जगणे सुरात आले

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          – गंगाधर मुटे
——————————————–

5 comments on “जगणे सुरात आले

 1. फेसबूक वरिल प्रतिसाद

  Ramesh Thombre, Prashant Panwelkar, Prabha Prabhudesai and 13 otherslike this.

  Asawari Kelkar-Waikar कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले
  wahhhhhh…………

  Ulhas Ramchandra Bhide Chaan…… पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
  ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले ha sher sarwadhik aawadalaa.

  Shridhar Jahagirdar bahot khub..

  Prabha Prabhudesai sundar !

  Prashant Panwelkar Chhan

  Ramesh Thombre Sunder surekh ★

  Anuja Mulay wwahaaa …….kay surekh aahe …..apratim
  —————————————————————-
 2. मिसळपाव वरिल प्रतिसाद

  गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे.

  प्रेषक निश गुरुवार, 19/04/2012 – 12:22.

  गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे.

  मतला, रदीफ, यमके, बहरास योजतानाझालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

  हे तुमचे कडवे एकदम बहारदार झाल आहे.

  निश

  सुरेख मुटे साहेब. सुरेख. गझल

  प्रेषक aparna akshay गुरुवार, 19/04/2012 – 14:22.

  सुरेख मुटे साहेब. सुरेख.गझल आवडली.

  मस्त गझल!! तालात म्हणताना

  प्रेषक बॅटमॅन गुरुवार, 19/04/2012 – 15:33.

  मस्त गझल!! तालात म्हणताना मस्त वाटते 

  जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा

  प्रेषक चौकटराजा गुरुवार, 19/04/2012 – 15:53.

  जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा अशी गझल !मुटे साहेब, हम्म ! एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे ! क्या बात है !

  आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणालेहा कबीराचा संदेशच वाटतो, व्वा क्लास !कधीतरी यायला हरकत नाही पण अशाच जमलेल्या कविता घेउन या !धन्यवाद !पुकशु

  अप्रतिम! सर्वांग सुंदर! एकेक

  प्रेषक यकु गुरुवार, 19/04/2012 – 16:05.

  अप्रतिम!सर्वांग सुंदर! एकेक कडवे गोड झाले आहे 

  +१

  प्रेषक आत्मतृप्त गुरुवार, 19/04/2012 – 16:18.

  +१

  +२

  प्रेषक लीमाउजेट गुरुवार, 19/04/2012 – 17:27.

  वा…वा..वा..! मुटे

  प्रेषक अत्रुप्त आत्मा गुरुवार, 19/04/2012 – 17:15.

  वा…वा..वा..! मुटे काका…,एकेक ओळ वाचताना, मन अगदी त्रुप्त झालं 

  +१

  प्रेषक पिवळा डांबिस Fri, 20/04/2012 – 00:38.

  मुटेसाहेब, गझल आवडली…

  आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणालेक्या बात है! वा!!

  अप्रतिम

  प्रेषक sneharani Fri, 20/04/2012 – 15:30.

  अप्रतिम!मस्त झालीये गझल!!

 3. गंगाधरजी खुप सुंदर आहे कविता

  अनिल तापकीर यांनी गुरू, 19/04/2012 – 19:16 ह्यावेळी प्रकाशित केले.

  गंगाधरजी खुप सुंदर आहे कविता

  अप्रतिम

  रमताराम यांनी गुरू, 19/04/2012 – 19:55 ह्यावेळी प्रकाशित केले.

  कुर्निसात मालक. तुम्ही वरचेवर येत रहा मालक. आमचे कवितेशी नाते घट्ट होते राहते.

  तुमच्या कवितेचा दुवा आमच्या सहीत डकवण्यात आला आहे. दीर्घकाळपर्यंत आमच्या – नि इतरांच्याही – नजरेसमोर रहावी अशी गजल.

  —————————————–
  वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
  कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले….
  -गंगाधर मुटे
  (पूर्ण कविता इथे वाचा)
  —————————————–
  कविता आवडली !

  निवेदिता जैन यांनी गुरू, 19/04/2012 – 20:49 ह्यावेळी प्रकाशित केले.

  कविता आवडली !

  अतिशय सुंदर गझल..खूप आवडली..

  स्वामी संकेतानंद यांनी गुरू, 19/04/2012 – 21:09 ह्यावेळी प्रकाशित केले.

  अतिशय सुंदर गझल..खूप आवडली..

  अप्रतिम!!! सुरेख!!!!!!!!

  राजे यांनी गुरू, 19/04/2012 – 22:19 ह्यावेळी प्रकाशित केले.

  अप्रतिम!!!
  सुरेख!!!!!!!!

  केवळ अप्रतिम!!!!!!!!

  परिजा यांनी शुक्र, 20/04/2012 – 07:17 ह्यावेळी प्रकाशित केले.
  केवळ अप्रतिम!!!!!!!!

  परिजा
  ******

 4. मतला, रदीफ, यमके, बहरास

  विशाल कुलकर्णी
  यांनी शुक्र, 20/04/2012 – 19:52 ह्यावेळी प्रकाशित केले.

  मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
  झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

  का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
  एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले>>>>>>.. हे शेर खुप आवडले.

  मतला अफाट ! धन्स अ लॉट मुटेदादा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s