गगनावरी तिरंगा ….!!
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ….!!
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका
संगे हिमालयाला येण्यास मार हाका
समवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ….!!
साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना
धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना
कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ….!!
तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी
ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी
आता अभय मनाच्या धुंदीस या जपावे
ओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ….!!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(वृत्त : आनंदकंद)
अतीशय सुंदर!!
शतशः आभार, इतक्या सुंदर कवितेसाठी..
महेंद्रजी, खूपखूप आभारी आहे.
रंग्या तिरी नाव गणी गण गणात बोते।
शिरीषजी,
रंग्या तिरी नाव गणी गण गणात बोते।
याचा अर्थ सांगाल काय?
तसे “गण गण गणात बोते” माहीत आहे पण अर्थ नाही माहीत.
प्रथम आपण बहाल केलेल्या “शिरीषजी” मधला G (जी) श्री गजानन महाराज चरणी अर्पण करून प्रयत्न करतो…
आमच्या मते गण गण गणात बोते। वा गिण गिण गणात बोते। असे चे दोन प्रवादित उच्चार श्री गजानन विजय ग्रंथात दिले आहेत, ते श्री महाराजांनी स्वतःसाठी रचलेले कूट नामजप आहेत… त्यामुळेच ते वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे ऐकू आलेले दिसतात.
त्यात स्वतः महाराज श्री शंकराचा अर्थात महादेवांचा जप करतात असे जाणवते… पण ते स्वतःही (म्हणजे सर्वच संत) एकेश्वरवादी, अद्वैतवादी असल्याने तो त्यांचा स्वतःचा आत्मजपही ठरतो।
ह्या विषयावर मी कदाचित १०-१५ मिनीटे अखंड बोलू शकेन असे सध्यातरी वाटते पण ते व्यासपीठ हे नव्हे।
गणी गण गणात बोते। ह्या मी लिहिलेल्या वाक्याचा सारांश इथे थोडक्यात सांगणेही योग्य होणार नाही मात्र मी त्यावर लेख लिहायचा मी नेहमी लिखाण करीत असलेल्या ठिकाणी प्रयत्न अवश्य करेन जेणेकरून मला त्यावरून निर्माण होणारे प्रश्न, शंका आणि उत्तरे संपादित करणे सोयीचे असेल…
कालौघात काही अनावश्यक टीका आमच्या हातून घडली असल्यास क्षमस्व।
शिरीषजी,
खूपखूप आभारी आहे.
देशप्रेम मनात झळकवी
बंधुभाव जगा शिकावी
एकात्मतेचे बीज रूजवे
तिरंगा माझा अवघ्या जगात मिरवे
देशप्रेम मनात झळकवी
बंधुभाव जगा शिकावी
एकात्मतेचे बीज रूजवे
तिरंगा माझा अवघ्या जगात मिरवे
सर खूप छान……. भारतभूची सुंदर शब्दरचना