अंकुर साहित्य संघ, वर्धा – साहित्य संमेलन

अंकुर साहित्य संघ, वर्धा शाखेच्यावतीने 

 साहित्य संमेलन संपन्न

हिंगणघाट : तालुका प्रतिनिधी “लोकमत”

Ankur sahitya sangha

             अंकुर साहित्य संघाच्यावतीने लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन ‘सखे साजणी’ फेम कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. उषाकिरण थुटे होत्या.
             या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जि.प. शिक्षण सभापती उषाकिरण थुटे, प्रसिद्ध कवी व चित्रपट दिग्दर्शक प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अंकुर साहित्य संघाचे संस्थापक हिंमत शेगोकार, प्रा.डॉ. शिवानंद भानुसे, माजी पोलीस अधिकारी गंगाधर पाटील, काशीनाथ भारंबे भुसावळ, निंबाजी हिवरकर जळगाव, प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा.डॉ. सुरेखा देशमुख, प्रा. शीतल ठाकरे, जिल्हा मार्गदर्शक रा.न. शेळके, वा.च. ठाकरे, सुधाकर हेमके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा रिठे यांनी केले तर मान्यवरांचा परिचय गंगाधर मुटे यांनी करून दिला. कार्यक्रमात रवींद्र शेषराव वानखेडे लिखीत काव्यसंग्रह ‘माय-प्रेमाचं विद्यापीठ’ व वसंत विठुजी गिरडे यांचा काव्यसंग्रह ‘पुष्पांजली’चे विमोचन प्रा. वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित बालकवी संमेलनात बालकवींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रथम पुरस्कार नांदगाव माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी निखीता बंडूजी दाभणे तर द्वितीय पुरस्कार सेंट जॉन्स हायस्कूलची प्रशंसा संदेश शेळके हिने पटकाविला. त्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, प्रा. शीतल ठाकरे, रवींद्र वानखेडे, स्वाती वानखेडे तसेच वसंत गिरडे व पुष्पा गिरडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी लावणी नृत्य अविष्कार स्वराली संजय रिठे हिने तर रवींद्र वानखेडे यांनी ‘निदान आमच्यासाठी तरी’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. प्रा. वाकुडकर यांनी मर्ढेकर व वाकुडकर यांच्या काव्यातील स्त्री प्रतिमाने या विषयावर विचार मांडून निवडक कविता सादर केल्या. 
             संचालन प्रशांत शेळके यांनी केले तर आभार गजानन नांदुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला गंगाधर मुटे, वसंत पोहणकर, गीता मांडवकर, स्वाती वानखेडे, अर्चना झाडे आदींनी सहकार्य केले.
( “लोकमत” च्या सौजन्याने : प्रकाशीत दिनांक – ०९-१०-२०१३)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s