरद जोशी – फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी… सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू… करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर… आनं… नाचू गच्चीवर …!!

– गंगाधर मुटे ’अभय’
————————————————

By Gangadhar Mute Posted in My Blog

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s