या या भुलाबाई : हादग्याची गाणी
(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.
(२)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.
(संकलन-गंगाधर मुटे)
मला तुमचा ब्लॉग आवडला. संपर्क साधायची ईच्छा आहे. आपला ई-मेल मिळेल काय?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मेल केली आहे. 🙂