अशीही उत्तरे-भाग-३

अशीही उत्तरे-भाग-३
गंगाधर मुटे 
.… थोडक्यात उत्तरे लिहा …. 
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – चक्कु सुर्‍या खुपसणकर.
प्रश्न – पत्ता द्या ?
उत्तर – कोणता देवु. टोपाझ की इरास्मिक ?.
प्रश्न – अहो गावाचे नाव सांगा ?
उत्तर – भामटीपुरा.
प्रश्न – आवडता चित्रपट?
उत्तर- पॉकेटमार,हाथ की सफाई.
प्रश्न – आवडीचे स्थळ ?
उत्तर – बस स्टॅंड,रेल्वे स्टेशन,गर्दीचे ठिकान.
प्रश्न – मासिक मिळकत?
उत्तर – ते लोकांच्या खिशावर अवलंबुन असते.
…………………..


प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?


उत्तर – चबुतर्‍यावरुन चालता चालता चपळाईने त्या चतुर चटकचांदणीने चार चढेल चावट चिडिमारांना चपला चपलांनी चेचुन चांगलेच चोपले.


….. अपूर्ण गाणी पूर्ण करा. ….


प्रश्न – जिंदगीभर नही भुलेगी वो बरसात की रात ……………
उत्तर – सर्दी,खांसी और जुकामने तंग किया था सारी रात.


प्रश्न – आप जैसा कोई मेरे जिंदगीमे आये …………
उत्तर – तो बाप बन जाये.
…………………………


प्रश्न- देव प्रसन्न होऊन वर मागा म्हटले तर काय मागाल ?
उत्तर- आमच्या ३ मागण्या आहेत.


१) एटीएम,बँका बंद करा,रोकड घरी किंवा खिशातच असली पाहीजे.
२) पोलीस लठ्ठ व्हावेत.वेगाने पळता यायला नको.
३) महिलांनी पैसे ठेवण्यासाठी हाती पर्स वापरावी.भलत्या-सलत्या ठीकाणी पैसे ठेवु नयेत.  
…………………………………………………………………….
नोंद :- या रचना माझ्या स्वरचित आहेत परन्तु या घडामोडी दैनंदिन जिवनचर्येशी संबधित असल्याने या तर्हेची विनोदनिर्मिती यापूर्वीही झाली असू शकते.
…………………………………………………………………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s