धकव रं श्यामराव
धकव रं श्यामराव झोल नको खाऊ
नशिबाची गाथा नको कोणापाशी गाऊ …!
रगताचं पाणी करून रान शिंपलं बावा
गारपिटानं कहर केला निसर्गानं कावा
कंबरछाती गहू होता पुरा झोपून गेला
उंबईचा फ़ुलोरा खड्डून झाडून नेला
दोघाचंबी गर्हाणं सारखंच हाय भाऊ …!
मार्केटात गेलो तर उलटे झाले गिर्हे
खरीददार म्हणे ह्या गहू होय का जिरे?
आजकाल म्हणे याले कोंबडी खात नाही
घेऊन जा वापस नायतर धडगत नाही
नशीब धुवासाठी मी कोणत्या गंगेत न्हाऊ?….!
पदवीची पुंगी घेऊन पोरगं वणवण फ़िरते
डोनेशनबिगर कुठं नोकरीपाणी मिळते?
चपराश्याचा भाव सध्या सात लाख सांगते
मास्तरसाठी अभयानं बारा लाख मांगते
“नोकरीले मार गोली” म्हणलं खेतीवाडीच पाहू….!
गंगाधर मुटे
………………………………………………
ढोबळमानाने शब्दार्थ.
झोल खाणे = कच खाणे.माघार घेणे.
उंबई = ओंबी, गिर्हे = ग्रह
………………………………………………
फेब्रुवारी
18
2010
लई भारी…..!!!!!!!
जबरदस्त!!!
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा..!!
jabardast!!!!!
kadak!
नितिनजी,निखिलजी
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे ..!!