बिपाशाले लुगडं

बिपाशाले लुगडं 

श्याम्यानं इचीबैन, कहरच केला
बिपाशासाठी मुंबईले, लुगडं घेऊन गेला ….॥१॥

त्याले वाटलं मायबाप, भलते गरीब असन
म्हून तिले आंगभर, कपडे भेटत नसन
वाढलीहूढली पोरगी, तरणीबांड दिसते
इकडं झाकाले गेली, तं तिकडं उघडं पडते
म्हून त्यानं कपड्याचा, थैला भरून नेला ….॥२॥

जुहूच्या चौपाटीवर, भेट त्यायची झाली
तिले पाहून शाम्याची, बंदी विकेट गेली
तिले म्हणे चोळी घाल, घे लुगडं नेसून
थ्ये म्हणे आवमाय, हे भूत आलं कुठून?
मंग जुहूवर धमासान, तमाशा सुरू झाला ….॥३॥

लय वळवलं तिचं मन, पण मन नाय वळे
मंग श्याम्या धावे मांगं, आनं थ्ये पुढं पळे
वन्समोअर,वन्समोअर, लोकं भाय बोंबले
कॅमेरेवाले पोझ घेऊन, कॅमेरे रोखून थांबले
पोलीसायनं बैनमाय, नावकूल विचका केला
आनं त्याच्या पुढचा एपीसोड, राहूनच गेला ….॥४॥

                                                  गंगाधर मुटे
……………………………………………………………
ढोबळ मानाने शब्दार्थ :-
इचीबैन, बैनमाय = च्यायला सारखे.
वाढलीहूढली = वयात आलेली. बंदी = पूर्णं,संपूर्ण.
आवमाय = अगबाई, मांगं = मागे नावकूल = पुर्णपणे.
…………………………………………………………..
………………………………………
ही कविता ऐकण्यासाठी क्लिक करा.
……………………………………….
.

16 comments on “बिपाशाले लुगडं

  1. सर,फ़िदा झालो मी. One more masterpiece.

    नागपुरची आठवन आली.मी नागपुरचाच.तिथेच वाढलो,शिकलो.

    अप्रतिम.दुसरा शब्द नाही.

  2. छान आहे………म्हंजे खुपच विनोदी असली तरी अर्थपुर्ण आहे…. आणि खाली शब्दांचे अर्थ दिलेत त्यामुळे कळायला सहज नी सोपे जाते …….carry on..

  3. शंतनुजी,हेरंबजी,अखिलेशजी
    प्रतिसादाबद्दल आभारी आहे. 🙂

  4. मी, सहज विडंबन कविता वाचण्यासाठी गेलो आणि तुमचा ब्लॉग मिळाला वाचून आतिशय आनद झाला .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s