कान पिळलेच नाही

कान पिळलेच नाही


उपदेशाने कान कसे पिळलेच नाही
माझे बहिरेपण त्याला कळलेच नाही

निग्रहाचे धडे दिले विपरीत दशेने
पानगळीतही मग पान गळलेच नाही

वेदनांचा काढा मग गटागटा प्यालो
तेव्हापासून व्यथांनी छळलेच नाही

चिरंतन असती बोल संत साहित्याचे
अनीतीच्या शेकोटीत जळलेच नाही

श्रावणात घननिळे जरा पिघळले होते
पुन्हा त्यांचे थेंब कसे वळलेच नाही

जनसेवेचा प्रताप आणि ’अभय’ पुरेसे
शुभ्रकापड घाणीतही मळलेच नाही

                                 गंगाधर मुटे

……………………………………………
(वृत्त – मात्रावृत्त )
…………………………………………..

2 comments on “कान पिळलेच नाही

  1. आपले काव्य एकदम छान असते… मनाला भावते… नेहमी अवश्य वाचतो पण अभिप्राय मात्र आजच लिहावासा वाटला…

    शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s