कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥
जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥
सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥
रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥
– गंगाधर मुटे
———————————————————
क्या बात है …. झकास नागपुरी तडका.
धन्यवाद अनुविना. 🙂
आज आपल्यास मनःपूर्वक सहा “सुवर्णलेखनस्मृतीकमळे” बहाल केली आहेत, जहाल लेखणीस मवाळ करून केलेल्या विनापाश प्रतिभेकारण केलेला सत्कार हा जरी मारूती आठशे इतका उच्च पराकोटीचा नसला तरी हर्क्युलिस एकशे दुचाकीपेक्षा नक्कीच वरच्या दर्जाचा ठरेल…
श्री शिरीषची, आपली कौतुकाची दोन अक्षरे हाच माझ्यासाठी मोठा गौरव आहे.
uttam. va.
धन्यवाद सुनीलजी. 🙂