मांसाहार जिंदाबाद …!!
सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन् गांडूळाच्या शेवया…!!
गोचिडाची खिचडी
टमगिर्याचं भरीत
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीत
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण
घे पुरणात भराया …..!!
गोमाश्यांचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
उवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ….!!
कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जिभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरिबाला सुळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?….!!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….
yaak….
रेवाजी,
ही कविता प्रकाशीत करतांना मलाही खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
या कवितेत “शाकाहार की मांसाहार” हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हेही महत्वाचे.
zakas……. MANSAHARIWAR CHANGLE ASUD ODHLET…. KHA MHANAWE GANDULACHYA SHEWAYA… NAHITARI CHINI KHATATCH.. TUMHI HI SURU KARA MHANAWE.
Khupach chhan lihile aahe….
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
शरदजी, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
zakas, the best