दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

क्षुल्लक संख्या ’नरबळी’ची, अन् तांडव केवढे यांचे
शतसहस्र “बळी” बळीचे, पण हाल पुसेना त्यांचे
या शहाण्यांच्या सद्बुद्धीवर, अवदसा कुठूनी आली?
मुळी कशाची लाज न उरली; की बुद्धी भ्रमिष्ट झाली?
पगार-वेतन विनाश्रमाचे यांना करतसे नादान है? ॥

या देशाच्या पुढारकांचा दिमाग सटकला आहे!
दीडदमडीच्या सुधारकांचा विवेक भटकला आहे!!
एकच प्रश्न अंतिम आता, पुसून घेऊ पुन्हा
विद्वानांनो, सुशिक्षितांनो, अरे! काय बिमारी तुम्हा?
काय नेमका इलाज तुम्हावर? आयुर्वेद की अ‍ॅलो?
धागे-दोरे की मांत्रिक-बाबा? बस एकबार तो बोलो!
जेणेकरूनी विवेक तुमचा येईल ताळ्यावरती
‘अभय’तेने जगेल जनता त्यांच्या शेतावरती
आम्हालाबी जगू द्या आता! हम भी तो इन्सान है!!

                                          – गंगाधर मुटे ‘अभय’
—————————————————

One comment on “दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

  1. नरबळी आणि शेतकरीबळी

    एकाचवेळी एकापेक्षा जास्त एकसमान घटना घडत असतील तर मग अशाप्रसंगी प्राधान्यक्रम ठरवणे महत्वाचे ठरते.

    हजारो शेतकरी आत्महत्या करून मरत आहेत. त्या तुलनेने नरबळीमुळे मरणारांची संख्या अगदीच नगण्य किंवा कोणत्याच खिसगणतीत नाही. अशा परिस्थितीत कोणी हजारो शेतकर्‍यांच्या मरणाकडे ढुंकूनही पाहायला तयार नसतील, मात्र नरबळी मुळे राष्ट्रीय आपत्ती कोसळली आहे, असा आभास निर्माण करत असतील तर अशा दिडशहाण्यांच्या सदसदविवेकबुद्धीबद्दल संशय घ्यायला नक्कीच वाव तयार होतो.

    मरण हे मरण असते, ते कुणाचे का असेना, ते थांबायलाच हवे. अशी धारणा केवळ सर्वसाधारण माणसांची असते.

    “थोर, श्रेष्ट, समाजसुधारक, विद्वान” अशी बिरुदावली मिरवणार्‍यांची अशीच सोज्वळ धारणा/भावना असतेच असे नाही.

    सगळा समाज आनंदाने नांदावा, यासाठी केवळ सर्वसाधारण मनुष्य प्रयत्न करत असतो. पण;
    स्वतःला अतिविद्वान घोषीत करून समाज सुधारायला निघालेले बेगडी समाजसुधारक मात्र “केवळ त्यांची स्वतःची महती ज्यामुळे वाढते” केवळ तोच अजेंडा रेटत असतात.

    दुर्दैव आपले आणि आपल्या भारताचे, दुसरे काय?
    —————————————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s