काळी चंद्रकळा : हादग्याची गाणी
काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?
ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?
दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं
वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली
मामांजींची शेन्डी झाली
उरलेलं तेल झाकुन ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला
त्यात हत्ती वाहून गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला
दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.
(संकलन : आश्विनी डोंगरे)
मी ही कविता ५ वीला शिकलो होतो.
मराठीच्या मॅडम, सुर्वे मॅडमनी ही कविता शिकविली होती.