झिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी
झिलपी बाई झिलपी
झिलपी बसली नाहाले
शंकर गेले पाहाले
असे शंकर भ्याले
फ़ूलं वेचत गेले
फ़ुलात पडली अंबाई
नाव ठेवले भिमाई
भिमाईच्या टोपल्या
ठाई ठाई गुंफ़ल्या
एक ठाई हारपली
मामा घरी सापडली
असे मामा चोर
खिडकी आंबा गोड
खिडकी आंबा कोणाचा
रघुजीच्या राणीचा
रघुजीची राणी
भरत होती पाणी
मागून सुटली वेणी
धावा धावा कोणी
धावन तीचे धनी
धनी गेले ताकाले
इच्चू डसला नाकाले.
(संकलन : गंगाधर मुटे)
असं संकलन करणही खूप गरजेचं आहे. आभार.
होय विजयजी.
मराठी भाषेच्या समृद्धी आणि सांस्कृतिक जोपासणेसाठी अशा तर्हेचे संकलन नक्किच उपयोगी ठरू शकेल.
Sir,mi tumcha aabhri aahe .m.a. chya project sathi me bhulabaichi gani ha vishay nivadala asun tya sathi mala aapalya ya sade cha khup use hot aahe.thanks sir
अनामिक,
आपणास या लिंक उपयोगी पडतात का ते बघा.
http://www.baliraja.com/node/225
http://www.baliraja.com/node/174
sir mala 5 bhulabaichi gani pahije
simran upare,
तुम्हाला गाणी खालील लिंकवर मिळतील.
http://www.baliraja.com/node/225
http://www.baliraja.com/node/174