कविता स्पर्धा २०११
लेखन स्पर्धा २०१० या गद्यलेखन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता http://www.mimarathi.net या संकेतस्थळाने आता कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू केली आहे. ही माहिती जास्तीत जास्त कवी मंडळीपर्यंत पोचणे आवश्यक आहे. म्हणून या संबधातील सदर संकेतस्थळाने केलेले आवाहन येथे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे.
अवश्य भाग घ्या.
………………………………………………………………………………………..
नमस्कार,
यशस्वीपणे पुर्ण झालेल्या लेखन स्पर्धा २०१० नंतर मी मराठी.नेट सदस्यांसाठी व वाचकांसाठी कविता स्पर्धा २०११ ही नवीन स्पर्धा सुरू करत आहे. यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा, आपल्या मित्र-मैत्रिणींना कळवावे आणि या जालावरील लेखनाच्या अभिसरणामध्ये आपला वाटा उचलावा ही विनंती.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे. लेखन फक्त तुमच्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित असल्यास ब्लॉग दुवा द्यावा. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन कविता द्याव्यात
- एक लेखक ३ पेक्षा अधिक प्रवेशिका सादर करू शकत नाही.
- वृत्तबद्ध, छंदबद्ध व मुक्तछंद प्रकारातील कविता कविता येथे देणे अपेक्षित आहे.
- स्पर्धा १ एप्रिल २०११ ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर मे २०११ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
- स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असणार आहे. या तिघांव्यतिरिक्त ७ उत्तेजनार्थ स्पर्धकांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
- स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मी मराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
- स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
- सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.
१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.
२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य होता येते.
३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत माहिती admin@mimarathi.netआयडीवर पाठवणे आवश्यक आहे (ईमेलचा विषय : कविता स्पर्धा) . अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहित धरले जाणार नाही. प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेल्या लेखनाचा मीमराठीवरील स्पर्धेतील धाग्याचा दुवा/ लिंक , संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.
४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.
५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.
७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.
८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______
______
स्पर्धेसाठी लेखन करण्यासाठी मदत :
डाव्या बाजूला असलेल्या मार्गदर्शकातून लेखन करा येथे टिचकी मारा.
व तेथे असलेला “कविता स्पर्धा २०११” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.
व तेथे असलेला “कविता स्पर्धा २०११” ह्या विभागामध्ये आपले लेखन प्रकाशित करा.
हा धागा वाचूनच प्रवेशिका पाठवाव्यात ही विनंती.
कविता स्पर्धा २०११ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा…
कविता स्पर्धा २०११ मध्ये भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा…
व्यवस्थापक,
मी मराठी.नेट
………………………………………………………………………………………..