लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी
खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी….
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या
गुलाबाई माहेरच्या गोष्टी
(अरुंधती कुळकर्णी यांचे सहकार्याने.)
खरेच तुमची साईट म्हणजे हल्लीच्या पिढीला एक वरदानच म्हणायला हवे.
या पिढीला हादगा म्हणजे काय, हेही माहीत नाही तर ही एवढी सुंदर गाणी तर कुठून माहीत असणार?
ही गाणी वाचल्यावर खरेच मला माझे बालपण आठवले.
ही सर्व गाणी आमची आई आमच्या भोंडल्याला म्हणायची.
-स्मिता
धन्यवाद स्मिता. 🙂
ही सर्व गाणी आम्ही दरवर्षी ट्रेनमध्ये नवरात्रीमध्ये रात्रीमध्ये म्हणतो. मी हा कार्यक्रम ऑफ़िसमध्येसुद्धा राबविला आहे.
मला या गाण्याबद्दल जेव्हा माहिती मिळाली तेव्हापासून मी यामध्ये नवीन गाणी जेथूनमिळेल तेथून घेऊ लागलो व आमच्या ट्रेनमधील भोंडल्यात म्हणू लागलो.
(hi sarva gani amhi darvarshi trainmadhe navratrimadhe mhanato, me ha karyakram officemadhesudhha rabvila ahe, mala ya ganyabaddal jevha mahiti milali tevhapasun me yamadhe navin gani jethun milel tethun ghete va amchya trainmadhil bhondlyat mhanu laglo.)
सीमा,
या गाण्याव्यतिरिक्त अजून गाणी तुमच्याकडे असल्यास येथे
किंवा
http://www.baliraja.com
येथे अवश्य लिहावीत. 🙂
खरेच तुमची साईट म्हणजे हल्लीच्या पिढीला एक वरदानच म्हणायला हवे.
या पिढीला हादगा म्हणजे काय, हेही माहीत नाही तर ही एवढी सुंदर गाणी तर कुठून माहीत असणार?
ही गाणी वाचल्यावर खरेच मला माझे बालपण आठवले.
ही सर्व गाणी आमची आई आमच्या भोंडल्याला म्हणायची. Vikas Dahake