महादेवा जातो गा…..! (१)
महादेवा जातो गा, भोले रे नाथा
तुझ्या का वाटेनं गा
घोटा घोटा पाणी
संभाच्या नावानं
नंदी लागले पोहणी
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
…………………………
महादेवा जातो गा…..! (२)
महादेवाच्या वाटेनं गा
नदीले आला पूर
वाहून गेली रेती
वांझल्या नारीले
कसा गवसला मोती
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
…………………………
महादेवा जातो गा…..! (३)
महादेवाच्या वाटेनं गा
दारू पेऊ पेऊ, डोळे झाले लाल
पेतो हरामाचा माल गा भोलेराजा
.
एक नमनगौरा पार्बती हरहर महादेव…..!
…………………………
.
(संकलन : गंगाधर मुटे)
छान.. आवडलं मला. अजून टाका.
आम्ही “एक नमन गिरजा पार्वती हरबोला हरहर महादेव…. ” म्हणतो.
पहिला नमन खूपच फ़ेमस आहे.. “घोटा घोटा पानी” ऐवजी “टोंगरा टोंगरा पानी ” म्हणतात आमच्याकडे…आता दिवाळीला गावाकडे जातोय तर २०-३० लिहूनच आणतो.. ब्लॉगमुळे विदर्भाबाहेरच्या लोकांनासुध्दा माहीत होईल.
होय संकेतजी,
अवश्य पोष्टाव्यात. आणि मला कळवायला विसरू नका पण.
छान! खुपच छान!
असचं मराठीला जपू शकतो.
मना मनात मराठीला रुतऊ शकतो.
खरेय रंजितजी,
माय मराठीच्या जपणुकीसाठी
मायबोलीच्या विविधतेला जपावेच लागेल.