फ़ुलझडी

फ़ुलझडी……….!!!!

तो….
चार शिष्य,चार चेले, चार चमचे
मागेपुढे चालायला, उदोउदो करायला
कायम आपल्या दावणीला बांधून
स्वतःच स्वतःविषयी लिहिलेले पोवाडे
गाऊन घेतो त्यांचेकडून
आणि एवढ्याशा शिदोरीच्या बळावर
वाढवू पाहतो…. आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा……!!

ते….
ते भक्तही तल्लीन होतात
लोळवून घेत स्वतःला त्याच्या चरणावर
वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा
मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत… होतात बेभान
जणू काही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ
अशी स्वतःचीच मनसमजावणी करत… सदासर्वकाळ….!!

क्षणिक का होईना पण अभयतेने
चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी……….!!!!

                                                            गंगाधर मुटे
………… **………….. **…………. **…………..**……..

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s