“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन

“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन

      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर शेतकरी संघटनेच्या खुल्या अधिवेशनात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या शुभहस्ते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग, स्वभापचे प्रांताध्यक्ष  माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पी.टी.आयचे माजी अध्यक्ष मा. वेदप्रताप वैदीक, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, माजी आमदार सौ. सरोजताई काशीकर, महिला आघाडीच्या प्रांताध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे, युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले, अनिल धनवट, माजी मंत्री रमेश गजबे, अ‍ॅड दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत विमोचन करण्यात आले.
      “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाला जेष्ठ संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांची प्रस्तावना लाभली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक गझलनवाज भिमराव पांचाळे, प्रदीप निफ़ाडकर, स्वामी निश्चलानंद, किमंतू ओंबळे, प्रमोद देव यांचे अभिप्राय लाभले आहे. पुणे येथील शब्दांजली प्रकाशनने हा गझलसंग्रह प्रकाशित केला असून http://www.pustakjatra.com या संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करण्यात आलेला आहे.

गझलसंग्रह  :    माझी गझल निराळी
पृष्ठे            : ८८
किंमत        : ७०/-
कवी           : गंगाधर मुटे “अभय”
प्रकाशक     : राज जैन
                शब्दांजली प्रकाशन,
                नर्‍हे गाव, पुणे

————————————————————-

माझी गझल निराळी

————————————————————-

गझलसंग्रह

————————————————————-

Mazi gajal nirali

————————————————————-

Gajhal

Advertisements

One comment on ““माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन

 1. माझ्या जीवनातला हा सोनेरी आणि अविस्मरणीय दिवस. कदाचित माझ्या वाढदिवसानिमित्त मराठी रसिकांनी आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil यांनी दिलेली अनमोल भेट आहे.
  माझे आजवर तीन पुस्तके प्रकाशीत झाली.
  १) “रानमेवा” (काव्यसंग्रह) १० नोव्हेंबर २०१०
  २) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) २२ जुलै २०१२
  ३) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) १० डिसेंबर २०१३

  पैकी दुसरी आवृत्ती काढायची बातमी “माझी गझल निराळी” ने ऐकवली. मराठी गझल रसिकांचे आणि शब्दांजली प्रकाशनचे प्रकाशक श्री Raj Jain-Patil आणि Nivedita Patil-Jain यांचे शतश: आभार. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s