बळीराजाचे ध्यान

बळीराजाचे ध्यान ….!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

7 comments on “बळीराजाचे ध्यान

  1. वाह ! मुटेजी,
    अस्सल् मातीतली कविता !
    सुरेख जमली आहे !
    कास्तकाराच्या प्रति असलेल्या तुमचा कळवळा यातून स्पष्ट दिसुन येतो !

  2. बळीराजा डॉट कॉम मधे तुमची पुरस्कृत गझल वाचली. अभिनंदन.
    कांही वर्षांपासून श्री भीमराव पांचाळ (प्रसिद्ध गझल-गायक) चांगल्या गझलांच्या शोधात असतात. त्यांनी तुमच्या गझल पाहिल्या अथवा गाइल्या आहेत का, नक्की कळवावे.

  3. स्टार माझाच्या शूटींगचे वेळी मुंबईला आलो तेव्हा श्री भीमराव पांचाळे यांचेशी माझी भेट झाली. त्यानंतर त्यांचेशी दोन-तीनदा वेगवेगळ्या कार्यक्रमात भेट झाली. त्यांनी माझ्या काही गजला पाहिल्या आहेत.
    मात्र अजून गायनाबद्दल विषय निघालेला नाही.

  4. Wonderful post sir, we are also contributing from our side to make our agriculture best in every aspect through http://www.agrimates.com, There we are providing various information for farmers as well as non-farmers and students about agriculture. we hope that you also help us for making this information available to all possible people, you can also post any agriculture related news, post, inventions in article section.
    Thank you.
    http://www.agimates.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s