बायको : नागपुरी तडका

बायको : नागपुरी तडका 

थोडीशी पगली, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥१॥

सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते
कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते
टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही
गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही
थोडीशी येडपट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥२॥

सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते
माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते
मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही
तरी बाप्पा तीले काही देव पावत नाही
थोडीशी भोळसट, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥३॥

सार्‍यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते
कवाकवा पानी पेऊन तशीच झोपी जाते
सडासारवन, धूनंपानी, अभय सारं करते
पहाटपासून रातपावतर मरमर मरते
थोडीशी कष्टीक, थोडीशी सायको
देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥४॥

                                                गंगाधर मुटे
————————————————————————-
शीरनी = प्रसाद, सायको = Psycho
————————————————————————-

Advertisements

13 comments on “बायको : नागपुरी तडका

  1. धन्यवाद महेंद्रजी,
    ग्रामीण स्त्रीचे प्रतिनिधीक दर्शन जरी या कवितेतून घडले, तरी ही कविता यशस्वी झाली समजायची.
    आणि या पिढीसोबतच ही संस्कृती लयास जाण्याची दाट शक्यता आहे.

  2. छान…….एकदम गावाकडच्या स्त्रीचे प्रातिनिधिक स्वरूप…..एकदम मस्त मांडले आहे….!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s