माय मराठीचे श्लोक…!!
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
अभय एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(वृत्त – भुजंगप्रयात)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी
याच शब्दांनी आपणास मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या .
मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपन सगळे तत्पर राहू.!!!!!!!!!!!!!!!! हीच अपेक्षा
जय महाराष्ट्र
काका, मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्या ॥
आपले मराठी मनाचे श्लोक फ़ार छान आहेत.
खरचं
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकात एकत्व एक परिभाषा
असे भाग्य ज्यांना मिळाली मराठी
घडो हे समस्ता! नमो माँ मराठी..!!
या श्लोकांचा आपण प्रचार जरुर करा.
अक्षय,प्रमोदजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
Chhan kavita! sundar lihiliy.
अतिशय मनाला भिडणारी रचना .. खूप आवडली ..
मी माझा माझ्या आवडत्या कविता असा ब्लॉग चालवतो .. आपली परवानगी असेल तर त्यात हे सामील करेन ..
छान झालीय कविता ! आवडली.
ही कविता पण येथे वाचा
http://savadhan.wordpress.com/2010/01/09/मराठीप्रेमीं
अक्षय,विरेंद्रजी,सावधानजी
आपल्या सहृदय प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!
अप्रतिम कविता. खुपच सुंदर.. आवडली.. नेहमीप्रमाणेच …
लय भारी
हेरंबजी,पाषानभेदजी
आपल्या सहृदय प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!
सुंदर आहे.
एकदम मस्तच. एकदम आपल्या “कुसुमाग्रज” वगैरे कवींसारखी झाली आहे. –> “महान”! खरंच!
शुभेच्छा!!!
अतीशय सुंदर, अप्रतीम!
-हरीश
व्वा! मस्त. गंगाधरजी, सगळ्यांच्याच भावना समर्थपणे व्यक्त केल्यात.
सुंदर आहे एकदम. मस्तच.
वा ! गंगाधरजी. सुपर्ब. आपणास ही आमच्या मनापासुन शुभेच्छा !!!
मराठीचा जय हो !!!!
खरच छान आहे कविता! आवडली!!
नमू मायबोली, नमू तुज मराठी
तुझी बोलगाणी, सदा येत ओठी
खूप छान….कविता खूप आवडली
सुरेख!!
बदल केल्यानंतरची कविता खूपच चांगली वाटली.
खूप छान!!
अप्रतिम गंगाधरजी.
नवे मायबोली स्तवन… आवडले.
लय भारी..!!
DEAR SIR
खरोखरच तुमच्या कविता चांगल्या आहेत. प्रथमता धन्यवाद .
सर तुमची एक कविता अगदी मनाला भिडून गेली ती म्हणजे महागाई.
खरोखरच खूप मार्मिक शब्दात तुम्ही वर्णन केले आहे, तशेच मी तुमची “शेतकरी मर्दानी” हि कविता पाठ करण्यासाठी प्रिंट OUT काढलेली आहे . मी पण एक साधा कवी आहे, त्यामुळे कवीचे शब्ध कवीलाच समजणार. धन्यवाद सर .कृपया आपला मोबाईल नं. द्यावा. THANK YOU.
चंद्रकांतजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तुम्ही तुमचा इ-मेल किंवा दिलेला नाही.
माझा मोबाईल नं कसा कळवणार?
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
उत्तम रचना गंगाधरजी.!
नमस्कार.
अतिउत्तम. मराठीची गोडवी गाणारी आपली कविता अत्युत्तम आहे.
too good -अप्रतिम….!