कुठे बुडाला चरखा?
राजकर्यांनो जनतेसाठी एवढे ध्यानी घ्यावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
पक्का करूनी, चौपट दामा, विकत ग्राहकाला
काय निराळे आज आढळे, तितुकेची बोलावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
रेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते
कोर्ट-कचेर्या अन नोकर्या, त्याही गोर्या हस्ते
काय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे ..!!
टीव्ही आली, संगणक आले, आली कॉटन-बीटी
इलेक्ट्रॉनने झेप घेतली, तुमचे योगदान किती?
काय निराळे तुम्ही मढवले, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
काय झाले ग्रामोदयाचे? कुठे बुडाला चरखा?
स्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बुरखा
दिवे तुम्ही किती लावले, अभयाने दावावे
तुमच्यामध्ये काय ’वेगळे’ याचे उत्तर द्यावे…!!
गंगाधर मुटे.
……………………………………
तुमच्या आमच्यात नसलेली पराकोटीची हाव हेच वेगळे आहे यांच्यात.
जयंत कुलकर्णी.
धन्यवाद कुळकर्णीजी,
आपल्या प्रतिसादाने आत्मबळ वाढते.
उत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.. “काहीही वेगळं नाही”.. मोगलाई सुलतानी आणि इंग्रजी राजवट यावेळी जे चालायचं तसंच चाललंय अजूनही.
धन्यवाद हेरंबजी,
त्यांनी तसे स्विकारावे ना. म्हणजे उगीच कोणी भोळ्या भाबड्या आशा बाळगणार नाहीत.