एकदा तरी

एकदा तरी

सकाम कर्म त्यागुनी निदान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

नसेल आपले तरी कशास हक्क सांगणे?
समानतेस न्याय दे किमान एकदा तरी

महान, थोर, श्रेष्ठ हे बिरूद फ़ार मिरवले
जगून दाव माणसासमान एकदा तरी

स्वराशिवाय रेकलो असाच मी बरेचदा
निघेल सूर कोकिळे समान एकदा तरी?

उदास चेहरा असा कसा मलूल जाहला?
हसा बघू जरा हळूच छान एकदा तरी

खरीदण्यास पाहतोस स्वाभिमान आमचा
करेन बंद मी तुझे दुकान एकदा तरी

सजा सुनावणे अभय कठीण काय त्यात; पण
बघा धरून आपलेच कान एकदा तरी

                                         गंगाधर मुटे
……………………………………………………………….

वृत्त : कलिंदनंदिनी
काफिया :  महान
रदीफ : एकदा तरी
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………….

3 comments on “एकदा तरी

 1. निघेल सूर कोकिळेसमान एकदा तरी?

  माझ्या माहितीनुसार (लांडोरीप्रमाणे) कोकिळेला स्वरयंत्र नसते. मंजुळ आवाज़ (मानला गेला) आहे तो कोकिळाचा, म्हणजे कोकिळ नराचा. मात्र स्त्रीआवाजी ज़ात्याच गोड असल्यामुळे हिराबाई, लताबाई यांच्या बाबतीत कोकिळा शब्द वापरण्याची आपल्याला संवय पडली आहे. ‘कुहु कुहु बोले कोयलिया’ गाण्याच्या लोकप्रियतेमुळे हा गैरसमज़ बळकट झाला आहे.
  ‘वसन्त समये प्राप्ते – काक: काक: पिक: पिक:’, आणि ‘आला वसन्त कवि कोकिल हा हि आला’ या ओळींमध्ये योग्य लिंगाचा उल्लेख आहे.

  – नानिवडेकर

 2. ‘गगनावरी तिरंगा’ कविता रसना छन्दात आहे, आनंदकंदात नाही. आनन्दकन्द हा गणछन्द आहे. तुमची रचना रसना या मात्रिक छन्दात बसते.

 3. नानिवडेकरजी,
  “कोकिळ” विषयी माहीतीबद्दल आभार.
  ………………
  ‘गगनावरी तिरंगा’ ही कविता
  आनंदकंद या अक्षरवृत्तात असून
  गागाल गालगागा, गागाल गालगागा
  अशी लगावली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s