मुख्यमंत्र्यांना पत्र.

मुख्यमंत्र्यांना पत्र.

मा. मुख्यमंत्री
महाराष्ट्र शासन, मुंबई

विषय : शेतातील विजेच्या बिलाची थकबाकी.
संदर्भ : भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे निवडणुकपूर्व जाहीरनामे.
अर्जदार : समस्त शेतकरी, महाराष्ट्र

महोदय,
वरील संदर्भांकित विषयाचे अनुषंगाने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी आपले लक्ष वेधू इच्छिते की, ज्या शेतकर्‍यांकडे शेतातील मोटारपंपाचे विजेचे बील थकित आहे त्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत, या राज्यातले शेतकरी शेतातील मोटारपंपाची वीजबिले नियमितपणे भरत होते. शेतकर्‍यांनी विजेची बिले माफ करावी किंवा शेतीला फुकट वीज द्यावी अशी मागणीही केलेली नव्हती. असे असतानाही आपल्या पक्षाने आणि आपल्या सहकारी पक्षाने सवंग लोकप्रियतेसाठी व निवडणुकीत भरघोस यश मिळविण्यासाठी पक्षाच्या जाहीरनाम्यात “आमचा पक्ष निवडून आल्यास शेतीस विनामूल्य वीज” देण्याचे जाहीर केले होते.
पण बहुमत मिळून सत्ताप्राप्ती होताच आपला पक्ष आणि आपले सरकार यांनी शब्द फिरवला आणि महाराष्ट्रीय शेतकर्‍यांचा विश्वासघात केला.
उणेपुरे अर्धशतक एवढा प्रदिर्घ काळ सत्तेत असणार्‍या जबाबदार पक्षाने, न पाळता येणारी वचने देणे किंवा दिलेली वचने न पाळणे हे शोभादायक नाही, असे शेतकर्‍यांना वाटत आहे.
दिलेल्या शब्दाला जागून शेतीला मोफत वीज पुरवठा करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असून त्यापासून पाठ फिरविण्याची शासनाची विश्वासघाती वृत्ती आणि कृती आम्ही शेतकरी खपवून घेऊ शकत नाही.
तसेही मागील वर्षीपासून शेतावरील मोटारपंप बंदच आहेत. जुलै २०१० पर्यंत विहिरीत पाणीच नव्हते आणि जुलै २०१० नंतर निसर्गानेच एवढा पाऊस दिला की मोटारपंप सुरू करायची गरजच पडली नाही. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि किमान रबी पिके तरी घेऊन नुकसान काही अंशी भरून काढायचे म्हटले तर विद्युत पुरवठा खंडीत करण्यासाठी संबंधित म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण” कडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

सबब आपण योग्य ती कारवाई करून वीजबीलांचा प्रश्न मार्गी लावाल, हि अपेक्षा.

दिनांक : १५-१०-२०१०                           – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी

प्रतिलीपी :
मुख्य अभियंता
म.रा.वीज वितरण कंपनी मर्या. “महावितरण”

महोदय, शेतीची वीजबिले भरण्याची जबाबदारी सबंधित शेतकर्‍यांची नसून शासनाची आहे. त्यामुळे वीजबिले शेतकर्‍यांकडे न पाठवता शासनाकडे पाठवावीत. तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा आततायीपणा करू नये कारण वीजबिले थकली असल्यास त्याचे उत्तरदायित्व शेतकर्‍यांचे नसून शासनाचे आहे, हे लक्षात घ्यावे.

दिनांक : १५-१०-२०१०                           – समस्त महाराष्ट्रीय शेतकरी

2 comments on “मुख्यमंत्र्यांना पत्र.

 1. गंगाधर मुटे यांस,
  सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
  पत्र लिहिण्यास कारण की, आपले मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचले.
  छान लिहिले तुम्ही. आज सकाळी स्टार माझावर या वेबसाईटबद्दल तेंव्हा लॉगीन करून पाहिले.
  शब्द रचना उत्तम केली आहे. तुमचे विचार सर्व जनतेसमोर आणावे, म्हणजे यापुढे सर्वजन वाळीत टाकतील.
  १९४७ पासून ही मंडळी सत्तेवर आहेत, पण देशाला विकून खाल्ले आहे.
  इतर अनेक देशातले राजकारणी देशाची प्रगती करून सत्तेत राहतात. पण इथे भारतात सत्तेचा भत्ता खाऊन जगतात.
  फ़ार ज्वलंत विचार आहेत तुमचे.
  सध्या मुख्यमंत्री बदललेले आहेत. त्यामुळे ते म्हणतील मी नव्हतो म्हणालो, तुम्ही विलासरावांना विचारा. वगैरे वगैरे.
  भाषा एकदम शुद्ध आहे. महाराष्ट्रीयन असे न म्हणता “महाराष्ट्रीय” “भारतीय” असा उल्लेख हवा होता.

  आपला वाचक,
  Devdatta (देवदत्त)
  from Amachi Mumbai

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s