राख होऊन मेला : नागपुरी तडका

राख होऊन मेला : नागपुरी तडका

हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला
हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला  ….॥१॥

पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला  ….॥२॥

महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला
मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला
सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली?
हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली
हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला?  ….॥३॥

श्याम्या म्हणे उशिर कारन, मेली माही बायकू
सायेब म्हने, तुह्या बाह्यना, मी कायले आयकू?
माय मरन, पोट्टं मरन, उद्या मरन तुहा भाऊ
आमी किती दिवस मंग असे, हप्त्याबिना राहू?
एकटा मीच खात नाय, वर्तून आडर आला  ….॥४॥

“पोट्टं मरन” म्हनल्यावर, झकापकी झाली
तळपायाची आग मंग, मस्तकात गेली
गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागला
अध्धर उचलून सायबाले, भट्टीमंधी फ़ेकला
कोनी अभय ह्यो देस, भलतीकडं नेला?
हप्ता गेला भाडमंधी, भट्टीमंधी मेला ….॥५॥

                         गंगाधर मुटे
————————————————————————–
भाड = भट्टी, लोहाराचा भाता
पेट्या = दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी
बाह्यना = बहाणा, खोटी सबब
अध्धर = हवेत अधांतरी
————————————————————————–
@ ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
————————————————————————–

Advertisements

3 comments on “राख होऊन मेला : नागपुरी तडका

 1. >>>ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.>>>
  मान्य…….

  मात्र या कल्पना विलासाला
  सत्याचा आधार आहे….
  कारुण्याची झालर आहे….
  परिस्थितीची भीषणता आहे….
  सामान्यांची अगतिकता आहे…
  अन्यायाची चाड आहे….

  आणि
  आपण कितीही आव आणला तरी
  या सुसंस्कृत महाराष्ट्रात जंगलाचाच कायदा आहे…

  आणि या जंगलाचा राजा सिंह नव्हे तर…

  गिधाडे आणि कोल्हे आघाडीचे सरकार आहे………. 😦

 2. नमस्कार काका,
  मी प्रशांत पुरुषोत्तम काळे. तुमचा कार्यक्रम पाहिला
  आणि पाहून छान वाटले.

  प्रशांत काळे, हिंगणघाट

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s